Athletics nithya ramraj success story : अनेक अडचणींचा सामना करत वेगाने धावत राहायचं. कितीही निराश व्हायला झालं तरीही पाय थांबवायचे नाहीत, असं तिचं ध्येय आहे. तिच्या या ध्येयावरमुळेच तिला एक वेगळी ओळख मिळाली, ती म्हणजे धावपटू नित्या रामराज. तामिळनाडू राज्यातील कोईम्बतूर येथे जन्माला आलेली नित्या रामराज आता जागतिक स्तरावर पीटी उषाचा वारसा पुढे न्यायला सज्ज झाली आहे. मात्र तिचा हा प्रवास सोपा नव्हता.

वडिलांच्या खेळाप्रतीच्या आवडीने प्रेरित होत नित्याचा अॅथलेटिक्सच्या जगात प्रवास सुरू झाला. अगदी लहान वयात नित्याने एक खेळाडू म्हणून मेहनत घेण्यास सुरुवात केली. वडिलांना मैदानावर कबड्डी खेळताना पाहून तिच्या मनात एक नवी उमेद जागरुक झाली आणि तिनेही खेळाडू व्हायचे असे निश्चय केला. खेळासाठी तिला सुरुवातीपासूनच वडिलांकडून खूप प्रोत्साहन मिळाले. मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर आज तिने एक यशस्वी अॅथलेटिक्स म्हणून नावलैकिक मिळवला आहे. उल्लेखनीय म्हणजे, वयाच्या १३ व्या वर्षी, नित्याने राज्य स्तरावर ६०० मीटर धावण्याचा विक्रम केला, तेव्हापासून तिच्या शानदार ऍथलेटिक कारकीर्दीला सुरुवात झाली.

9 years old girl molested by luring chocolates in kalamboli
पनवेल : कळंबोलीत चॉकलेटचे आमिष दाखवून बालिकेवर अत्याचार
ankita walawalkar aka kokan hearted girl first told to raj thackeray about her marriage
“लग्नाची बातमी सर्वात आधी राज ठाकरेंना…”, प्रेमाची जाहीर…
passenger killed after fight with rickshaw driver over fare row
टिटवाळ्यात रिक्षा चालकाबरोबरच्या भांडणातून प्रवाशाचा मृत्यू
Ratan Tata Died at 86 in Marathi
Ratan Tata Death : “…कारण महापुरुष कधीच मरत नाहीत”, रतन टाटांच्या निधनानंतर आनंद महिंद्रांची पोस्ट
A Chocolate made by a 20-year-old boy
Success Story: २० वर्षांच्या तरुणाने लॉकडाऊनमध्ये छंद म्हणून बनवला एक पदार्थ; आज १०० कोटींच्या व्यवसायात झाले रुपांतर
UP Crime Scene
UP Crime : पत्नीच्या लग्नापूर्वीच्या प्रेमसंबंधामुळे आख्खं कुटुंब उद्ध्वस्त! प्रियकराने एकाचवेळी केली चौघांची हत्या; चिमुरड्या मुलींवरही घातल्या गोळ्या
Man Kill father murderer after 22 Years
बदला पुरा! वडिलांच्या हत्येचा सूड घेण्यासाठी २२ वर्ष वाट पाहिली, मोठा होताच त्याचपद्धतीने केली मारेकऱ्याची हत्या
Delhi Crime Doctor Shot dead in Hospital
Doctor Murder : “शेवटी २०२४ मध्ये हत्या केलीच”, डॉक्टरच्या हत्याप्रकरणी अल्पवयीन मुलगा गजाआड; सोशल मीडिया पोस्टही चर्चेत!

खेळ हा नित्यासाठी एक आत्म- अभिव्यक्ती आणि संतुष्टीचे माध्यम बनले. वयाच्या १७ व्या वर्षापर्यंत तिने सातत्याने विविध राष्ट्रीय पदके जिंकली आणि त्यामुळे तिला एक वेळी ओळख मिळाली. याकाळात तिच्या आयुष्यात एक निर्णायक क्षण आला, जेव्हा तिच्या प्रशिक्षकाने ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत भाग घेण्याचा सल्ला दिला. जी तिच्यासाठी आव्हानात्मक गोष्ट होती. यावेळी तिला खेळ सोडून देण्याची आणि पुढे चालू न ठेवण्याची शिफारस करण्यात आली होती. तिने २ ते ३ वर्षे खेळ सोडला पण पुन्हा नव्याने प्रशिक्षण घेण्यास सुरू केली.

यावेळी प्रशिक्षकांचा पाठींबा नव्हता, तरीही ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यती भाग घेतला. यावेळी आलेल्या शारीरिक अडचणींवर मात करत पुढे खेळाची आवड जपली. यावेळी नित्याच्या वडिलांनी तिला मोलाची साथ दिली. तिच्या वडिलांनी त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी कोईम्बतूरच्या रस्त्यावर ऑटो-रिक्षा चालवली.

पटियाला येथील भारतीय शिबिरासाठी निवड झाल्यानंतर तिने पुढील ४ वर्षे कठोर प्रशिक्षण घेतले. तिच्या प्रशिक्षकांनी ४०० मीटर अडथळ्यांच्या शर्यतीत तिची क्षमता ओळखली. तिने त्यांना तिच्या गुडघ्यासंबंधीत असलेल्या समस्यांबद्दल सांगितले. पण तिने पुन्हा प्रयत्न करायचे ठरवले. गेली अनेक वर्ष तिला गुडघ्यांचा कोणताही त्रास जाणवत नव्हता, म्हणून तिने पुन्हा एकदा खेळात नशीब आजमवण्याचा निर्णय घेतला. पण आठवडाभरातच तिला गुडघ्याचा त्रास पुन्हा होऊ लागला आणि तिला डॉक्टरांकडे धाव घ्यावी लागली.

यावेळी एका नव्या डॉक्टरांनी तिला गुडघ्यासंबंधीत गंभीर त्रासबद्दल सांगितले. तेव्हा एक धक्कादायक गोष्ट समोर आली. ती म्हणजे तिच्या गुडघ्याच्या लिगामेंटला गंभीर दुखापत झाली होती, पण ही गोष्ट तिच्या आधीच्या प्रशिक्षकांनी आणि डॉक्टरांनी लपवून ठेवली होती. पण त्यांनी असे का केले याची तिला खरचं काही कल्पना नाही. तिला या गोष्टींची जर आधीच माहिती दिली असती तर तिने आधीच उपचार घेतले असते असे ती सांगते.

पण या विश्वासघाताने तिची कारकीर्द धोक्यात आली. तिच्या प्रशिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे तिच्या ऍथलेटिक आकांक्षावर पाणी फेरले गेले. आव्हानात्मक परिस्थिती असूनही, नित्याने शस्त्रक्रिया न करता राष्ट्रीय सुवर्णपदक जिंकून २०१९ मध्ये मैदानात परतली. पण भविष्यातील कोणतीही गंभीर परिस्थिती उद्भवू नये म्हणून नित्याने २०२० मध्ये करोना महामारीच्या काळात ऑपरेशन करण्याचा निर्णय घेतला.

जग थांबले होते त्यावेळी तिला चांगल्याप्रकारे बरे होता येईल असे वाटले. पण दुर्दैवाने, हे ऑपरेशन तिच्या आयुष्यातील एक टर्निंग पॉइंट ठरला, खेळामुळे तिचे शरीर १० वर्षांपासून पूर्णपणे बदलले होते पण ऑपरेशनमुळे तिच्या शरीरात आणखी एक नवीन बदल घडून आला. या ऑपरेशनला तिचे शरीर साथ देत नव्हते. ज्यामुळे तिची ऍथलेटिक कारकीर्द संपुष्टात आली असे वाटले.

पण अनेक धक्के पचवत तिने सोशल मीडियावर पोस्टद्वारे लोकांना खेळासाठी प्रेरित केले. याबाबत ती सांगते की, मी अजूनही व्यायाम करते आणि माझ्या शरीराला प्रशिक्षित करते. पण पूर्वी ज्या तीव्रतेने मी व्यायाम करत होती त्या तीव्रतेने ते करु शकत नाही.

तिचे दैनंदिन जीवन अनेक लोकांसाठी प्रेरणादायी ठरते, पण तिने पूर्वी पाहिलेल्या स्वप्नांसाठी ती आता काही करु शकत नाही याची तिला खंत आहे. पण सोशल मीडियाने तिला आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र केले आणि तिच्यासाठी अनेक संधी निर्माण केल्या. पण तिचा खरा आनंद नेहमीच खेळात आहे.

फेब्रुवारी २०१८ मध्ये तिने तिच्या देशासाठी जिंकलेले मेडल तिच्यासाठी एक अभिमानाचा क्षण होता. याविषयी नित्या सांगते की, ‘आय एम वर्थ इट’ “मेडल जिंकल्यानंतर आपल्या देशाचा फडकलेला राष्ट्र ध्वज आठवून आजही माझ्या डोळ्यातून पाणी येते. नित्याप्रमाणे तिची जुळी बहिण विद्या देखील अॅथलीट आहे.

आशियाई खेळ 2023 मध्ये या दोन जुळ्या बहिणींची चर्चा होती. कारण आशियाई क्रीडा स्पर्धेत जुळ्या बहिणींनी एकत्र सहभागी होण्याची ही देशाच्या इतिहासात पहिलीच वेळ होती. या दोन्ही बहिणी आज देशाला नाव लौकिक मिळवून देत आहेत. सध्या नित्या चेन्नईमध्ये आयकर विभागात काम करते सध्या ती चेन्नईमध्ये मल्टी टास्किंग स्टाफ म्हणून तैनात आहे.

आज नित्याचा हा संघर्षमय प्रवास अनेक महिलांसाठी खरचं प्रेरणादायी आहे. कोणीही त्यांच्या स्वप्नांचा पाठलाग करणं सोडू नका, मुख्य म्हणजे स्वतःवर मनापासून विश्वास ठेवा. नेहमी स्वतःला प्राधान्य द्या आणि तुमची स्वप्ने साध्य करण्यासाठी कधीही घाबरू नका. तुमची मेहनत आणि समर्पण तुम्हाला यश मिळवून यावर विश्वास ठेवा.