‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची सध्या सर्वत्र चर्चा सुरु आहे. स्टेशन, बस स्टॉपपासून ते रिल, सोशल मीडिया सर्वच ठिकाणी ‘बाईपण भारी देवा’बद्दलच चर्चा आहे. ते पाहून मला खरंतर खूप आनंद झाला होता. कारण इतक्या दिवसांनी खूप चांगला मराठी आणि त्यातही कुटुंबाबरोबर एकत्र पाहावा असा चित्रपट प्रदर्शित झाला. खरंतर आई-बाबांबरोबर पहिल्या आठवड्यातच हा चित्रपट पाहायचा होता. मात्र ते काही जमलं नाही. त्यानंतर सर्वच चित्रपटगृहात हाऊसफुलचा बोर्ड पाहायला मिळाला.

माझे आई-बाबाही हा चित्रपट पाहायला जायचं, म्हणून मागे लागले होते. पण काय करणार गेले काही दिवस सर्वच वीकेण्डचे शो हाऊसफुल्ल! आता काय? शेवटी काल कशीबशी मला दोन तिकीटं मिळाली आणि त्या दोघांनी चित्रपट पाहिला. ‘बाईपण भारी देवा’ पाहून आई-बाबा दोघेही घरी आले आणि मी त्या दोघांनाही चित्रपट कसा वाटला असे विचारले. त्यावर माझी आई हसत हसत म्हणाली, खूप मस्त चित्रपट आहे. आपण पुन्हा एकदा एकत्र पाहायला जाऊया. पण माझ्या बाबांची प्रतिक्रिया मात्र फारच बोलकी होती, ते म्हणाले; बेटा चित्रपट मस्तच होता. त्यात स्त्रियांबद्दल दाखवण्यात आलेली एकूण एक गोष्ट मनाला पटली. पण केदार शिंदेंनी कधीतरी भविष्यात पुरुषांवरही चित्रपट काढावा.
आणखी वाचा : Open letter : माय डिअर सासूबाई तुम्हीही कधीतरी… तुमच्या होणाऱ्या सुनेचे खास पत्र

International Mens Day
पुरुषाचं घर, घरचा पुरुष
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Maharashtra government schemes for women,
लाडक्या बहिणींनो, कोणी तुमच्यावर उपकार करत नाही…!
pravin tarde shares special post on the occasion of wife snehal tarde
“स्वतःचं घरदार आणि संसार सांभाळून…”, प्रवीण तरडेंची पत्नी स्नेहलसाठी खास पोस्ट! मोजक्या शब्दांत व्यक्त केल्या भावना
Tragic Video! Devotee Collapses And Dies Of Heart Attack While Circumambulating Pillar At Hyderabad Temple
बिनभरवशाचं आयुष्य! देवाच्या दारात तरुणाला मृत्यूनं कवटाळलं; VIDEO पाहून नेटकरी म्हणाले “देवालाही दया आली नाही”
saif ali khan threat inter religion marriage
आंतरधर्मीय विवाहामुळे सैफ अली खानला मिळाल्या होत्या धमक्या; स्वतः खुलासा करत म्हणालेला, “आमच्या घराजवळ…”
Lakhat Ek Aamcha Dada
चांगले वागण्याचे नाटक करून डॅडींचा सूर्याला फसविण्याचा प्लॅन; प्रोमो पाहताच नेटकरी म्हणाले, “तुमचं पोरगं आणि तुम्ही…”

पुरुषही खूप काही करतात, त्यांच्या जीवनातही बऱ्याच अडी-अडचणी असतात. घराची काळजी, पत्नीची हौस-मौज, मुलांचं शिक्षण, त्यांचं करिअर, आई-वडिलांची जबाबदारी, त्यांची दुखणी या सर्वांकडे एका स्त्रीबरोबर पुरुषही तितक्याच गंभीरतेने पाहात असतो. फक्त तो काही बोलत नाही इतकच! बाबांचे हे वाक्य ऐकलं आणि दोन मिनिट शांत बसले. एका मुलीपेक्षा स्त्री म्हणून ती वाक्यं मनाला जास्त लागली आणि पटलीही. रात्री झोपतेच मी या गोष्टींचा विचार करु लागले. माझ्या वडिलांचं वय ५० ते ५५ दरम्यान…

गेल्या २५ वर्षांपासून मी त्यांना पाहते. त्यांनी इतक्या वर्षात बऱ्याच अडचणींचा सामना केला आहे. आम्हाला शाळेत घालण्यापासून ते आमचं करिअर सेट होईपर्यंत अनेक गोष्टींकडे त्यांचं कायमच बारीक लक्ष असतं. प्रसंगी ते ओरडतात, रागवतात. पण ते आईसारखं सतत व्यक्त होत नाहीत इतकंच!

आणखी वाचा : Open Letter : तुझा जीव कसा कळवळला नाही? आईचे तुकडे करणाऱ्या रिंपलला खुलं पत्र

बाबांच्या त्या वाक्यानंतर मला माझ्या लहानपणीच्या ऐकलेल्या सर्वच गोष्टी आठवल्या. स्त्रिया कशा सोशिक असतात, त्या संघर्षमय जीवन जगतात, त्यांना खूप भोगावं लागतं, यांसह अनेक गोष्टी आपल्याला लहानपणापासून सांगितल्या जातात. त्यामुळे ‘बाईपण भारी देवा’ हे आपण निश्चितच म्हणू शकतो.

पण पुरुषांचं आयुष्य भारी नसतं हे बोलणं मात्र चुकीचं ठरेल. पुरुषांच्या आयुष्यात स्त्रीइतका संघर्ष येत नसला, तरी त्यांचं आयुष्य खडतर निश्चितच असतं. असं असलं तरी पुरुषांच्या जीवनावर आधारित एकही चित्रपट निघालेला मला तरी आठवत नाही.

आणखी वाचा : पत्रास कारण की… टिकली! भिडे आजोबांना नातीने लिहिलेलं खुलं पत्र

स्त्रिया रडून मोकळ्या होतात. पुरुषांना अनेकदा रडताही येत नाही. कुटुंबाच्या जबाबदाऱ्या घेण्यापासून मुलांना काय हवं नको ते बघणारा एक पुरुषच असतो. तो कायमच कुटुंबासाठी जगतो. त्याबद्दल कधीच तक्रार करत नाही आणि यात जगणंच विसरुन जातो. याच पुरुषांच्या जीवनावर आधारित एक तरी नाटक किंवा एखादा चित्रपट तरी यायलाच हवा. कारण पुरुषही याच समाजाचा घटक आहे आणि त्यालाही वेदना, दु:ख आणि त्रास हा होतच असतो. त्याचा हाच प्रवास कुठेतरी मोठ्या पडद्यावर दिसावा, त्यातून त्याचा संघर्ष उलगडावा, इतकीच एक मुलगी म्हणून माझी माफक अपेक्षा.