Bakulaben Patel : स्वप्न पूर्ण करण्यासाठी प्रत्येक माणसाच्या मनात फक्त जिद्द असावी लागते. मनात जिद्द असेल तर, आपण कोणतीही गोष्ट सहज साध्य करू शकतो. याचं प्रेरणादायी उदाहरण आहेत बकुळाबेन पटेल. ‘Age is Just a Number’ ही म्हण त्यांना तंतोतंत लागू होते. वयाची पन्नाची ओलांडल्यावर त्यांच्या मनात स्विमिंग शिकण्याची इच्छा निर्माण झाली. आपलं स्वप्न पूर्ण करण्यासाठी बकुळाबेन यांनी दिवसरात्र मेहनत घेतली. आपले कष्ट, जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर बकुळाबेन यांनी आजच्या घडीला एवढा मोठा टप्पा गाठला आहे. त्यांना स्विमिंग चॅम्पियन म्हणून ओळखलं जातं. या बकुळाबेन नेमक्या कोण आहेत… यांच्याविषयी सविस्तरपणे जाणून घेऊयात.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

बकुळाबेन पटेल ( Bakulaben Patel ) मूळच्या सूरतच्या आहेत. त्या लहान असतानाच त्यांच्या आई-वडिलांचं निधन जालं. यामुळे त्यांना शिक्षण देखील थांबवावं लागलं. जवळच्या नातेवाईकांनी त्यांचा काही वर्षे सांभाळ केला. परिणामी त्यांना आपली स्वप्न पूर्ण करता आली नाहीत. बालपणापासून त्यांना खेळाची प्रचंड आवड होती. शालेय शिक्षण सुरू असताना त्यांचं लग्न जमवण्यात आलं. वयाच्या अवघ्या १३ व्या वर्षी लग्न झाल्याने त्या पुढे संसारात रमल्या.

हेही वाचा : अँटालियात झालेलं लग्न, आता रिलायन्समध्ये ‘या’ ब्रँडच्या आहेत सीईओ, ईशा अंबानीशी खास कनेक्शन असलेल्या भक्ती मोदी कोण आहेत?

१९९४ मध्ये बकुळाबेन यांच्या पतीचं निधन झालं. यानंतर त्यांची नातवंडं त्यांच्यासाठी जगण्याचा आधार झाली. बकुळाबेन त्यांच्या नातवंडांना सोडण्यासाठी शाळेत जायच्या. यावेळी त्यांनी नातवंडांना विविध खेळांमध्ये सहभागी होताना पाहिलं. आपल्या नातवंडांकडून प्रेरणा घेऊन बकुळाबेन ( Bakulaben Patel ) यांनी ॲथलेटिक्समध्ये सहभाग घेतला.

भरतनाट्यम विषयात पदव्युत्तर पदवीचं शिक्षण

एकेकाळी त्यांना पाण्यात पोहोण्याची भीती वाटायची. सुरुवातील नदीत पोहोताना त्या बुडाल्या देखील आहेत. पण, प्रयत्न न सोडता महिन्याभरात त्यांनी स्विमिंग शिकून घेतलं. ५८ व्या वर्षी स्विमिंग शिकायला सुरुवात केल्यावर त्यांना एक नवीन धैर्य मिळालं. ५९ व्या वर्षी राष्ट्रीय स्तरावरच्या स्विमिंग स्पर्धांमध्ये त्यांनी सहभाग घेण्यास सुरुवात केला. याशिवाय आजवर त्यांनी १६ देशांमध्ये स्विमिंग केलं आहे. राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर ५०० हून अधिक ट्रॉफी आणि पदकं मिळवण्याचा बहुमान त्यांनी मिळवला आहे. आता त्यांचं वय ८० वर्षे आहे. स्विमिंगशिवाय त्या शास्त्रीय नृत्यातही पारंगत आहेत. त्या सध्या भरतनाट्यम विषयात आपलं पदव्युत्तर पदवीचं शिक्षण पूर्ण करत आहेत.

हेही वाचा : पतीनं बाहेर संबंध ठेवू नये म्हणून पत्नींसाठी चीनमध्ये खास शिबिराचं आयोजन, सोशल मीडियावर लोक म्हणाले…

बकुळाबेन ( Bakulaben Patel ) दररोज पहाटे ४ वाजता उठतात. त्यानंतर पोहोण्याचा सराव करण्यासाठी ५ किलोमीटर दूर चालत जातात. आता त्या स्विमिंग चॅम्पियन म्हणून ओळखल्या जातात. याशिवाय त्या स्विमिंगचं प्रशिक्षण सुद्धा देतात. लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत त्यांच्याकडे सर्व वयोगटातील विद्यार्थी आहेत. या सर्व मुलांसाठी त्यांचा संघर्ष आणि बकुळाबेन यांनी आयुष्यात दाखवलेली जिद्द खूपच प्रेरणादायी आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bakulaben patel 80 years old national level swimmer and bharatnatyam star sva 00