जव ऊर्फ बार्ली हे जगातील चौथ्या क्रमांकाचे महत्त्वाचे अन्नधान्य असून, यामध्ये गव्हाइतकीच प्रथिने व क्षारद्रव्ये असतात. त्याच्या या औषधी गुणांमुळेच शरीराचा बांधा योग्य राखण्यास त्याची मदत होते. हे धान्य मराठीमध्ये ‘जव’, संस्कृतमध्ये ‘यव’ किंवा ‘शतपर्विका’, इंग्रजीमध्ये ‘बार्ली’, तर शास्त्रीय भाषेत ‘हॉर्डीयम व्हलगरे’ (Hordeum Vulgare) या नावाने ओळखले जात असून, ते ‘पोएसी’ या ‘तृणधान्य’ कुळातील आहे. जव हे दिसायला बरेचसे गव्हासारखेच असते, परंतु गव्हाइतकी त्याला चव नसते. जवाच्या दाण्यावरचे साल काढल्यानंतर त्याला पर्ल बार्ली असे म्हणतात. हे दाणे गव्हापेक्षा आकाराने छोटे असतात. शुद्ध केलेल्या जवाचे स्कॉच बार्ली व पर्ल बार्ली असे अनेक प्रकार बाजारात मिळतात. रशिया, अमेरिका, जर्मनी, चीन व युरोपातील बऱ्याचशा भागांत बार्ली पिकते. तसेच सहारा व तिबेट इकडेही बार्लीचे पीक घेतले जाते. भारतात घोटी, महाराष्ट्र, गोवा, गुजरात या ठिकाणी बार्लीचे पीक घेतले जाते.
औषधी गुणधर्म
रूक्षो मेध्यश्च मधुरो व्रणे शस्तोऽग्निवर्धनः । स्वर्यो वर्ण्यो लेखनश्च मूत्रबंधकरो गुरुः ।
आयुर्वेदानुसार : सालासह असलेला जव तुरट, मधुर व शीत गुणधर्माचा असून वृष्य, सारक, किंचित रूक्ष, बुद्धिवर्धक, अग्निवर्धक असून स्वर आणि त्वचेचा वर्ण सुधारतो.
आधुनिक शास्त्रानुसार : जवामध्ये कॅल्शिअम, लोह, फॉस्फरस, ‘क’ जीवनसत्त्व व थोड्या प्रमाणात ‘बी’ जीवनसत्त्व, तसेच प्रथिने, तंतुमय व पिष्टमय पदार्थ, स्निग्धता व आर्द्रता असते. जवामध्ये प्रथिने व ‘बी’ जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असून, त्यातील प्रथिने हे मका, घेवडा यापेक्षाही उत्तम दर्जाचे असते. जवाला अंकुर फुटल्यानंतर त्याला माल्ट असे म्हणतात. मोड आणलले जव वाळवून तयार केलेले जवाचे पीठ हे अधिक पौष्टिक असते.
उपयोग:
१) जवाचा सहसा उपयोग मुख्यतः सूप बनविण्यासाठी करावा. कारण त्यामध्ये ग्लुटेन घटक फारच कमी प्रमाणात असल्यामुळे त्याची भाकरी अथवा पोळी चिकटपणा कमी असल्यामुळे बनत नाही.
२) लहान मुलांची वाढ झपाट्याने होण्यासाठी त्यांच्या आहारामध्ये माल्टचा उपयोग करावा.
३) गर्भवती स्त्रियांच्या शरीराचे पोषण होण्यासाठी, तसेच गर्भस्थ बाळ सुदृढ होण्यासाठी जवाचे सूप आठवड्यातून दोन वेळा घ्यावे.
४) जवापासून तयार झालेले पर्ल बार्ली हे धान्य आजारी व्यक्तींसाठी व अपंगांसाठी उपयुक्त असे धान्य आहे.
५) भूक न लागणे, अशक्तपणा जाणवणे, अपचन या विकारांमध्ये जव उकडून ते पाणी सतत थोडे थोडे प्यावे.
६) आम्लपित्त, पोटामध्ये दाह जाणवणे, खाल्लेले अन्न व्यवस्थित न पचणे, शौचास साफ न होणे अशा विकारांवर जव रात्रभर पाण्यात भिजत ठेवावेत व सकाळी उठल्यावर ते पाणी उकळून निम्मे झाल्यावर कोमट असतानाच थोडे थोडे दिवसभर प्यावे. या पाण्याने आतड्यामधील जळजळ थांबून शरीरामध्ये थंडावा निर्माण होतो. जवामधून निघणाऱ्या एका तेलकट पदार्थामुळे आतड्यातील श्लेष्मल त्वचेला संरक्षण मिळते. त्यामुळे दाह होण्यापासून त्वरित आराम मिळतो. अशाप्रकारे पचनसंस्थेला आराम मिळून अन्नपचन व्यवस्थित होते. फक्त हा प्रयोग करताना त्या दिवशी इतर कोणतेही अन्नपदार्थ खाऊ नयेत.
७) जवाची पेज ताक व लिंबू घालून प्यायल्याने लघवीची जळजळ थांबते. जव थंड व मूत्रल असल्याने मूत्रपिंड व मूत्रवाहिनी यांच्या कोणत्याही तक्रारीवर जवाचा हमखास उपयोग होतो.
८) खूप ताप येऊन शरीराचा दाह होत असेल, तर जवाचे सूप थोड्या थोड्या अंतराने प्याल्यास दाह व ताप कमी होतो.
सावधानता
जवापासून माल्ट तयार करून तसेच इतर द्रव्यांची संधानप्रक्रिया करून त्यापासून बिअर, व्हिस्की तयार करतात. जगामध्ये सर्वात जास्त बिअर जवापासूनच बनविली जाते. म्हणूनच आयुर्वेदामध्ये काही विशिष्ट व्याधींमध्ये (काष्य, कृशता, अशक्तपणा, जीर्ण खोकला, क्षयरोग, भूक कमी लागणे) अल्प प्रमाणात जवापासून बनविलेले नैसर्गिक मद्य पिण्यास सांगितलेले आहे. त्यामध्ये असणाऱ्या औषधी गुणधर्मामुळे शरीराची पचनशक्ती वाढून वरील आजार बरे होतात. परंतु हे मद्यप्राशन अगदी थोड्या प्रमाणात औषधी स्वरूपात योग्य असते. याची मात्रा जर जास्त प्रमाणात घेतली, तर वरील आजार बरे होण्याऐवजी शरीराची हानी झालेली दिसून येते.
dr.sharda.mahandule@gmail.com