डॉ. वैशाली वल्हवणकर
दैनंदिन जीवनात हातांच्या सौंदर्याकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. हाताच्या त्वचेमध्ये तैलग्रंथी नसल्यामुळे हाताची त्वचा लवकर कोरडी पडू शकते.
हातांची काळजी घेताना खालील गोष्टी करू नयेत –
१) तीव्र ॲण्टीसेप्टीक साबणाचा वापर करू नये.
२) हात सतत साबणाने धुवू नयेत.
३) आखूड बाह्यांचे कपडे घालून उन्हात जाणे टाळावे.
आणखी वाचा : नातेसंबंध : नातवंडसुद्धा आजोबा- आजी होणारच ना?
काळजी घेतान काय करावे –
१) हात धुण्यासाठी लिक्विड हॅण्डसोपचा वापर करावा.
२) रात्री झोपण्यापूर्वी हाताला कोल्डक्रीम लावावे.
३) बाहेर उन्हात जाताना चेहऱ्याप्रमाणेच हातालाही सनस्क्रीनचा लावावे.
४) बाहेर जाताना पूर्ण बाह्यांचे कपडे घालावेत.
५) रात्री झोपताना हातांना मॉईश्चरायझर, नरिशिंग क्रीम लावावे.
६) तसेच आठवड्यातून एकदा हातांना स्क्रबचा वापर करावा.
आणखी वाचा : यशस्विनी : दुबईमध्ये योग लोकप्रिय करणारी ‘ती’ आहे तरी कोण?
स्क्रब तयार करण्याची पद्धती –
१ चमचा बेसन पीठ + १ चमचा दुधाची साय + १ चमचा मध + ३ – ४ थेंब लिंबाचा रस टाकावा. याची पेस्ट बनवून आंघोळीच्या आधी १५ – २० मिनिटे हाताला लावून ठेवावी. नंतर धुवून टाकावे.
यामुळे हाताची त्वचा मऊ होते, आणि जर त्वचा काळवंडल्यासारखी झाली असेल तर तो काळवंडलेपणा कमी होऊन त्वचेला चमक येते.
७) तीन महिन्यातून एकदा मेनिक्युअर करून घ्यावे.
आणखी वाचा : सुंदर मी होणार – डोळे आणि ओठांची काळजी
पाय –
हाताप्रमाणेच पायांच्या सौंदर्याकडेही आपले नेहमीच दुर्लक्ष होते. खरे नंतर संपूर्ण शरीराचा भार पेलवणारे पाय निरोगी व सुंदर असणे अतिशय आवश्यक आहे.
पायांची काळजी घेताना खालील गोष्टी करू नये –
१) अनवाणी फिरू नये.
२) ‘हाय हील’ असलेले बूट, सॅण्डल, चप्पल वापरू नये.
३) कडक सोल असलेल्या चप्पल वापरू नयेत.
४) साबणाच्या पाण्यात खूप वेळ पाय ठेवू नयेत.
५) बाहेर जाताना शक्यतो पायात सॉक्स घालावेत.
आणखी वाचा : यशोगाथा : ‘ती’ने केली पोलिओवर मात अन् झाली डॉक्टर!
काय करावे –
१) आठवड्यातून एकदा रात्री झोपण्यापूर्वी पाय कोमट पाण्यात बुडवून ठेवावेत व स्वच्छ करावेत.
२) टाचांवर अधिक भेगा असतील तर पाय रोज रात्री स्वच्छ करून कोल्ड क्रीम किंवा मॉयश्चरायझर वापरावे.
३) मॉर्निंग वॉकला जाताना चप्पल ऐवजी स्पोर्टस् शूजचा वापर करावा.
४) पायातील बोटांमध्ये जागा नसेल (बोट एकमेकांना टेकून असतील) तर त्या जागी पाणी राहून किंवा ओलसरपणा राहून चिखल्या (Fungal Infection) होण्याची शक्यता असते. अशावेळी पाय नेहमी कोरडे ठेवावेत.
५) ३ महिन्यातून एकदा ‘पेडिक्युअर’ करावे.
आणखी वाचा : World Mental Health Day 2022: जास्त त्रास कोण भोगतं ? घर सांभाळणारी महिला की कामावर जाणारी?
नखे –
सुंदर नखे हाताच्या सौंदर्यामध्ये अधिक भर टाकतात. नखांची योग्य काळजी घेतल्यास त्याची योग्य आकारात वाढ होवून नखांच्या सौंदर्यात भर पडते.
काय करू नये –
१) डिटर्जंट, साबण किंवा नेलपॉलिश रिमूव्हर यामध्ये अधिक काळ बोटे ठेवू नयेत.
२) नखांच्या बाजूची त्वचा ओढून काढू नये. नखे दातांनी कुरतडू नयेत.
३) नखांवर असलेली नेलपेंट खवडून काढू नये.
आणखी वाचा : लैंगिक समस्या प्रश्नोत्तरे – परस्त्रीचं आकर्षण ?
काय करावे
१) हात धुण्यासाठी लिक्विड सोपचा वापर करावा.
२) रात्री झोपताना हात धुवून नंतर कोरडे करून कोल्ड क्रीमचा किंवा मॉईश्चरायझरचा वापर करावा.
३) नखांच्या भोवती हलक्या हाताने क्रीमने मसाज करावा.
४) जीवनसत्त्वे व प्रथिनांचा आहारात वापर करावा. तसेच कॅल्शिअम व प्रोटीनयुक्त आहाराचा समावेश करावा.
५) नखांची टोके घासून गुळगुळीत करावीत.
६) ३ महिन्यांतून एकदा ‘मेनिक्युअर’ करून घ्यावे.
आणखी वाचा : पोन्नीयिन सेल्व्हन: इथे स्त्रिया राज्य करतात…
कॅल्शिअम असणारे पदार्थ –
१) दूध, पनीर, पालक, फ्लॉवर, कोबी, तूप, लसूण, पांढरा कांदा, खाण्यातला डिंक, खारीक
२) प्रथिने (प्रोटीन्स) असणारे पदार्थ – सोयाबीन, बदाम, काबुली चणा, कडधान्ये, बाजरी, राजमा, चिकन, मटण, मासे, अंडी
३) जीवनसत्व ‘अ’ असणारे पदार्थ – हिरव्यापालेभाज्या, गाजर, बीट, अंडी, दूध, बटर, मासे पपई, रताळी.
४) जीवनसत्त्व ‘ब’ असणारे पदार्थ – हातसडीचा तांदूळ, गाईचे दूध, यीस्ट, हिरव्या भाज्या, कडधान्ये, बटाटा
५) जीवनसत्व ‘क’ असणारे पदार्थ – संत्री, मोसंबी, आवळा, पेरू, द्राक्षे, टोमॅटो, लिंबू, शिमला मिरची.
६) जीवनसत्व ‘ड’ असणारे पदार्थ – दूध, बटर, मासे, अंडी
७) जीवनसत्व ‘ई असणारे पदार्थ – हिरव्या पालेभाज्या, अंडी, मटण, मासे, आक्रोड, बदाम
८) लोह (आयर्न) असणारे पदार्थ – पालक, कोबी, अंडी, मटण, शेंगदाणे, गूळ, कोथिंबीर, बीट, काळे खजूर, काळे मनुके
या पदार्थांचा जेवणात नियमित समावेश असावा.
v.valvankar@gmail.com