“सानेबाई, आज तुम्ही पुन्हा लेट आलात. या महिन्यातील हा तुमचा चौथा लेट आहे. तुमची एक दिवसांची किरकोळ रजा कापावी लागेल.”

“सर, अहो आज अचानक सासूबाईंची तब्येत बिघडली, ती नॉर्मल झाल्याशिवाय मला घरातून निघता येत नव्हतं.”

Young Guy from Latur Searches for Marriage Partner in Pune biodata paati viral
Video : पुण्यात नोकरी नाही तर पोरगी शोधतोय पठ्ठा! लग्नाचा बायोडाटा घेऊन रस्त्यावर फिरतोय, व्हिडीओ व्हायरल
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
Niv Recruitment 2024 Notification National Institute Of Virology Jobs 31 Vacancies Trade Apprentice Apply Now pune job
पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी; पुण्यातील ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलॉजी’ संस्थेत विविध पदांसाठी भरती; कसा कराल अर्ज जाणून घ्या
Lightning and rain in Diwali What will the weather be like
ऐन दिवाळीत विजांची रोषणाई आणि पावसाची झडही? कसे असणार हवामान?
Sale of panati by female prostitutes thane news
देहविक्री व्यवसायातून बाहेर पडत साकारले “स्वयंरोजगाराचे प्रकाशपर्व”; देहविक्री करणाऱ्या महिलांकडून पणत्यांची विक्री
Vadgaon Sherit Mahayuti was not the candidate for the assembly elections Sharad Pawar group Pune print news
‘इतिहास’ बदलणाऱ्या ‘ या ‘ मतदारसंघाचा ‘वर्तमान’ अस्वस्थ! वडगाव शेरीत महायुतीचा उमेदवार ठरेना; शरद पवार गटाकडून ‘थांबा आणि पाहा’ धोरण
Enrol in a training institute and get a free tablet lure to students from institutes
“प्रशिक्षण संस्थेत प्रवेश घ्या अन् मोफत ‘टॅबलेट’ मिळवा”, संस्थांकडून विद्यार्थ्यांना आमिष
Saras Mahotsavs are canceled during the Diwali period as it is the time of code of conduct for assembly elections thane news
बचत गटांच्या सरस महोत्सवांना आचार संहितेची झळ..! दिवाळी निमित्त होणाऱ्या आर्थिक उलाढालीत यंदा खंड

“तुमची अशी काहीतरी कारणं असतातच. इथं कस्टमरला मला उत्तर द्यावी लागतात, बँकेचे कॅशकाउंटर वेळेतच चालू करावं लागतं, पुन्हा लेट झाला तर तुम्हांला ‘कारणे दाखवा’ नोटीस द्यावी लागेल.”

वनिता साहेबांच्या केबिनमधून बाहेर पडली आणि तिच्या जागेवर जाऊन बसली. आज सकाळपासून तिची एवढी धावपळ चालू होती. पहाटे लवकर उठून पिंकी आणि सोनूचे डबे, त्यांच्या शाळेची तयारी करून दिली, सासू सासरे वयस्कर असल्याने त्यांना त्यांची औषध वेळेवर घ्यावी लागतात म्हणून त्यांचा नाश्ता वेगळा करून दिला. त्यातच सासूबाईंचा बीपी अचानक वाढल्याने गडबड झाली. तरी बरं सुधीरनं आज वर्क फ्रॉम होम घेतलं होतं, पण त्याच्याही मीटिंग चालू होत्या म्हणून त्याला जागेवर सगळं नेऊन द्यावं लागतं होतं. हे सगळं ती एकट्याने करत होती, पण तरीही तिला सर्वांचं ऐकून घ्यावं लागतं होतं.

हेही वाचा… चारात एक… मेकअप पेन!

सासूबाईंची तब्येत हल्ली अधूनमधून बिघडते. त्यांना वाटत होतं, आज तिनं सुट्टी घ्यावी, पण तिच्या या वर्षातील केवळ दोन किरकोळ रजा शिल्लक होत्या, सुट्टी घेणं शक्य नव्हतं, सगळं करता करता उशीर झालाच. कुणाला काही सांगण्यात अर्थ नव्हता.

वनितानं काम चालू केलं नव्हतं नुसतीच विचार करीत बसलेली पाहून प्रतिभा तिच्या जवळ आली, पाण्याची बाटली तिच्या हातात देऊन म्हणाली, “ घे, थंड पाणी, पाणी प्यायल्यावर डोकंही थंड होईल तुझं.”

वनिता नेहमीच घराचं आणि नोकरीचं टेन्शन घेते हे प्रतिभाला माहिती होतं, आणि आत्ता तिला कोणाच्यातरी आधाराची गरज होती, म्हणूनच प्रतिभा तिच्याजवळ येऊन बसली. पाणी प्यायल्यावर वनिता रडायलाच लागली, “प्रतिभा, मी कुणालाच खूष ठेवू शकत नाही गं. घरच्यांना वाटतं मी ऑफिसला आणि माझ्या करिअरला प्राधान्य देते. काल पिंकी मला रागावून म्हणाली, ‘तू आमच्यावर प्रेम करीत नाहीस, आमच्यापेक्षा तुझ्या बँकेवर तुझं जास्त प्रेम आहे. म्हणून तू आमची परीक्षा असेल तरी सुट्टी घेत नाहीस. सुधीर तर नेहमीच काहीतरी टोमणे मारत असतो आणि धावपळ करीत बँकेत यावं तर साहेबांची बोलणी खावी लागतात. त्यांना वाटतं मी नेहमीच घरची गाऱ्हाणी गात राहते. कामात लक्ष देत नाही. मी नोकरीही सोडू शकत नाही आणि घरही सोडू शकत नाही. काय करू?”

हेही वाचा… स्त्रियांचे हक्क आणि मानवाधिकारांसाठी लढणारी लढवय्यी!

“वनिता, अगं तुला काहीही सोडण्याची गरज नाही फक्त मॅनेज करण्याची गरज आहे. तुला वाटतं, माझ्याकडून कोणीही दुखावलं जाऊ नये, म्हणून तू सगळ्याचं सगळं करण्याचा अट्टाहास करतेस. तुला मुलं खूष रहायला हवीत, सासू सासरे आणि नवरा खूष असायला हवा आणि ऑफसमध्येही तुझ्या कामाचं कौतुक व्हायला हवं. साहेबही खूष असायला हवा, असं वाटतं. त्यासाठी तू जीवाचा आटापिटा करतेस, रात्री जागून, पहाटे उठून घरातील कामं पूर्ण करतेस आणि संध्याकाळी ऑफसमध्ये थांबून ऑफिसची सर्व कामं पूर्ण करतेस. हे सर्व करताना तुझी ओढाताण होते, पण मला कुणीही नावं ठेवताच कामा नये, माझ्या प्रत्येक कामात मी परफेक्ट असायलाच हवी या विचारांमुळं तुझ्या मनावर आणखीनच ताण येतो आणि सगळीच कामं बिघडतात-एक ना धड-भाराभर चिंध्या–असं होऊन जातं.

प्रत्येक वेळी प्रत्येकाला तू खूष ठेवूच शकणार नाहीस. त्यामुळं तुला ज्या गोष्टी जमतील, झेपतील तेवढ्याच तू मनापासून कर. नवऱ्याला आणि मुलांना स्वावलंबनाची सवय लाव. सगळ्या गोष्टीत पुढं पुढं करू नकोस. ऑफिसच्या वेळा आपल्याला पाळाव्याच लागणार आहेत. तेथे घरची कारण सांगून काहीच उपयोग होणार नाही, पण ऑफिसमध्येही नीट विचार करून कामांना हो म्हण. साहेबांनी, ऑफिसच्या सहकाऱ्यांनी आपल्याला चांगलं म्हणावं म्हणून जबरदस्तीने कामं ओढवून घेऊ नकोस. तुला सांगितलेली कामं तू पूर्ण करतेसच हे सगळ्यांना माहिती आहे, म्हणून गोड बोलून बरेचजण तुझ्याकडून कामं करून घेतात. या सर्वाचा ताण कळत नकळतपणे तुझ्यावर येतोच. म्हणून ‘नाही’ म्हणायला शीक. घरी गेलीस की फक्त घरचे विचार आणि ऑफसमध्ये आल्यावर फक्त ऑफिसचा विचार करायचे. सगळ्या दगडांवर आपले हात ठेवण्याचा प्रयत्न केला तर कधीतरी हात निसटून कपाळमोक्ष होण्याची शक्यता असते, म्हणून जमेल ते करायचं. एकाच वेळी आपण सर्वांना खूष ठेवू शकत नाही या सत्याचा स्वीकार करायचा आणि ‘सुपर वूमन’ होण्याचा अट्टाहास करायचा नाही.”

हेही वाचा… बहुविकलांगतेवर मात करणारी कृष्णा बंग आता वैद्यकीय शिक्षणात आघाडीवर; माय-लेकीचा प्रेरणादायी प्रवास

प्रतिभा सांगत होती ते वनिताला पटत होतं. तसं वागण्याचा प्रयत्न नक्की केला पाहिजे तर आणि तरच आपली ससेहोलपट कमी होईल, असं तिला वाटून गेलं. ती म्हणाली, “धन्यवाद गुरुमाता, आता सत्संग संपला असेल तर आजच्या कर्तव्यपूर्तीची कर्म करण्यास सुरुवात करू.”

प्रतिभाही मिश्कीलपणे म्हणाली,“यशस्वी हो बालिके.”

आणि दोघीही मनापासून हसल्या आणि आपापल्या कामाला लागल्या.

(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत.)

smitajoshi606@gmail.com