घामामुळे आपल्या शरीराला दुर्गंधी येते. विशेषत: काखेत येणाऱ्या घामामुळे तर ही दुर्गंधी नकोशी वाटते. कित्येक स्त्रियांना यामुळे स्लीव्हलेस ड्रेस किंवा ब्लाऊजही घालता येत नाहीत. पार्टी ड्रेस निवडतानाही पंचाईत होते. चारचौघांत गेल्यावर जर घामामुळे काखा ओल्या दिसत असतील किंवा दुर्गंध येत असेल तर विचित्र किंवा लाजिरवाणं वाटतं. कोणाच्या जवळ जाऊन बोलायचंही टेन्शन येतं. ऑफिसला जाता-येताना बस, लोकलच्या गर्दीमध्ये हातही वर करता येत नाहीत. तुम्ही घरात असाल आणि घरातली कामं करताना अशी दुर्गंधी येत असेल तर चिडचिड होते. उन्हाळ्यात तर ही परिस्थिती आणखीनच वाईट होते. ही दुर्गंधी दूर करण्यासाठी खास स्त्रियांसाठी म्हणून रोल ऑन स्प्रे किंवा डिओड्रंट्सही उपलब्ध आहेत. पण त्यांचाही काही तासांपुरताच उपयोग होतो. जेव्हा आपल्या शरीरातून घाम बाहेर निघतो तेव्हा आपल्या त्वचेच्या पृष्ठभागावर असलेले काही जंतू या घामाचं अॅसिडमध्ये रुपांतर करतात, त्यामुळेच अत्यंत तीव्र असा दुर्गंध येतो.
आणखी वाचा : तासभराच्या प्रवासात मला पहिल्यांदाच भेटलेली ‘ती’!
अंडरआर्म्समधून जर अशी ही खूप जास्त दुर्गंधी येत असेल तर त्यामागे काही आरोग्याविषयक कारणंही असू शकतात. खरंतर या दुर्गंधीवर काही घरगुती उपाय नक्की आहेत. त्याचा फायदा होतोच. पण खूप जास्त दुर्गंधी येत असेल तर डॉक्टरचा सल्ला मात्र नक्की घ्या. ही दुर्गंधी येण्यामागची काही कारणे पाहूया
१. तुमच्या प्रकृतीमुळे/ अनारोग्यामुळे घाम जास्त घाम येऊ शकतो
२. तुम्ही घेत असलेल्या काही औषधांमुळे शरीरातून घाम बाहेर पडण्याचे प्रमाण वाढते.
३. व्यायाम केल्यावर किंवा बाहेरून आल्यानंतर लगेचच कपडे बदलले नाहीत तरदेखील दुर्गंध येतो
४. व्यवस्थित आंघोळ न केल्यास
आणखी वाचा :
५. लसूण आणि कांदा जास्त खात असल्यासही काखेतून दुर्गंधी येते
६. हार्मोन्समधील बदल हेही महत्त्वाचं कारण असू शकतं.
ही दुर्गंधी कमी करण्यासाठीचे काही घरगुती उपाय पाहूया-
सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे भरपूर पाणी प्या. उन्हाळ्यात तर एरवीपेक्षाही जास्त पाणी प्यायलं हवं. तुम्हाला अंडआर्म्सच्या दुर्गंधीचा जास्त त्रास होत असेल तर सुती कपडे घालणं हेच उत्तम आहे. उत्तम ब्रॅण्ड्स आणि फॅशनचे कॉटनचे चांगले कपडे मिळतात. सुती कपड्यांमध्ये घाम जास्त शोषला जातो. त्यामुळे हा त्रास कमी होऊ शकतो. अति घट्ट कपडे घालू नका. सैलसर कपडे वापरा.
आणखी वाचा : United Nations भारतीय महिला लष्करी अधिकाऱ्यांची ‘ब्लू हेल्मेट’ सूदानमध्ये तैनात!
१. अॅपल साईडर व्हिनेगर-
अॅपल साईडर व्हिनेगरचे अनेक उपयोग आहेत. अंडरआर्म्सच्या दुर्गंधीवरही हा हमखास उपाय ठरू शकतो. एक कप व्हिनेगर अर्ध्या कप पाण्यात मिसळा. हे पाणी एका स्प्रेच्या बाटलीत भरा आणि रोज रात्री झोपण्याआधी हा स्प्रे अंडर आर्म्सवर मारा. सकाळी कोमट पाण्याने ते धुऊन टाका.
२. सैंधव मीठ-
सैंधव मीठ स्त्रियांसाठी अत्यंत गुणकारी आहे. अंडरआर्म्सची दुर्गंधी घालवण्यासही सैंधव मीठ उपयुक्त ठरते. एका बादलीमध्ये कोमट पाणी घ्या, त्यात थोडं सैंधव मीठ घाला. पाण्यात चांगलं मिसऴू द्या आणि या पाण्यानं आंघोळ करा. सैंधव मिठामुळे क्लिन्जिंग होतं. तसंच अतिरिक्त घामही यामुळे कमी होतो.
३. लिंबू आणि बेकिंग सोडा
अंडरआर्म्समधून खूप दुर्गंधी येत असेल तर दोन चमचा बेकिंग सोडा घ्या आणि त्यात एक चमचा लिंबाचा रस एकत्र करून पेस्ट तयार करा. ही पेस्ट अंडआर्म्सना गोलाकार मसाज करत लावा. १० मिनिटं तरी हा मसाज करा. त्यानंतर पाण्याने धुऊन टाका. अंडरआर्म्सची दुर्गंधी घालवण्याचा हा एक खात्रीशीर उपाय आहे.
- टोमॅटोचा रस
टोमॅटोनं त्वचेचा रंग उजळतो हे आपल्याला माहिती आहेच. पण अंडरआर्म्सच्या दुर्गंधीवरही हा चांगला उपाय आहे. टोमॅटोच्या रसात लिंबाचा रस मिक्स करा आणि हा रस 10 मिनिटं तुमच्या काखेत लावून ठेवा. नंतर गार पाण्याने धुऊन टाका.
आणखी वाचा : ये है मॅरेथॉन मेरी जान!
५. बटाटा
आपल्या स्वयंपाकघरात बटाटा असतोच. बटाट्याचे पातळ काप करा आणि ते अंडरआर्म्सवर 30 मिनिटं रगडा. त्यानंतर ते पाण्यानं धुऊन टाका.
६. खोबरेल तेल
आपल्या रोजच्या वापरातल्या खोबरेल तेलानं अंडरआर्म्सला १५ मिनिटे मसाज करा. त्यानंतर ३० मिनिटे ते तसेच राहू द्या. नंतर पाण्याने स्वच्छ धुऊन टाका. टॉवेलने अंडरआर्म्स पुसून घ्या.
७. कोरफड
त्वचेसाठी कोरफड अत्यंत गुणकारी असते हे आपल्याला माहिती आहे. अंडरआर्म्सची दुर्गंधी घालवण्यासाठी कोरफड गुणकारी आहे. कोरफडीचं जेल अंडरआर्म्सला 30 मिनिटं लावून ठेवा. नंतर पाण्याने धुऊन टाका आणि अंडरआर्म्स स्वच्छ पुसून घ्या.
- लव्हेंडर ऑईल
एका स्प्रे च्या स्वच्छ बाटलीमध्ये अर्धा कप पाण्यात 4 थेंब लव्हेंडर ऑईलचे टाकून ते चांगलं मिक्स करून घ्या. हे मिश्रण चांगलं हलवा. झोपण्याआधी अंडरआर्म्सवर हा स्प्रे वापरा. पूर्ण रात्र तसाच राहू द्या. सकाळी कोमट पाण्याने अंडरआर्म्स धुऊन टाका.
- गुलाबपाणी
अंडरआर्म्सवर गुलाबपाण्याच्या स्प्रेचा वापर करा. यामुळे खूप फायदा होईल. तुम्ही आंघोळीच्या पाण्यातही गुलाबपाण्याचे काही थेंब मिसळू शकता.
तुम्हाला खूपच घाम येत असेल तर डिओड्रंटऐवजी अँटीपर्सपिरेंटचा वापर करा. डिओमुळे दुर्गंधी फक्त दाबली जाते. पण अँटीपर्सपिरेंट घाम कमी करण्याचं काम करतो. यामुळ अंडरआर्म्समधील घामाच्या ग्रंथी ब्लॉक होतात आणि घाम कमी येतो.
(शब्दांकन : केतकी जोशी)