हे शीर्षक वाचून तुम्हाला सर्वप्रथम काय आठवतं? आता जे पन्नाशीचे असतील त्या बॉलिवूडप्रेमींना ‘सत्यम् शिवम् सुंदरम्’ किंवा ‘राम तेरी गंगा मैली’ आठवल्याशिवाय राहणार नाही! (पडद्यावर जे निश्चितपणे विकलं जाईल, ते ‘फॅमिली एन्टरटेनमेंट’च्या साजूक वेष्टनात बेमालूम गुंडाळून सादर करण्याच्या कलेचा परिपाठ होता तो.) आजही अधूनमधून विविध अभिनेत्री आणि सोशल मीडियावरच्या तारका ‘सत्यम् शिवम्’ लूक ‘रीक्रिएट’ करत असतात. ब्लाऊजशिवाय अतिशय ‘ग्लॅमरस’, ‘सेक्सी’ पद्धतीनं नेसलेली साडी (त्यातही खास करून पांढरी साडी!) हे या लूकचं वैशिष्ट्य. तेव्हा आपली एकंदरीत कलेक्टिव्ह मानसिकता पाहता ‘ब्लाऊजलेस’ या शब्दावरून स्त्रीदेहाचं लैंगिक दृष्टिकोनातून केलं जाणारं चित्रण मनात उभं राहिल्यास नवल नाही. पण हेही लक्षात असू द्या, की स्त्रियांनी ब्लाऊजशिवाय साडी नेसणं हे भारतीय पोषाख परंपरेच्या इतिहासाला नवीन नाही आणि या गोष्टीकडे नेहमीच सगळ्यांकडून ‘सेक्शुअल’ भावनेतून पाहिलं जात नव्हतं.

आणखी वाचा : झोपू आनंदे : ‘गुडाकेश’ व्हायचंय?

maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
mahavikas aghadi release manifesto
महिलांना तीन हजार, मोफत बसप्रवास ते प्रत्येकी ५०० रुपयांत सहा गॅस सिलिंडर; मविआच्या जाहिरनाम्यात घोषणांचा पाऊस!
Congress president Mallikarjun Kharge criticism of BJP
‘बांटना और काटना’हे भाजपचे काम – खरगे
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’
Mallikarjun Kharge criticize BJP in nagpur
“बाटना और काटना हे भाजपचे काम” मल्लिकार्जुन खरगे यांची टीका
maharashtra vidhan sabha election 2024, rashtrawadi congress sharad pawar,
पूर्व नागपुरात राष्ट्रवादीसमोर अडचणींचा डोंगर

हे आता सांगण्याचं कारण म्हणजे ‘इन्स्टाग्राम’वर अनेकांचं लक्ष वेधून घेतलेली ब्लाऊजशिवाय साडी नेसण्याची सत्रं. हा कुठला ‘सॉफ्ट पॉर्न’ प्रकार असावा असं तुम्हाला वाटलं असेल, तर तसं नाहीये! नताशा ठसन (Natasha Thasan) ही टोरांटोस्थित इन्स्टा-टिकटॉक इन्फ्लूएन्सर (किंवा तिच्या भाषेत ‘साडी आर्किटेक्ट’) आगळ्यावेगळ्या प्रकारे साड्या नेसून दाखवते. (उदा. ब्लाऊजशिवाय साडी, परकरशिवाय साडी, ‘इव्हिनिंग गाऊन’ साडी, ‘बिकिनी’ साडी वगैरे.) त्यातला ‘ब्लाऊजलेस’ हा प्रकार लक्षवेधी ठरला आहे. नताशा मूळची तमिळ असून साडी नेसण्याच्या तमिळी पद्धतींबरोबरच विविध साडी ड्रेप्स आधुनिक, स्टायलिश आणि ग्लॅमरस पद्धतीनं सादर करण्यावर तिचा भर आहे.

आणखी वाचा : विवाह समुपदेशन : सासर-माहेरची सांगड घालायचीय?

या निमित्तानं समाजमाध्यमांवर व्यक्त होणाऱ्या तरूणांच्या प्रतिक्रिया वाचण्याजोग्या आहेत. ब्लाऊज हा प्रकार म्हणजे पारंपरिक भारतीय पोषाखावरचा ‘इंग्रजी अंमल’ असल्याचा मुद्दा नताशासारखे काही नेटकरी लावून धरताहेत, तर त्याचा प्रतिवाद करणाऱ्यांचं म्हणणं असं, की साडीवर ब्लाऊज घालणं वा न घालणं यात भारतात खोलवर रुजलेल्या जातीव्यवस्थेचाही मोठा वाटा होता. त्रावणकोर संस्थानातल्या निम्नवर्गीय स्त्रियांना कमरेच्या वरचा भाग झाकण्याची परवानगी नसण्याबाबत त्यांनी उठवलेला आवाज आणि नांगेली या स्त्रीनं या अधिकारासाठी दिलेल्या बलिदानाची कथा, यांची आठवणही लोक करून देत आहेत. एक मुद्दा मात्र ‘ब्लाऊजलेस’च्या निमित्तानं मान्य केला जातोय, तो म्हणजे सध्या साडीवर ज्या पद्धतीचा ब्लाऊज घालण्याची फॅशन रूढ आहे, ती काही मूळची भारतीय पद्धत नव्हे आणि आपल्याकडे आपले असे काही चांगले ब्लाऊजलेस ड्रेप्स होते.

आणखी वाचा : प्रायव्हेट पार्टचा सैलपणा, जळजळ घालवण्यासाठी गरम पाण्यात मीठ घालून आंघोळ करावी का? तज्ज्ञ सांगतात…

जुन्या काळात साडी अशी गुंडाळली जाई, की तिनं ब्लाऊजशिवायही अंग झाकलं जायचं. आताच्या ब्रा किंवा ब्रालेटच्या वळणाचे (कंचुकी पद्धतीचे) ब्लाऊजही वापरले जात होते. भारताच्या विविध भागांमध्ये, विविध समाजांमधल्या स्त्रिया अगदी आतापर्यंत (म्हणजे आता तरूण असलेल्या मुलांमुलींच्या आज्यांच्या काळापर्यंत) ब्लाऊजशिवायसुद्धा साड्या नेसून कम्फर्टेबली वावरू शकत होत्या. विशेषत: दक्षिण, मध्य आणि पूर्व भारतात आजही गावांमधल्या काही आजीबाईंच्या नेसण्यात ब्लाऊजलेस ड्रेप दिसतो. आता रूढ झालेली साडीवरच्या ब्लाऊजची फॅशन भारतात रुजण्यात रवींद्रनाथ टागोर यांच्या बंधूंची- सत्येंद्रनाथ टागोर यांची पत्नी ज्ञानदानंदिनी देवी यांचा मोठा वाटा असल्याचं मानतात. आधुनिक समाजात साडी नेसून मोकळेपणे वावरणं ब्लाऊज या प्रकारामुळे स्त्रियांसाठी सोपं झालं आणि साडीचा मूळचा लूक बराच बदलला, हेही खरंच.

जुन्या पद्धतीची आठवण जागवत काही साडीप्रेमी तरूणी ब्लाऊजलेस ड्रेप आत्मसात करून आपले फोटो वा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर अपलोड करताना दिसताहेत. अर्थातच या फोटोंमध्ये जसा ब्लाऊजलेस साडीचा साधा- ‘नॉन ग्लॅमरस’ लूक आहे, तसाच ‘सेक्सी’ म्हणवणारा अवतारही आहे. एक गोष्ट या आगळ्या ‘ट्रेण्ड’मध्ये जाणवतेय, ती अशी, की तरूण स्त्रिया आणि पुरूषही मोकळेपणानं या विषयाकडे बघताहेत. मुख्य बाब जाणवलेली ही, की नताशासारख्या मुलींनी ब्लाऊजलेस साडी नेसून फोटो पोस्ट केले, म्हणून त्यांना लगेच ‘ट्रोल’ करण्यापेक्षा आणि संस्कृती, संस्कार वगैरेंबाबत बोल सुनावण्यापेक्षा भारतीय पोषाख परंपरा आणि बदल, यावर कमेंटस् मध्ये चर्चा होताना दिसतेय, लोक आपापली मतं खुलेपणे मांडताहेत, इतिहासाबद्दल माहिती सांगताहेत… हाही एक चांगला बदलच!