डॉ. वैशाली वल्हवणकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पंचेंद्रियांपैकी महत्त्वाचे इंद्रिय म्हणजे डोळे. अतिशय संवेदनशील अवयव असून त्याला प्रकाशाची जाणीव होते. डोळे नसले तर आपण काहीच पाहू शकणार नाही. कशाचाच अनुभव सुद्धा घेऊ शकत नाही. डोळे हे खूप नाजूक असतात. त्यांची काळजी घेणे आवश्यक असते. आपण दररोज डोळ्यांची काळजी घेण्याच्या सवयींचा सराव केल्यास डोळ्याच्या अडचणी सहज टाळता येतात. आपल्या डोळ्याचे आरोग्य टिकवून ठेवण्यासाठी आणि दृष्टी दृढ ठेवण्यासाठी, आपल्या रोजच्या नित्यकर्माचा भाग म्हणून डोळ्यांची निगा व काळजी घेतली पाहिजे.

आणखी वाचा : सुंदर मी होणार! – त्वचेचे सौंदर्य

शरीरातील सर्वात जास्त संवेदनशील त्वचा ही डोळ्यांभोवतीची असते. त्यामुळे त्याची काळजी योग्य प्रकारे घेणे आवश्यक आहे. धूर, धूळ, प्रदूषण, मोबाइलचा सतत वापर यामुळे डोळ्यांना ॲलर्जीचा त्रास होतो. त्याचप्रमाणे डोळ्यांभोवती काळी वर्तुळे दिसू लागतात.
डोळ्यांची काळजी घेताना खालील गोष्टी करू नयेत –
१) चेहेरा धुण्यासाठी अति गरम पाणी वापरू नये.
२) डोळ्यांना सतत आयलायनर, मस्कारा वापरू नये.
३) जवळून सतत मोबाइल वापरू नये.
४) अंधारात टीव्ही किंवा मोबाइल पाहू नये.

आणखी वाचा : World Mental Health Day 2022: जास्त त्रास कोण भोगतं ? घर सांभाळणारी महिला की कामावर जाणारी?

काय करावे –
१) बाहेर उन्हात जाताना डोळ्यांवर गडद रंगाचा चष्मा किंवा गॉगल वापरावा.
२) डोळे थंड पाण्याने धुवावेत (दिवसातून ३- ४ वेळा)
३) रात्री झोपताना नियमाने डोळ्यांना केलेला मेकअप काढावा आणि मॉईश्चरायझर लावावे.
४) रात्री झोपताना नरिशिंग व रिपेअर करणाऱ्या क्रीमचा वापर करावा.
५) योग्य अंतरावरून टीव्ही पहावा.
६) डोळ्यांचे व्यायाम करावेत.
७) काकडीचे काप, कोरफड गराचे आयपॅड थंडाव्यासाठी डोळ्यांवर ठेवावेत.
८) लोहाच्या कमतरतेमुळे डोळ्यांखाली काळी वर्तुळे येतात, त्यासाठी डॉक्टरांचा सल्ल घेऊन औषधोपचार करावेत.

आणखी वाचा : फॅशनच्या जगतात सौंदर्याची नवी व्याख्या तयार करणारी मसाबा गुप्ता

ओठ-
ओठांचं माधुर्य सौंदर्यात भर टाकते. ओठांची त्वचा कोरी पडणे त्वचा निघणे, ओठांची त्वचा काळपट दिसणे या सर्वसामान्य तक्रारी असतात.
ओठांची काळजी घेताना खालील गोष्टी करू नयेत –
१) फुटलेले ओठ ओढू नये. सतत ओठांवरून जीभ फिरवू नये.
२) कमी प्रतीच्या सौंदर्य प्रसाधनांचा वापर करू नये.
३) रंगीत टूथपेस्ट वापरू नये.
४) साबणाचा अनावश्यक वापर टाळावा.
५) सुगंधी किंवा रंगीत मलम अतिप्रमाणात वापरू नये.

आणखी वाचा : यशोगाथा : ‘ती’ने केली पोलिओवर मात अन् झाली डॉक्टर!

काय करावे –
१) आहारात पुरेशी जीवनसत्वे घ्यावीत. गाजर, बीट, हिरव्या पालेभाज्या फळांचा रस किंवा फळांचा आहारात समावेश करावा.
२) पांढऱ्या रंगाची टुथपेस्ट वापरावी.
३) साबणाऐवजी फेसवॉशचा वापर करावा.
४) रात्री झोपताना ओठांना तूप, लोणी किंवा ग्लिसरीन वापरावे.
५) लिपस्टिक वापरावयाची असल्यास उत्तम ब्रॅण्ड किंवा उत्तम कंपनीची वापरावी. परंतु ओठ फुटलेले असल्यास किंवा कोरडे पडले असल्यास लिपस्टिक वापरू नये.
६) प्रखर उन्हामध्ये जाणे टाळावे.
v.valvankar@gmail.com

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beauty tips beautiful attractive women girl how to take care of eyes and lips what to avoid vp
Show comments