डॉ. वैशाली वलवणकर
प्रत्येक व्यक्तीला आपण सुंदर आणि आकर्षक दिसावं असं नेहमीच वाटत असतं. प्रत्येक व्यक्ती खरेतर जन्मत: सुंदरच असते. निसर्गाने प्रत्येकाला सुंदर केस, सुंदर त्वचा दिलेली असते. परंतु नंतर हळूहळू प्रदूषण, चिंता, कृत्रिम गोष्टींमुळे, चुकीच्या आहार-विहारामुळे नैसर्गिक सौंदर्य कमी कमी होत जाते. स्त्रिया एका वर्षात सुंदर दिसण्यासाठी किंवा सौंदर्याविषयी काही प्रयोग करण्यासाठी साधारणपणे ४०० तास खर्च करतात, असे एका सर्वेक्षाणातून लक्षात आले आहे.
आणखी वाचा : Navratri 2022 : सौंदर्याला दागिन्यांचे चार चाँद!
प्रत्येक स्त्री सुंदर व आकर्षक दिसू शकते. ती शारीरिक व मानसिकदृष्ट्या निरोगी असेल तर सौंदर्य हे केवळ पांढऱ्या रंगावर (गोऱ्या रंगावर) अवलंबून नाही. तर त्वचा किती निरोगी आहे त्यावर अवलंबून असते. केसांचे सौंदर्यसुद्धा केवळ लांबीवर अवलंबून नसते तर ते किती निरोगी, चमकदार आहेत यावर अवलंबून असते. स्त्रीचे वय कितीही असले तरी किंवा केसांचा -त्वचेचा रंग कसाही असला तरी ते निरोगी असतील तरच ते सौंदर्यात भर टाकतात. केस, त्वचा त्याचप्रमाणे इतर अवयवांची काळजी कशी घ्यावी याविषयी काही उपाय थोडक्यात पाहूया.
आणखी वाचा : महिलांचे पित्त विकार आणि आहार
त्वचा
चेहरा हा नेहमीच आपल्या अंतर्मनाचा आरसा असतो. आपण निरोगी असू तर त्याचे प्रतिबिंब आपल्या चेहऱ्यावर किंवा त्वचेवर लगेचच दिसून येते. सध्याच्या धावपळीच्या किंवा स्पर्धेच्या युगात आणि घरातील जबाबदाऱ्यांमुळे स्त्रियांना स्वत:ची काळजी घेण्यासाठी फारसा वेळच मिळत नाही. त्यामुळे काही वेळा लवकर फरक दिसावा याच्यासाठी स्वत:च्या मनानेच काही चुकीच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर केला जातो. (बाजारात सध्या अशाच काही स्टिरॉईडस् असलेल्या क्रीम मिळत आहेत) अशा चुकीच्या क्रीममुळे अतिशय वाईट दुष्परिणाम पहायला मिळतात.
आणखी वाचा : बीपी खूप वाढलंय…! मग आहार व जीवनशैलीत करा असे बदल
त्वचेविषयीच्या काही तक्रारी खालीलप्रमाणे
१) रुक्ष त्वचा
२) तेलकट त्वचा
३) त्वचेवर मुरुम, तारुण्यपिटिका
४) त्वचा काळवंडणे, वांग येणे, चेहऱ्यावर खूप तीळ येणे.
५) सुरकुत्या
६) निस्तेज त्वचा
७) डोळ्यांभोवती काळी वर्तुळे
वरील तक्रारींची कारणे आणि त्यावरी उपाय थोडक्यात पाहू –
आणखी वाचा : ‘पीसीओडी’मध्ये उपयुक्त आहार विहार
१) रुक्ष त्वचा –
त्वचेचा नैसर्गिक कोरडेपणा किंवा तेलटकपणा हा आपल्या त्वचेतील तैलग्रंथीवर अवलंबून असतो. ऊन, धूळ, प्रदूषण, तीव्र रासायनिक सौंदर्य प्रसाधने यामुळे त्वचेतील पाण्याचे प्रमाण कमी होते आणि त्वचा रुक्ष आणि निस्तेज दिसू लागते. त्वचेतील पाण्याच्या प्रमाणावर त्याची कांती (ग्लो) अवलंबून असतो. जर त्वचेतील पाण्याचे प्रमाण कमी झाले तर त्वचा काळवंडल्यासारखी होते. वयोमानानुसार त्वचेतील कोलॅजिनचे प्रमाण कमी होते आणि त्यामुळेही त्वचा रुक्ष होते. अतिप्रमाणात साबणाच्या वापरामुळेही त्वचेला रुक्षता येते.
आणखी वाचा : नवरात्रीचे नऊ रंग नेमके कसे ठरवले जातात? जाणून घ्या यामागे दडलेले गुपित
रुक्ष त्वचेसाठी उपाय
१) आंघोळीसाठी खूप गरम पाण्याचा वापर करू नये.
२) साबणाने वारंवार चेहरा धुवू नये.
३) तीव्र रासायनिक सौंदर्य प्रसाधनांचा वापर टाळावा.
४) चांगल्या प्रतिच्या मॉईश्चराईजरचा वापर करावा.
५) आंघोळीनंतर खोबरेल तेलाचे तीन-चार थेंब पाण्यात मिक्स करून लावल्यानंतरही त्वचेचा कोरडेपणा कमी होतो. खोबरेल तेलाप्रमाणेच बदाम तेल, कुंकुमादि तेलाचाही वापर करता येतो.
६) अँटीऑक्सिडंट असणाऱ्या पदार्थांचा जेवणात वापर करावा. (उदा. आवळा, लिंबू, गाजर)
७) ग्लिसरिनचा चांगला उपयोग कोरड्या त्वचेसाठी होतो.
( एक चमचा ग्लिसरिन एक चमचा गुलाबजल एकत्र करून कोरड्या त्वचेवर लावणे.)
८) कोरफड गर आंघोळीच्या आधी १० मिनिटे लावून ठेवून नंतर धुतल्यास त्वचेचा कोरडेपणा कमी होतो.
९) तेलाप्रमाणेच काही फळांचाही वापर आपण पॅक म्हणून करू शकतो.
अर्धे पिकलेले केळे कुस्करून घेणे. त्यात एक चमचा खोबरेल तेल एकत्र करून हे मिश्रण २० मिनिटे चेहऱ्यावर लावून ठेवावे आणि नंतर धुवून टाकावे.
१०) तसेच दोन चमचे बेसन पीठ, अर्धा चमचा आंबे हळद, १ चमचा मध, १ चमचा दुधाची साय, गुलाबपाणी एकत्र करून त्याची पेस्ट करून घ्यावी. ही पेस्ट पूर्ण चेहऱ्याला लावून २० मिनिटे ठेवून नंतर धुवून टाकावे. हा पॅक आठवड्यातून एकदा जरूर वापरावा.
v.valvankar@gmail.com