डॉ स्मिता प्रकाश जोशी

” रमा ,तुझ्या घरची आजची भिशीची पार्टी खूपच छान झाली.प्रत्येक वेळी काहीतरी नावीन्य असतं तुझं. आजचा तो गुजराती हांडवो तर खूपच छान झाला होता, पण आजही तुझी सुनबाई भेटली नाही”

During the blockade gold and silver worth six crores were seized Pune news
नाकाबंदीत पावणेसहा कोटींचे सोने, चांदी जप्त; ओैंध परिसरात कारवाई
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maharashtra, Delhi Politics, Small State,
लिलीपुटीकरण…
maharashtra vidhan sabha elections 2024, Rajura,
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर थेट आंदोलन न करणाऱ्या ॲड. चटप यांना मतदार स्वीकारणार का?
maharashtra assembly elections 2024 security need in maharashtra
‘सेफ’ राहण्यासाठी, एक होण्यापेक्षा…
pune vada pav crime news
पुणे: गार वडापाव देताच डोके गरम झाले, ग्राहकाची विक्रेत्याला मारहाण
ajit pawar
पिंपरी: अजित पवारांच्या पक्षाच्या देहू शहराध्यक्षाच्या मोटारीतून रोकड जप्त
young woman arrested for stealing, shopping,
सराफी पेढीत खरेदीच्या बहाण्याने चोरी करणाऱ्या तरुणीसह साथीदार गजाआड; पुणे, मुंबई, ठाण्यात चोरीचे गुन्हे

तिला भेटण्याचा योग आता कधी येणार, कोण जाणे”

रमाताईंच्या सर्व मैत्रिणी भिशीची पार्टी संपवून घरी निघाल्या आणि सर्वांना टाटा बायबाय करून त्या घरात परतल्या पण मनातल्या मनात खूपच रागावल्या होत्या. मी शेजारीच रहात असल्याने त्यांच्या मदतीला थांबले होते, स्वतः च्या मनातील भावना त्यांनी माझ्यासमोर व्यक्त करायला सुरूवात केली,

” बघ, आज पुन्हा एकदा माझ्या मैत्रिणींसमोर मला माझी मान खाली घालावी लागली. एक महिना अगोदर पूर्वसूचना देऊनही हिला स्वतःची काम अॅडजस्ट करता आली नाही ? महत्वाची मीटिंग आहे असे सांगून निघून गेली, सासूच्या एका कार्यक्रमासाठी ती वेळ काढू शकत नाही? रविवार बघून सगळं नियोजन केलं होतं ना, तरीही तिचं काम निघालच. सासूच्या शब्दाला काही महत्वच नाही का?

काही बोलायला गेलं तर राग अगदी नाकाच्या शेंड्यावरच असतो. हल्ली तर माझ्याशी नीट बोलतच नाही. घरातल्या कामात मी सर्व किती सांभाळून घेते. नीट स्वयंपाकही तिला करता येत नाही. घरात पसारा असतो तरीही मी काही बोलत नाही, सर्व कामं मीच करते. मी तिला अगदी मुलीसारखं वागवलं तरी तिनं मला आई मानायला हवं ना?, लग्न झाल्यानंतर मुलीनं बदलायला हवं हे तिला समजतच नाहीये, आता तू तरी तिला समजावून सांग”

रमाताईंच्या मुलाचं सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेलं. मुलगा सिव्हिल इंजिनिअर तर सुनबाई इंटेरिअर डिझायनर आहे. मंजिरी अतिशय उत्साही आणि बोलघेवडी आहे, तिच्या कामातही ती तरबेज आहे. लग्न झाल्यानंतर सुरुवातीला रमाताई नातेवाईकांमध्ये आणि त्यांच्या सर्वच मैत्रिणींमध्ये मंजिरीचे खूप कौतुक करीत पण आता दोघींचे कुठल्यातरी कारणांवरून खटके उडू लागलेत. स्वयंपाक घरात मंजिरीला शिरकाव नाही कारण तिनं तिच्या पद्धतीने केलेला स्वयंपाक रमाताईंना चालत नाही आणि त्यांच्या पद्धतीने तिला करता येत नाही. रुखवतामध्ये मंजिरीने घेतलेली नवीन भांडी रमाताईंना वापरायची नाहीत कारण त्यांना त्यांच्या भांड्यांचीच सवय झाली आहे, प्रत्येक वस्तू जिथल्या तिथंच पाहिजे हा त्यांचा दंडक आणि या चौकटीत मंजिरीला बसता येत नाही. यामध्ये घुसमट दोघींचीही होत आहे. आजही मंजिरीची मीटिंग अचानक ठरली तिला तिच्या व्यवसायाच्या दृष्टीने ती रद्द करणं शक्य नव्हतं हे ती सकाळीच माझ्याशी बोलली होती पण याबाबतीत रमाताई तिला समजून घ्यायला तयार नव्हत्या.

लग्न झाल्यानंतर मुलींना बदलावं लागतं, हे रमाताईंचं खरं असलं तरी केवळ मुलींना बदलून चालत नाही तर घरात येणाऱ्या नवीन सुनेला अजमावून घेण्यासाठी सासरच्या घरातल्यांनीही बदलणं गरजेचं असतं हे रमाताईंना सांगणही गरजेचं होतं

” रमाताई, तुम्हांला खरं सांगू का, सासू ही सुनेच्या मनात कधीच तिच्या आईची जागा घेऊ शकत नाही, त्यामुळे तिची आई वगैरे होण्याच्या फंदात तुम्ही पडूच नका”

“अगदी खरं बोलतेस तू. सुनेसाठी कितीही केलं ना तरी पालथ्या घड्यावर पाणी” इति रमाताई

त्यानंतर एक सासू म्हणून त्यांनी त्याचं सर्व पुराण माझ्यासमोर सुरू केलं, शेवटी मी मधेच त्यांना थांबवलं,

“रमाताई, घरातलं सर्व वातावरण चांगलं व्हावं आणि तुमचं आणि मंजिरीच नातं चांगलं व्हावं असं तुम्हाला वाटतंय ना?”

“हो ग खरंच वाटतंय, काहीतरी अशी जादू घडायला हवी’ त्या असे बोलल्यावर मला चांगली संधी मिळाली.

” अहो, मग ही जादू तुमच्याकडंच आहे. तुम्ही आई होण्यापेक्षा तिची मैत्रीण व्हा. तिच्या पद्धतीचा स्वयंपाक तुम्हीही खायला शिका. नवा गडी नवा राज होऊ दे घरात. तुमची मदत तिला हवी असेल तर तुम्ही कराच पण मदत नको असेल तर लुडबुड करू नका, तिच्याबरोबर बसून तिच्या डिझाइन मध्ये इंटरेस्ट घ्या. कधीतरी बाहेर जाणं, घरी पार्सल मागवणं तुम्हीही एन्जॉय करा ,तिच्या भाषेत ‘चील’ मारा, कधी तुमचं तर कधी तिचं असं चालू राहू दे. आपल्याच घरात राहून आपल्याला अलिप्त राहणं अवघड असलं तरी ते गरजेचं असतं. नवीन पिढीबरोबर रहायचं असेल तर प्रवाहाबरोबर पुढं जावं लागतं, तरच जगण्यातला आनंद घेता येतो. मुलांचं लग्न झाल्यानंतर फक्त सुनेला नाही तर ,तुमच्या स्वभावातील आणि वागण्यातील बदल तुम्हालाही करावे लागतील. काही गोष्टी तुम्हालाही सोडव्या लागतील. तुमच्या म्हणण्यानुसार सगळ्या गोष्टी होणारचं नाहीत, पण याचा स्वीकार तुम्हालाही करावा लागेल नात्यांमध्ये अटॅचमेंट जेवढी महत्त्वाची तेवढीच डिटॅचमेंट गरजेची हे लक्षात घ्याल तर तुम्हीही आनंदी व्हाल”

“तू म्हणतेस ते खरंय, माझ्या आयुष्यात मला माझ्या पद्धतीनं संसार कधी करताच आला नाही. मन मारून जगावं लागलं. सर्व आवडीच्या गोष्टींकडे पाठ फिरवावी लागली, मनमोकळं कधी वागताच आलं नाही पण जे सुख मला मिळालं नाही ते मी माझ्या सुनेला नक्की देणार. तिच्या करिअरमध्ये तिला मदतही करणार आणि डिटॅच व्हायलाही शिकणार, धन्यवाद, आज ही जाणीव तू मला करून दिलीस”

रमाताईंच्या मनातला राग गेलाच पण एक वेगळ्या उत्साहाने त्यांचं मन भरून आलेलं मी पाहिलं.

(लेखिका समुपदेशक आहेत. )