“आज आयुष आणि त्याचा मित्र पुण्यात येणार आहेत जॉब इंटरव्ह्यूसाठी. दोन दिवस राहतील आपल्याकडे.” अमिता शांतपणे सांगत होती, तरी तिच्या मनातला वैताग सौरभला समजला.

सौरभ-अमिताच्या लग्नाला आठ महिने झाले होते. दोघंही मूळचे महाराष्ट्रातल्या जिल्ह्याच्या गावांमधले. नोकरीसाठी बंगळूरुमध्ये असताना ओळख, मैत्री, प्रेम आणि लग्न झालं. काही महिन्यांपूर्वी कंपनीनं सौरभला पुण्याच्या प्रोजेक्टवर ट्रान्सफर केलं, तेव्हा ‘आपल्या’ माणसांत, महाराष्ट्रात राहायचा निर्णय घेऊन अमितानेही पुण्यात जॉब घेतला.

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

पुण्यात घर घेतल्यावर दोघांच्याही गावचे पाहुणे, सासरचे, माहेरचे, मित्र… हक्काने त्यांच्याकडे राहायला यायचे. दोघं प्रेमाने पाहुणचार करायचे, पण चार महिने झाले तरी ‘आपल्या माणसांचा’ ओघ थांबेना तेव्हा अमिता कंटाळली. पोळ्यांच्या बाई बेभरवशी. सौरभ मदत करत असला तरी ‘प्रपंच’ अमितावरच पडायचा. तिचा जॉब नवा होता. डोक्यात ऑफिसच्या कामाचा विचार चालू असायचा. अचानक कुणीतरी येण्याचा मेसेज आला, की घरातलं सामान, प्लॅनिंग, एखादी भाजी करणं, कुकर लावणं असलं काहीतरी मध्ये यायचं. ऑफिसला उशीर, कामावरचा फोकस हलल्यावर चिडचिड व्हायची. ऐन वेळी हॉटेलातून मागवण्याचा खर्चही कमी नव्हता. दोघांनाही माणसांची ओढ असली तरी रोजचा ताण सोसेना.

हेही वाचा… मैत्रिणींनो उद्योग-व्यवसाय करताय?… मग या ७ अर्थविषयक टिप्स वाचाच!

या आठवड्यात अमिताचं एक महत्त्वाचं सबमिशन होतं, तिचं कंपनीतलं भवितव्य त्यावर अवलंबून होतं. त्यात भरीला दोन पाहुण्यांचं करणं अमिताला त्रासदायक होईल, आता पर्याय शोधायलाच हवा हे सौरभला जाणवलं.

“तू जा ऑफिसला. आयुषच्या जेवणाची काळजी करू नकोस. मी बघतो.” सौरभ म्हणाला.

“काय करणारेस तू? खर्च वाढवू नको.” अमिता.

“तुला डेडलाइन आहे ना? नीघ तू.” सौरभ ठामपणे म्हणाला, तशी अमिता निघाली.

बंगळूरुमध्ये संसाराचा असा ताण कधीच वाटला नव्हता. जमेल तसं आपापल्या वेळाप्रमाणे दोघं घरातली कामं करायचे, एकत्र जेवण बनवायचे, कधी ऑर्डर करायचे. फक्त ‘आपलं’ कुणी नाही याची कमतरता जाणवायची.

“इथे आल्यावर ‘आपले’ इतके अति झालेत की झेपेनात…. म्हणजे आपण माणूसघाणे होत चाललोत का?” अमिताला एकदम अपराधीच वाटलं.

हेही वाचा… अतूट नातं-भावा बहिणीचं

‘माहेरी कधी स्वयंपाक करण्याची वेळ आली नाही. अभ्यासाकडेच फोकस होता. गरजेपुरते चार पदार्थ जमतात. सौरभ शाळेपासून हॉस्टेलाइट, घरच्या जेवणाच्या अपेक्षा कमी, दोघांचं मिळून असणारं पाककौशल्य बंगळूरुला असताना पुरलं. इथे पुण्यात इतके पाहुणे, इतकी तारांबळ उडेल असं वाटलंच नव्हतं.’ अशा विचारात अमिता रात्री उशिरा घरी पोहोचली तेव्हा सौरभ एकटाच होता.

“आले नाहीत का ते? जेवण तू बनवलंस? की ऑर्डर केलंस?”

“मी एक घरगुती, टेस्टी डबेवाल्या काकू शोधून डबा लावून टाकला. ते दोघं जेवून भटकायला गेलेत.”

“अरे, पाहुण्यांना डब्यातलं जेवू घालायचं? काय म्हणतील नातलग? सासूबाई?”

“म्हणू देत. असंही नातलग तुझ्या पाककौशल्याची मागे टिंगलच करतात. मी तुला मदत करतो त्याबद्दल आई टोमणे मारतेच. मग करून सवरूनही कुणीच खूश नसेल, तर नेहमीपेक्षा वेगळा, नव्याने विचार करू या. रोज हॉटेलमधून मागवणं खिशाला आणि पोटालाही परवडत नाही. आपल्याला माणसं हवीत, त्यांनाही मदत होते, शहरात राहण्या-जेवण्याची सोय होते. पण आपण दोघंही जॉब करत असताना, तू त्यांना गावाकडल्यासारखं चविष्ट, साग्रसंगीत इच्छाभोजन पुरवणं कसं शक्य आहे? तुझ्या नोकरीची किंमत देऊन तू मागच्या पिढीसारखी दुनियादारी निभवावीस अशी अपेक्षा कशासाठी? त्यामुळे ‘घरगुती डबा’ हा मधला मार्ग बेस्ट. डबा खरंच टेस्टी आहे.”

“रोज डबा?”

“हो. करून पाहू. वेळ असला, मूड असला तर एखादी भाजी-कोशिंबीर करायची, शनिवार-रविवारी स्पेशल डिश बनवू शकतो. पण स्वयंपाकाची रोजची कंपलसरी जबाबदारी तुझ्या डोक्यावर नको आणि रोजचा ताण-चिडचिडही नको.”

“खरं आहे, किती चांगला, समजून घेणारा नवरा आहेस तू.” अमिता लाडातच आली, पण सौरभ गंभीर झाला.

“आज पर्याय शोधणं भागच पडलं गं. पण सगळीकडून ताण तुझ्यावर येत असून, चिडचिड होत असूनही, ‘गृहिणीच्या दुनियादारी’तून बाहेर पडण्याचा विचार तुला का नाही सुचला? मी नव्याने पर्याय शोधण्याचा विचार केला नसता, तर तू किती काळ गुदमरली असतीस? पारंपरिक अपेक्षा आणि आधुनिकतेच्या कात्रीत आणखी किती काळ अडकली असतीस? चिडचिड हा पर्यायच नाही, आनंदानं जमेल तेवढं करायचं, उरलेल्यासाठी सोयीचा मार्ग शोधायचा ‘चॉइस’ आपल्याला आहे, हे तुझं तुला कधी कळलं असतं? आणि तुझ्यासारख्याच असंख्य स्त्रियांना?” सौरभनं विचारलं. अमिताकडे या ‘कधी?’ चं उत्तर नव्हतं.

(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)

neelima.kirane1@gmail.com

Story img Loader