कोणतेही काम मनापासून आणि तळमळीने केले, तर त्यात यश नक्कीच मिळते. परंतु, ते करण्यासाठी जिद्द, मेहनत व चिकाटीची गरज असते. अनेकदा एखादे काम करताना वारंवार अपयश येईल, समाजाचा विरोध होईल; पण न खचता मेहनत केली, तर मिळणारे यश तुमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आज आम्ही तुम्हाला अशाच एका महिलेविषयी सांगणार आहोत; जिने आपल्या मेहनतीच्या जोरावर ड्रायव्हिंग क्षेत्रात विलक्षण काम केले, तिचे हे धाडस आजच्या पिढीसाठी नक्कीच प्रेरणादायी ठरणारे आहे. तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल की, वयाच्या ७१ व्या वर्षी केरळच्या राधामणी ऊर्फ मणी अम्मा यांच्याकडे एक, दोन नव्हे, तर तब्बल ११ ड्रायव्हिंग लायसन्स आहेत.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
या वयात वेगवेगळ्या ११ प्रकारची ड्रायव्हिंग लायसन्स मिळवीत लहान वाहनांसह अवजड वाहने चालवणे ही काही छोटी गोष्ट नाही. मणी अम्मा जेसीबीपासून क्रेनपर्यंत हेवी ड्युटी मशीन चालवते. द इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना त्यांनी त्यांच्या जीवनातील प्रवासादरम्यानच्या अनेक रंजक गोष्टी शेअर केल्या.
पतीमुळे ड्रायव्हिंग शिकण्याची प्रेरणा
मणी अम्मा यांनी सांगितले की, ड्रायव्हिंग शिकण्याची प्रेरणा त्यांना त्यांच्या पतीकडून मिळाली. वयाच्या ३० व्या वर्षी मी त्यामुळे वाहन चालवायला शिकले. या काळात दोघांनी मिळून जड वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणारी शाळा स्थापन केली. १८८१ मध्ये त्यांनी चारचाकी वाहनाचा परवाना घेतला आणि नंतर १९८४ मध्ये त्यांना अवजड वाहन चालविण्याचा परवानाही मिळाला. त्या काळात केरळमध्ये अवजड वाहनाचा परवाना मिळविणे तसे सोपे नव्हते. त्यांनी कर्नाटकमधील मंगळुरूमधल्या अनेकांना वाहन चालविण्याचे प्रशिक्षण दिले आणि त्यांना परवाने मिळविण्यासाठीही मदत केली.
त्यानंतर मणी अम्मा आणि त्यांच्या पतीने वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देणारी शाळा स्थापन करण्यासंबंधित बाबींचा विविध पातळ्यांवर पाठपुरावा केला. कायदेशीर प्रक्रियेनंतर त्यांना केरळमध्ये पहिली जड वाहन चालविण्याची शाळा स्थापन करण्याची परवानगी मिळाली. अशा प्रकारे मणी अम्मा यांचा ड्रायव्हिंग क्षेत्रात अधिकृतपणे प्रवेश झाला.
पतीचे निधन अन् जबाबदारीचे ओझे
२००४ मध्ये मणी अम्मा यांच्या पतीचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर सुरुवातीला ड्रायव्हिंग स्कूलची जबाबदारी होती. त्यासह अनेक अडचणींचा सामना करावा लागल्याचेही त्यांनी सांगितले. परंतु, खचून न जाता सर्व परिस्थिती त्यांनी व्यवस्थितरीत्या सांभाळली आणि स्वत: ड्रायव्हिंग स्कूलची जबाबदारी घेतली. त्यानंतर त्या ड्रायव्हिंग समुदायाच्या एक नेत्या म्हणून उदयास आल्या. त्यांची AtoZ ड्रायव्हिंग स्कूल पुढे AtoZ ड्रायव्हिंग इन्स्टिट्यूट बनली. तेथे विविध प्रकारचे वाहने, अवजड उपकरणे कशी चालवायची हे शिकवले जाते. योग्य वेळी घेतलेली जबाबदारी पार पाडण्याचा निर्णय त्यांनी सिद्ध करून दाखवला; ज्यामुळे छोटी ड्रायव्हिंग स्कूल आज एका उंचीवर जाऊन पोहोचली आहे.
वयाच्या ७१ व्या वर्षीदेखील त्यांनी शिकण्याची आवड सोडलेली नाही. सध्या त्या मेकॅनिकल इंजिनियरिंग डिप्लोमाचे शिक्षण घेत आहेत. आज वेगवेगळे ११ वाहन परवाने मिळवणाऱ्या त्या भारतातील पहिल्या महिला आहेत.
मणी अम्मा या आज ड्रायव्हिंग कम्युनिटीतील एक मोठे नाव आहे. आज त्या ड्रायव्हिंग शिकणाऱ्या अनेक लोकांसाठी प्रेरणास्थान आहेत. जर तुम्हाला मनापासून एखादी गोष्ट हवी असेल आणि कठोर परिश्रम केले, तर ती काहीही करून मिळवता येते.
आपल्या ड्रायव्हिंग क्षेत्रातील संघर्षाविषयी मणी अम्मा सांगतात की, त्यांनी १९८१ मध्ये चारचाकी वाहनाचा परवाना मिळवला. त्यानंतर १९८३ मध्ये जड वाहनाचा परवाना घेतला. या काळात त्यांनी कार, दुचाकी, तीनचाकी, बस, लॉरी, ट्रेलर, क्रेन, ट्रॅक्टर यांसह विविध वाहनांचे परवाने घेतले. इतकेच नाही, तर फोर्कलिफ्ट्स, एक्साव्हेटर्स व रोड रोलर्स चालविण्याचाही परवाना त्यांनी मिळवला.
त्याबाबत पुढे त्या सांगतात की, त्यांनी २०२२ मध्ये धोकादायक वस्तू वाहून नेणाऱ्या वाहन चालविण्याचाही परवाना मिळवला. लहान वाहनांपेक्षा मोठी वाहने चालविणे काहीसे सोपे असते. आपल्या देशात अनेक लोकांकडे ड्रायव्हिंग लायसन्स आहे; पण भीतीमुळे किंवा संकोच करीत ते वाहन चालवणे टाळतात. अशा लोकांना त्या सांगतात की, जर तुम्हाला खरोखर एखादी गोष्ट करायची असेल, तर विश्वास आणि जिद्दीने तुम्ही ती साध्य करू शकता. अशा असंख्य लोकांना न डगमगता, गाडी चालवण्यास प्रेरित करताना त्यांना आनंद होतो.
ड्रायव्हिंगवरील प्रेम, शिक्षण, व्यवसाय यात कशा प्रकारे समतोल साधला, या प्रश्नावर मणी अम्मा म्हणाल्या की, नवीन क्षितीज शोधणे आणि त्यासाठी सखोल ज्ञान मिळवणे याबाबत मी नेहमीच उत्सुक असते. मी वयाच्या ७२ व्या वर्षी माझा मेकॅनिकल इंजिनियरिंग डिप्लोमा यशस्वीरीत्या पूर्ण केला आहे. अशी एक प्रचलित धारणा आहे की , काही यशाना वयोमर्यादेचे बंधन असते. मी प्रथम त्या कल्पनेला आव्हान देण्याचे आणि उलथून टाकण्याचे ध्येय ठेवले, त्यांच्या मते शिकणे हा एक शाश्वत प्रवास आहे.
केरळमध्ये येणारे जवळजवळ प्रत्येक प्रकारचे वाहन त्यांनी चालवले आहे. तसेच त्यांना दिसणारी अनेक वाहने चालवून बघण्याचीही त्यांची इच्छा आहे. मणी अम्मा यांनी याच ड्रायव्हिंगच्या आवडीखातर बोटदेखील चालवली आहे.
पण, ट्रेनचे चालविण्याचे त्यांचे एक स्वप्न अपूर्ण राहिल्याचे त्या सांगतात. परवाना मिळवण्यातील गुंतागुंत, विविध नियम व वयोमर्यादा यांमुळे हे स्वप्न आता पूर्ण राहील, असे त्यांना वाटते.
ड्रायव्हिंग या पुरुषप्रधान क्षेत्रात प्रवेश करू इच्छिणाऱ्या इतर महिलांना त्या सल्ला देत म्हणाल्या की, ड्रायव्हिंग क्षेत्र हे कोणत्याही विशिष्ट लिंगीय व्यक्तीसाठी आहे, असं मानू नका. पूर्वी ड्रायव्हिंगकडे उपजीविकेचे साधन म्हणून पाहिले जात होते; परंतु आता विविध व्यवसायांतील व्यक्ती लिंगभेद विचारात न घेता, आवड म्हणून ड्रायव्हिंग शिकतात. वाहन चालविणे ही आता स्त्री आणि पुरुष दोघांचीही गरज मानली जात आहे. ज्यांच्याकडे ड्रायव्हिंगचे कौशल्य आहे, त्यांच्याकडे हे कौशल्य नसलेल्या लोकांपेक्षा लक्षणीय संधी आहेत. त्यामुळे स्त्री-पुरुष अशा लिंगभेदाची पर्वा न करता, प्रत्येकानं या क्षेत्रात प्रवेश करण्याचा विचार केला पाहिजे, असे त्यांचे मत आहे.