मुंबईसह ठिकठिकाणी बरसणारा पाऊस… पावसात चहा आणि गरमागरम भजी खाण्याचं सुख काही वेगळंच… गेल्या आठवड्यात विविध सणांच्या निमित्ताने सलग सुट्ट्या होत्या. मी सहजच दादाला म्हटलं, उद्या परवा दोन दिवस माझी सुट्टी आहे. चल ना लोणावळ्याला जाऊन येऊ. छान टायगर पाईंट वगैरे पाहून येऊ, असे म्हटल्यानंतर का कोण जाणे पण तोही पटकन तयार झाला. मग काय आम्ही बॅगा भरल्या, गाडीत टाकल्या आणि लगेचच निघालो. मुंबई सोडून थोडं पुढे गेल्यावर एका ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो. तिकडे एक नवीनच लग्न झालेले जोडपं असंच विश्रांतीसाठी थांबलं होतं. त्यावेळी ती मुलगी अरे तु दमला आहे तर मी ड्राईव्ह करते असं सहज म्हणाली आणि त्यानेही तिला गाडीची चावी देत ‘जा सिमरन जा, जी ले अपनी जिंदगी’ म्हणत गाडी चालवण्यासाठी दिली.

वेळ साधारण सकाळी आठची, या प्रसंगानंतर मी पण दादाला म्हटलं, दादा मी मुंबईत खूप छान गाडी चालवते. कधी तरी मला बाहेर फिरायला आल्यावर ड्राईव्ह करायला देत जा… त्यावर तो म्हणाला अजिबात नाही, मुलींना गाडी चालवायला देणं म्हणजे डोक्याला ताप करुन घेण्यासारखं आहे. गपचूप तोंड बंद कर आणि गाडीत बस्स! काही वेळाने पुढे गेल्यावर ती मुलगी आमची गाडी ओव्हरटेक करुन गेली आणि आमच्या दादाचा इगो हर्ट झाला. यानंतर पुढे एका सिग्नलवर त्या महिलेने गुपचूप गाडी थांबवली. पण सिग्नल सुटल्यानंतर तिची गाडी काही तांत्रिक अडचणींमुळे बंद पडली आणि वाहतुकीचा खोळंबा झाला.

dhananjay powar family welcome irina at kolhapur
Video : “नुसतं प्रेम भावा…”, म्हणत परदेसी गर्ल पोहोचली कोल्हापुरात! घरी येताच धनंजय पोवारच्या आई अन् पत्नीने औक्षण
MNS Chief Raj Thackeray
महाराष्ट्राचा पुढचा मुख्यमंत्री कोण होईल? राज ठाकरेंनी थेट…
BJP claims Priyanka Gandhi insulted mallikarjun Kharge video
प्रियांका गांधींनी उमेदवारी अर्ज भरताना मल्लिकार्जुन खरगेंना बाहेर उभं केलं? भाजपाने शेअर केला ‘तो’ VIDEO
krushna abhishek govinda feud ended
अखेर ७ वर्षांनी वाद मिटला! जखमी गोविंदाची भाचा कृष्णा अभिषेकने घेतली भेट; म्हणाला, “मामींना भेटण्याची भीती…”
Woman Shares Heartfelt Story on Why Mother's Home Matters After Husband's Kidney Failure
“लग्नानंतर एका वर्षात माझ्या नवऱ्याच्या दोन्ही किडन्या फेल झाल्या..” महिलेनी सांगितले आयुष्यात माहेर का महत्त्वाचे? पाहा VIDEO
ias shailbala martin question loudspeakers in temples
“मंदिरांवरील लाऊडस्पीकरमुळे ध्वनी प्रदुषण होतं, मग…” महिला IAS अधिकाऱ्याची पोस्ट चर्चेत!
anupam kher on not having own child
पत्नीला पहिल्या पतीपासून झालेल्या मुलाला स्वीकारलं; मात्र अनुपम खेर यांना स्वतःचं मूल नसल्याची खंत, म्हणाले, “तो…”
woman crushed to death under a car by tourists due to a dispute over rent
पर्यटकांकडून महिलेची गाडीखाली चिरडून हत्या; रायगड जिल्ह्यातील घटना, आठपैकी तीन आरोपींना अटक

आणखी वाचा : खासगीपणाच्या मूलभूत अधिकारावर घाला, ‘पेहेराव कोणता’ हा नोकरीवरून काढण्याचा मुद्दाच नाही

कोण देतं रे अशा बायकांना लायसन्स? यांना गाडी चालवायला द्यायची म्हणजे मोठं पापं. यांना साधी गाडीही ट्रॅफिकमधून काढता येत नाही. या महिलांनी किचनमध्ये गपगुमान काम करावं ना…कशाला नको त्या गोष्टींमध्ये नाक खुपसतात असे एक ना हजार टॉन्ट तिला आजूबाजूला गाडी चालवणाऱ्या सर्वांनीच मारले. मला मात्र माझ्या दादा बरोबरच त्या सर्वांचा राग एक स्त्री म्हणून आला होता, असं वाटलं उठावं आणि त्यांना तडक जाऊन एक प्रश्न विचारावा महिला या पुरुषांपेक्षा चांगल्या गाडी चालवतात हे तुम्हाला माहितीये का? एका प्रसिद्ध संस्थेने केलेल्या संशोधनात हे सिद्धही झालं आहे. दादालाही मी विचारलं!

सर्वेक्षणातील आकडेवारीनुसार, महिला आणि पुरुषांमध्ये गाडीचा अपघात होण्याचे प्रमाण दोन्हीही बाजूला आहे. मात्र यात पुरुषांची आकडेवारीही महिलांच्या तुलनेत किती तरी पट जास्त असल्याचे पाहायला मिळत आहे. म्हणजेच समजा एका वर्षात १० हजार अपघात होत असतील, तर त्यात सुमारे ४०० अपघातच महिला ड्रायव्हरकडून झालेले असतात. इतकंच नव्हे तर पुरुष हे महिलांपेक्षा ट्रॅफिकचे नियमांचे जास्त प्रमाणात उल्लंघन करताना दिसतात. रस्ते सुरक्षा आणि वाहतूक कायद्यातंर्गत ही बाब सिद्ध झाली आहे. जर एका वर्षाला १ लाख लोकांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलेले असेल तर त्यातील २० टक्के ड्रायव्हर्स महिला असतात.

आणखी वाचा : स्कॉटलंडला शक्य तर इतर देशांना का नाही?

  • इतकंच नव्हे तर ओव्हर स्पीडिंग, लायसन्स नसणे, गाडीचा विमा, दारू पिऊन गाडी चालवणे, निष्काळजीपणा या सर्व गोष्टी स्त्रियांना अजिबात आवडत नाहीत. त्यामुळे त्या सर्व नियम पाळत गाडी चालवणे पसंत करतात.
  • विशेष म्हणजे महिलांना वेगाने गाडी चालवणे सहसा आवडत नाही. त्यामुळे त्यांच्या गाडीचा वेग हा मर्यादितच असतो. एका संशोधनानुसार महिला आणि पुरुष वाहन चालकांमध्ये पुरुष सर्वसाधारणपणे वेग मर्यादेचे उल्लंघन करतात. तर महिलांचे प्रमाण यात फार कमी आहे.
  • ओव्हरटेक केल्याने अनेक अपघात होतात, याची महिलांना फार जाणीव असते. त्यामुळे त्या फार कमी वेळा ओव्हरटेक करतात आणि जर तसे करायचे असेल तर फार काळजीपूर्वक करतात. यामुळे ओव्हरटेकिंगमुळे होणाऱ्या अपघातात महिला चालकांचा सहभाग कमी असतो.

अनेकदा असं म्हटलं जातं की स्त्रिया या जन्मापासूनच फार सावध असतात, त्यांना गोष्टी पटकन जाणवतात आणि याचा गोष्टींचा फायदा त्यांना होतो. यामुळे वाहतूक नियमांचे पालन करण्यास मदत होते. एखादी महिला गाडी चालवत असेल तर ती नेहमी हेल्मेट, सीटबेल्ट यांसह विविध सुरक्षित गोष्टींचा वापर करते. कारण तिला तिचा जीव फारच प्रिय असतो. तसेच भारतीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार, रस्ते अपघात आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूसाठी महिला या फारच कमी वेळा जबाबदार असतात. यातील बहुतांश अपघात हे पुरुषांच्या चुकीमुळे होतात.

आणखी वाचा : डोन्ट अंडरएस्टिमेट द पॉवर ऑफ अ वुमन!

हे सर्व सांगण्याचं तात्पर्य एवढंच की जी स्त्री एक घर नीटनेटकं ठेवते, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंतच्या सर्व गोष्टी व्यवस्थित लक्षात ठेवते, तुमच्या खाण्यापिण्याच्या सवयी, गोळ्यांची वेळ, ऑफिसला जाण्याची-येण्याची वेळ या सर्व गोष्टी कटाक्षाने पाळते. घरातील तांदूळ, गहू, किराणा सामान आणि गॅस कधी संपेल हे तिला कायमच ठाऊक असते. तसेच ऑफिसमध्ये काम करतानाच्या डेडलाईनही ती पाळते. इतकंच कशाला साधी लिपस्टिक किंवा फाऊंडेशनचीही ती मनापासून काळजी घेते त्याची निगा राखते… मग अशी स्त्री तिच्या गाडीचीही काळजी तेवढीच घेते. तसेच महिला या प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालतात तर गाडी चालवण्याच्या बाबतीतही त्या कुठेही मागे नाहीत, हेच सर्वेक्षणाच्या आकडेवारीतून सिद्ध होतं