डॉ. शारदा महांडुळे

शंकूसारखे लांब, निमुळते, भोवऱ्याच्या आकाराचे बीट आहाराबरोबरच औषधी वनस्पती म्हणूनही वापरतात. बीट हे एक रसाळ कंदमूळ आहे. त्याचा रंग लालसर जांभळा असतो. बीट कापल्यानंतर त्याचा हा रंग मनाला आल्हाददायक वाटतो. मराठीत ‘बीट’, हिंदीमध्ये ‘चुकंदर’, संस्कृतमध्ये ‘शर्करा’, इंग्रजीमध्ये ‘शुगरबीट’, तर शास्त्रीय भाषेत ‘बीटा व्हल्गॅरिस’ (Beta Vulgaris) या नावाने ओळखले जाते. ते ‘चिनोपोडिएसी’ कुळातील आहे.

nashik municipal corporation taken steps towards making water from borewells available in certain locations
नाशिक शहरात विंधन विहिरींतील पाण्याचा पर्याय; टंचाई निवारणार्थ महापालिकेची व्यवस्था
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
20 percent ethanol mixed petrol distribution now started at all pumps in state
राज्यातील पंपांवर आता २० टक्के इथेनॉलमिश्रित पेट्रोल, वाहनधारकांसह पंपचालकांची परीक्षा?
loksatta editorial on india s relations with Sheikh Hasina
अग्रलेख : वंग(मैत्री)भंगाचे वास्तव…
Union Health Minister confirms sudden deaths in India are not caused by COVID-19 vaccines, addressing public concerns about vaccine safety.
Deaths Due To Corona Vaccine : “करोना लशीमुळे झाले नाहीत लोकांचे मृत्यू”, मोदी सरकारने संसदेत सांगितली अचानक मृत्यूंमागील कारणे
Onion prices fall due to increased production
नाशिक : आवक वाढल्याने कांद्याची घसरण
number of ST bus accidents increased in Nashik division
नाशिक विभागात एसटी अपघातांचा उंचावता आलेख; नऊ महिन्यांत बसचे १२० अपघात, २२ जणांचा मृत्यू
brain rot disease loksatta news
विश्लेषण : ‘ब्रेन रॉट’ यंदाचा ऑक्सफर्ड शब्द मानकरी! पण ही अवस्था नक्की काय असते? हा चिंताजनक विकार का?

बीट या कंदमुळाची पानेही भाजी करण्यासाठी वापरतात. बीट हे युरोप व अमेरिकेतून भारतात आले. सध्या भारतात सर्वत्र त्याची लागवड केली जाते. पाश्चिमात्य देशांत साखर तयार करण्यासाठी बीटचा उपयोग केला जातो.

औषधी गुणधर्म

आयुर्वेदानुसार : बीट हे पित्तशामक, शक्तिवर्धक, रक्तवर्धक, शीतल पोषक असे रसायन आहे.

आधुनिक शास्त्रानुसार : प्रथिने, लोह, कॅल्शिअम, फॉस्फरस, ‘अ’, ‘ब’ व ‘क’ जीवनसत्त्वे, कर्बोदके, खनिजे, आर्द्रता, तंतुमय व पिष्टमय पदार्थ विपुल प्रमाणात असतात. या सर्व गुणधर्मामुळेच त्याचा औषधी वनस्पती म्हणून वापर करण्यात येतो. यामध्ये नैसर्गिक साखर विपुल प्रमाणात असूनही उष्मांक अगदी कमी प्रमाणात असतात. हे बिटाचे वैशिष्ट्य आहे. तसेच बीट हे ॲमिनो ॲसिडने असते.

उपयोग

१) बिटामध्ये असणाऱ्या लोहामुळे रक्तातील लाल पेशींचे व लोहाचे प्रमाण वाढून रक्ताचे प्रमाण प्राकृत राहते, म्हणूनच रक्ताल्पता (ॲनिमिया) असणाऱ्या रुग्णांनी आहारामध्ये नियमितपणे बिटाचा समावेश करावा.

२) बालकांनी तसेच स्त्रियांनी नेहमी आहारात बीट वाफवून किंवा त्याची कोशिंबीर करून खावे. बीट हे शक्तिवर्धक असल्यामुळे लहान मुलांची शक्ती वाढते, तसेच स्त्रियांना अनेक वेळा रक्ताची कमतरता असते. ती कमतरता भरून रक्ताचे प्रमाण प्राकृत होण्यासाठी व अशक्तपणा दूर होण्यासाठी नियमितपणे बीट खावे.

३) बिटामध्ये अल्कली गुण, कॅल्शिअम, मॅग्नेशिअम, पोटॅशिअम, लोह हे घटक असल्यामुळे शरीराला अतिरिक्त आम्लामुळे होणारा त्रास नाहीसा करण्यासाठी बिटाचा रस काढून प्यावा. हा रस प्यायल्याने मूत्रपिंड, पित्ताशय, आतडे स्वच्छ होते व शरीरातील अतिरिक्त आम्ले ही मूत्रावाटे किंवा शौचावाटे बाहेर पडतात.

४) हृदयरोग, मधुमेह, हाय कोलेस्टेरॉल असणाऱ्या व्यक्तींनी साखरेऐवजी गोड पदार्थ म्हणून बीट खावे. यामध्ये कमी प्रमाणात उष्मांक असल्यामुळे तसेच यातील साखरही नैसर्गिक असल्यामुळे कोणतेही दुष्पपरिणाम न होता साखर लगेचच रक्तात शोषली जाते.

५) गाजर, दुधी भोपळा या प्रमाणेच बिटाचाही हलवा करता येतो किंवा या तिन्हींचाही मिळून एकत्र हलवा केल्यास तो शरीरासाठी जास्त आरोग्यपूर्ण, रुचकर व शक्तीदायक होतो.

(६) भूक न लागणे, अपचन, तोंडाला चव नसणे, उलट्या, जुलाब या विकारांवर बीटच्या रसात अर्ध लिंबू पिळून तो रस अर्धा कप सकाळ-संध्याकाळ घ्यावा. असे केल्याने पचन व्यवस्थित होऊन भूक व्यवस्थित लागते.

७) कावीळ, आंत्रव्रण, आम्लपित्त या विकारांवर बिटाच्या पानांचा रस सकाळ-संध्याकाळ एक कप प्यावा.

८) बीटमध्ये तंतुमय पदार्थ भरपूर प्रमाणात असल्याने आतड्यातील मल पुढे ढकलून आतडे स्वच्छ करण्याचे काम बीट करते. म्हणून मलावष्टंभाची तक्रार असणाऱ्यांनी शौचास साफ होण्यासाठी बीट नियमितपणे खावे..

९) बिटाच्या पानांचा काढा केसांतील कोंडा नाहीसा होण्यासाठी, तसेच केसांतील उवा नाहीशा करण्यासाठी, केस धुण्यासाठी वापरावा. यामुळे केसांचे आरोग्य चांगले राहून केस लांबसडक होतात.

(१०) डोक्यातील चाई नष्ट करण्यासाठी बिटाच्या पानांचा रस डोक्याला चोळावा. याने चाई कमी होण्यास मदत होते.

११) बीट, काकडी, गाजर, पपई यांचा रस एकत्रित करून घेतल्यास शरीर आरोग्यपूर्ण राहते.

१२) मानसिक थकवा वारंवार जास्त जाणवत असेल, तर अशा वेळी बिटाचा रस कपभर दोन वेळा घ्यावा. बिटाच्या पानांची भाजी, थालीपीठ, पराठा तसेच बिटाची कोशिंबीर, हलवा, सॅलड अशा विविध स्वरूपात बिटाचा स्वास्थ्यरक्षणार्थ आहारामध्ये वापर करावा.

सावधानता

बीट हे कंदमूळ पचण्यास जड असल्यामुळे भूक मंद असणाऱ्यांनी व पचनशक्ती कमी असणाऱ्यांनी त्याचा वापर योग्य प्रमाणातच करावा. एकदम बीट खाण्यापेक्षा थोड्या प्रमाणात नियमित खावे. अतिरिक्त प्रमाणात खाण्यात आल्यास पोटात गुबारा धरून जुलाब होऊ शकतात.

dr.sharda.mahandule@gmail.com

Story img Loader