डॉ. वैशाली वलवणकर
अनेक कारणांमुळे आपला चेहरा काळवंडतो, त्याच्यावर काळे डाग, चट्टे पडतात. हे अचानकच होत असल्यामुळे काय करायचे हे समजत नाही. तर अनेकदा सुरकुत्या आपली काळजी वाढवतात. हे सर्व टाळण्यासाठी काय करायचे हे आपण आज पाहुयात.
वांग / चेहरा काळवंडणे –
१) सध्याच्या धावपळीच्या आणि स्पर्धेच्या युगात मानसिक ताणतणावामुळे हार्मोन्समध्ये असंतुलन निर्माण होते त्यामुळे स्त्रियांमध्ये चेहऱ्यावर वांग येतात.
२) स्त्रियांना गरोदरपणा, प्रसुती रजोनिवृत्ती अशा विविध टप्प्यांमध्ये हार्मोन्सचे असंतुलन होऊन त्या काळात वांग येते आणि वाढलेले दिसते.
३) चुकीच्या आणि तीव्र अशा सौंदर्य प्रसाधनांमुळेही वांग वाढते. (उदाहरणार्थ – मेलॅलाईट, स्किनलाइटसारखी स्टीरॉईड क्रीम.)
४) उन्हात जाताना कोणतीही काळजी न घेणे.
५) जीवनसत्वांचा अभाव
आणखी वाचा : सुंदर मी होणार – काळजी तेलकट त्वचेची
वांग जास्त पसरू नये यासाठी…
१) मानसिक ताणतणाव कमी करण्यासाठी नियमित व्यायाम करावा. योगा प्राणायाम करावा.
२) रात्री पुरेशी आठ तास झोप घ्यावी.
३) दिवसात १० – १२ ग्लास पाणी प्यावे.
४) सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे सनस्क्रीनचा वापर करणे. साधारणत: १५- ३० SPF च्या सनस्क्रीनमुळे त्वचेचे संरक्षण होते.
ज्या स्त्रियांना वांग असेल किंवा ज्यांना वांग येण्यास नुकतीच सुरुवात झाली असेल अशांनी देखील सकाळी आंघोळीनंतर लगेचच चेहऱ्याला सनस्क्रीन लावावे.
काहींचा असा गैरसमज असतो की घरात बसलेल्यांना सनस्क्रीनची गरज नसते. परंतु खिडकीतून येणारी सूर्याची किरणे, बल्बचा उजेड स्वयंपाकाच्या गॅसमधून येणारी किरणे यामुळेही वांग वाढू शकते. म्हणूनच घरात बसून असेल तरीही दिवसातून दोन वेळा सनस्कीन जरुर वापरावे.
आणखी वाचा : सुंदर मी होणार! – त्वचेचे सौंदर्य
सनस्क्रीन वापरण्याची पद्धत –
सनस्क्रीन वापरताना एसपीएफ हा शब्द येतोच. एसपीएफ म्हणजे ‘सन प्रोटेक्शन फॅक्टर’ एक चौरस सेंटीमीटर भागात ०.१ ग्रॅम सनस्क्रीन लावल्यानंतर त्वचेची अतिनील किरणांना दाद न देण्याची क्षमता किती पटीने वाढते या प्रमाणाला ‘एसपीएफ’ म्हणतात. जेवढे ‘एसपीएफ’ जास्त तेवढी त्याची परिणामकारकता जास्त. आपल्या भारतातील वातावरणात साधारणपणे १५ ते ३० ‘एसपीएफ’ पुरेसे असते.
सनस्क्रीन लावताना आपल्या चेहऱ्यासाठी एक रुपयाच्या नाण्याइतके सनस्क्रीन तळहातावर घेवून ते पूर्ण चेहऱ्यावर पसरून लावावे. चेहरा गळा हात पाय या भागांवर योग्य प्रमाणात सनस्क्रीन लावावे. तसेच दर तीन ते चार तासांनी परत एकदा चेहरा, गळा हातांना सनस्क्रीन लावावे. सनस्क्रीन लावल्यानंतर काही वेळा डोळे चुरचुरतात परंतु त्यात काळजी करण्यासारखे काही नसते.
आणखी वाचा : ॲनिमिया स्त्रियांचा कायमचा सोबती
५) रात्रीच्या वेळी जीवनसत्व ‘अ’ व ‘ई’ तसेच जीवनसत्व ‘सी’ असणारी मॉईश्चरायझिंग क्रीम
६) आठवड्यातून एकदा सौम्यस्क्रबचा वापर करावा. आधी दिलेल्या फेसपॅकचाही वापर स्क्रब म्हणून करू शकतो. स्क्रब करताना अगदी हळुवारपणे करावे. अन्यथा त्वचेला इजा होण्याची शक्यता असते.
७) बाहेर जाताना पूर्ण बाहीचे कपडे वापरावेत. तसेच चेहऱ्याला स्कार्फचा वापर करावा.
८) कुंकुंमादी तेलाचा वापर डागांवर करू शकतो.
९) आहारातील जीवनसत्व ब आणि लोहाचे प्रमाण वाढविणे. त्यासाठी सकस आहार घ्यावा.
आणखी वाचा : बीपी खूप वाढलंय…! मग आहार व जीवनशैलीत करा असे बदल
सुरकुत्या व उपाय
वयानुसार त्वचेतील कोलॅजिनचे प्रमाण कमी झाल्यामुळे त्वचा कोरडी पडते त्यामुळे सुरकुत्यांचे प्रमाण वाढते. काही वेळा हार्मोन्समधील असंतुलनामुळेही त्वचेवर सुरकुत्या पडतात.
उपाय –
१) नियमित व्यायाम करावा.
२) मानसिक आरोग्यासाठी प्राणायाम योगा करावा.
३) दररोज १० – १२ ग्लास पाणी प्यावे
४) तीव्र सौंदर्य प्रसाधनांच वापर करू नये.
५) सौम्य फेसवॉशचा वापर करावा.
६) सनस्क्रीनचा नियमित वापर करावा.
७) रात्री झोपताना नरिशिंग क्रीमचा वापर कराव
८) तीन – चार महिन्यातून एकदा हर्बल फेशियल जरुर करावे.
९) धूळ, धूर, प्रदूषणा पासून संरक्षणासाठी स्कार्फचा वापर करावा.
१०) आहारात अँटिऑक्सिडंटचा वापर करावा.
v.valvankar@gmail.com