उन्हाळा म्हणजे रोजच्या मेकअप उत्पादनांमध्ये सनस्क्रीन आवर्जून समाविष्ट करण्याचा काळ. सनस्क्रीन वेगवेगळ्या प्रकारांत मिळतं. क्रीम, लोशन, कॉम्पॅक्टसारखी पावडर हे प्रकार तर आपल्या परिचयाचे आहेतच, पण क्वचित तेलासारखं पातळ द्रव्य किंवा अगदी स्प्रेच्या स्वरूपातही वेगवेगळ्या ब्रँडस् चं सनस्क्रीन बाजारात उपलब्ध आहे. उन्हाळ्यासाठी सनस्क्रीन खरेदी करण्यापूर्वी सनस्क्रीन नेमकं का लावतात आणि त्याचा चांगला उपयोग व्हावा यासाठी काय करावं, यासंबंधीच्या काही टिप्स पाहू या.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
आणखी वाचा : भारतातील शहरी महिला अडकल्या घरकामात: दिवसभरात एकदाही घराबाहेर न पडणाऱ्या महिलांचं प्रमाण ५३ टक्के
उन्हाळ्यात सनस्क्रीन का लावतात?
ढोबळमानानं सांगायचं तर सूर्यकिरणांमध्ये ‘यूव्हीए’ आणि ‘यूव्हीबी’ अशी दोन प्रकारची अतीनील (अल्ट्राव्हायोलेट) किरणं असतात. यातल्या ‘यूव्हीबी’ किरणांची तरंगलांबी ‘यूव्हीए’पेक्षा कमी असते आणि त्यामुळे ‘यूव्हीबी’ किरणांमुळे होणारं त्वचेच्या वरच्या थराला- म्हणजे ‘एपिडर्मिस’ला नुकसान पोहोचतं. ‘यूव्हीए’ किरणांची तरंगलांबी जास्त असल्यामुळे ती त्वचेत खोलवर जाऊन नुकसान करू शकतात. खूप वेळ कडक उन्हात वावरल्यामुळे त्वचेच्या वरच्या थरात त्वचेचा पोत बिघडणं, ‘सनबर्न’ होणं, या तक्रारी उद्भवतातच, पण आतल्या थरांमध्ये जाऊन नुकसान करणाऱ्या अतीनील किरणांमुळे त्वचेवर सुरकुत्या पडणं, त्वचा अकाली म्हातारी होणं, त्वचेवर काळे डाग पडणं अशा समस्याही उद्भवू शकतात. अतीनील किरणं त्वचेतील जनुकांमध्ये बदल घडवण्याच्या प्रक्रियेस चालना देऊन त्वचेच्या कर्करोगासाठीही कारणीभूत ठरत असल्याचं मानलं जातं. या गोष्टींना आळा बसावा यासाठी अधिक काळ उन्हात फिरायचं असेल तर सनस्क्रीन लावतात. परंतु खरंतर केवळ उन्हाळ्यात किंवा कडक ऊन असतानाच नव्हे, तर नेहमीच बाहेर जाताना चांगल्या दर्जाचं सनस्क्रीन वापरल्यास चांगलं, असं सांगितलं जातं.
आणखी वाचा : मोबाइलवरच्या ‘या’ ॲप्सना महिलांची सर्वाधिक पसंती!
‘सनस्क्रीन’ खरेदी व वापरापूर्वी या काही टिप्स लक्षात ठेवा-
- या दिवसांत रोज बाहेर पडताना आठवणीनं सनस्क्रीन लावाच, पण सनस्क्रीनची एखादी लहान बाटली पर्समध्ये कायम बरोबर बाळगा.
- सनस्क्रीन एका वेळी भारंभार लावावं लागत नाही. एका बोटाच्या अग्रावर अर्थात ‘फिंगरटिप’वर सनस्क्रीन घेऊन तेवढंच नीट पसरून लावलेलं पुरतं.
- चेहरा, गळा, मान वा हातांवर खूप घाम येत असतो. घाम वारंवार पुसताना किंवा चेहरा धुतल्यावर सनस्क्रीन निघून जातं. त्यामुळे लागेल तसं सनस्क्रीन पुन्हा लावायला हवं.
- बहुतेक लोक चेहऱ्यावर मॉईश्चरायझर, फाऊंडेशन वगैरे विविध प्रॉडक्टस् वापरत असतात. अशा वेळी सनस्क्रीनचा थर सर्वांत शेवटचा असू द्या.
- चेहऱ्यावर वापरायच्या विविध उत्पादनांमध्ये ‘एसपीएफ’ अर्थात ‘सन प्रोटेक्शन’ असतं. या प्रॉडक्टस् च्या बाटली वा ट्यूबवर तुम्हाला ‘एसपीएफ १५’, ‘एसपीएफ ३०’ असा काही तरी आकडा लिहिलेला सापडेल. मग ही उत्पादनं लावून भागेल का? आणि वेगळं सनस्क्रीन लावण्याची गरज आहे का? असा अनेकांचा प्रश्न असतो. मात्र स्किन केअर तज्ञांच्या मते अशा इतर उत्पादनांपेक्षा कडक उन्हात ‘डेडिकेटेड ब्रॉड स्पेक्ट्रम सनस्क्रीन’चा अधिक चांगला उपयोग होतो.
आणखी वाचा : विवाह समुपदेशन : जोडीदाराला मनातलं समजतं?
- सनस्क्रीनचा ‘एसपीएफ’ जितका अधिक, तेवढं सन प्रोटेक्शन जास्त.
- या दिवसांत सतत घाम येत असल्यामुळे तुम्ही खूप वेळ उन्हात फिरणार असाल, तर ‘वॉटर रेझिस्टंट सनस्क्रीन’ चांगलं. वॉटर रेझिस्टंट सनस्क्रीन साधारणपणे दोन तास त्वचेवर टिकतं. त्यानंतर लागेल तसं ते पुन्हा लावावं.
- सनस्क्रीनमध्येसुद्धा त्वचेच्या प्रकारानुसार वेगवेगळे प्रकार मिळतात. म्हणजे तुमची त्वचा जर तेलकट असेल, तर ‘लाईटवेट’ आणि ‘ऑईल फ्री’ लिहिलेलं सनस्क्रीन वापरा. त्वचा कोरडी असेल, तर ज्या सनस्क्रीनमध्ये ग्लिसरिन वा ‘हायाल्युरॉनिक ॲसिड’ आहे,अ्सं सनस्क्रीन चांगलं ठरेल. खूप संवेदनशील असलेल्या त्वचेसाठी ‘झिंक ऑक्साईड’ वा ‘टायटॅनियम डायॉक्साईड’ असलेलं गंधरहित सनस्क्रीन वापरायला सांगितलं जातं. बऱ्याचदा ‘स्किन टाईप’ सनस्क्रीनच्या बाटलीवर छापलेला असतोच, तो तपासून घेतल्यास योग्य सनस्क्रीन निवडणं सोपं होईल.