Bhakti Modi CEO of Reliance Retail’s Tira : रिलायन्स समुहाचे अध्यक्ष मुकेश अंबानी व त्यांचे कुटुंबीय कायमच चर्चेत असतात. गेल्या काही वर्षांत सगळ्या प्रकारच्या व्यवसायांमध्ये रिलायन्स उद्योग समुहाने आपली व्याप्ती वाढवली आहे. मात्र, यात असा एक ब्रँड आहे ज्यामुळे सध्या भक्ती मोदींच्या नावाची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या भक्ती मोदी कोण आहेत आणि वयाच्या अवघ्या तिशीत त्या रिलायन्समधील एका ब्रँडच्या सीईओ कशा बनल्या? जाणून घेऊयात…

भक्ती मोदी ( Bhakti Modi ) या मुकेश अंबानी यांचे अत्यंत जवळचे सहकारी मनोज मोदी यांची कन्या आहेत. काही महिन्यांआधी भक्ती यांनी रिलायन्स रिटेलचा ब्युटी प्लॅटफॉर्म असलेल्या ‘तिरा’ ( Tira ) या ब्रँडची सीईओ म्हणून जबाबदारी स्वीकारली. वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी त्यांनी ही कामगिरी केली आहे. भक्ती यांनी गेली अनेक वर्षे ईशा अंबानीबरोबर काम केलेलं आहे.

Who is Jaydeep Apte in Marathi
Jaydeep Apte : जयदीप आपटेला पोलिसांनी हाक मारली, रडत गयावया करु लागला आणि म्हणाला; “मला…”
aarya jadhao reacts on bigg boss marathi show is scripted
Bigg Boss हा शो स्क्रिप्टेड असतो का? घराबाहेर गेलेल्या आर्याने सांगितलं सत्य, म्हणाली…
LokPoll Survey Results in Maharashtra
LokPoll Survey: महाराष्ट्रात लोकसभेची पुनरावृत्ती होणार; मविआला १४१ ते १५४ जागा, तर महायुतीला…
CPI(M) General Secretary Sitaram Yechury died at 72 in delhi marathi news
Sitaram Yechury Passed Away: माकपचे ज्येष्ठ नेते सीताराम येचुरी यांचं निधन
Miscarriages Frequently
स्त्री आरोग्य : वारंवार गर्भपात होतोय का?
malaika arora father anil arora suicide
अभिनेत्री मलायका अरोराच्या वडिलांची आत्महत्या, इमारतीवरून उडी घेत संपवलं जीवन
Ajit Pawar Amol Kolhe
Amol Kolhe : अजित पवार म्हणाले, “आता आपणच साहेब”, अमोल कोल्हे प्रत्युत्तर देत म्हणाले, “राज्यात दोनच साहेब, एक शरद पवार, दुसरे…”
Kirit Somaiya
Kirit Somaiya : “मला न विचारताच घोषणा”, किरीट सोमय्यांनी भाजपाचा आदेश धुडकावला; म्हणाले, “पुन्हा अशी वागणूक…”

ईशा अंबानी रिलायन्स रिटेल व्हेंचर्सच्या (RRVL) संचालक मंडळावर आहेत. याशिवाय रिलायन्स रिटेलचे एमडी व्ही. सुब्रह्मण्यम यांच्याकडून सुद्धा भक्तीला मार्गदर्शन मिळालं आहे.

हेही वाचा : IIT किंवा IIM मध्ये शिक्षण न घेता गुगलमध्ये मिळवली नोकरी; अलंकृता साक्षीचे पॅकेज ऐकून व्हाल थक्क

भक्ती ( Bhakti Modi ) यांचे वडील मनोज मोदी हे मुकेश अंबानी यांच्या सर्वात जवळचे व्यावसायिक सहकारी आहेत. अंबानींच्या बिझनेस हाऊसमध्ये मनोज मोदी यांना विशेष स्थान आहे. रिलायन्स रिटेल, EIH आणि Jio सारख्या लोकप्रिय प्लॅटफॉर्मच्या बोर्डावर मनोज यांचा सहभाग आहे. मुकेश अंबानी भक्तीला आपल्या मुलीप्रमाणे सांभाळतात.

२०१६ मध्ये भक्तीचा लग्नसोहळा मुकेश अंबानी यांनी स्वत:च्या घरी आयोजित केला होता. मनोज मोदी आणि मुकेश अंबानी कॉलेजपासून एकत्र आहेत. रिलायन्सच्या ऑफिसमध्ये मनोज यांना एमएम म्हणजेच मास्टर माईंड म्हटलं जातं. तर, यांची लेक म्हणून भक्ती मोदी यांना ओळखलं जातं.

ईशा अंबानीने एप्रिल २०२३ मध्ये ‘तिरा’ ब्रँड लॉन्च केला होता. तेव्हापासून भक्ती मोदी सह-संस्थापक म्हणून ईशाबरोबर काम करत होत्या. ईशा व भक्ती यांची अनेक वर्षांपासून घट्ट मैत्री आहे. २०२३ – २४ या आर्थिक वर्षात भक्ती यांना वार्षिक ५ कोटी रुपये पगार मिळाला आहे. इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या माहितीनुसार, भक्ती यांची भूमिका केवळ तिरापुरती मर्यादित नाही. संपूर्ण ब्युटी आणि फॅशन डिव्हिजनला आकार देण्यात त्यांचा सहभाग आहे. आंतरराष्ट्रीय ब्रँड्स भारतात आणणे अशा अनेक महत्त्वाच्या धोरणात्मक निर्णयांमध्येही त्यांचा सहभाग आहे.

हेही वाचा : अवघ्या ३२ वर्षांची प्रसिद्ध गायिका ठरली १० हजार कोटींच्या संपत्तीची मालकीण, कशी करते कमाई? जाणून घ्या

करिअर आणि शिक्षण ( Bhakti Modi )

भक्ती यांनी पेनसिल्व्हेनिया विद्यापीठातून कन्झ्युमर सायकोलॉजीमध्ये बीए केलं आहे. तर, पार्सन्स स्कूल ऑफ डिझाईनमधून फॅशन/अपॅरल डिझाइनमधील पदवी मिळवली आहे. त्यांनी कारकि‍र्दीची सुरुवात रिलायन्सची उपकंपनी असलेल्या AJIO पासून केली होती. AJIO मध्ये कॅटेगरी इन्व्हेंटरी प्लॅनर आणि मर्चेंडाइझर म्हणून त्या काम सांभाळत होत्या.

वैयक्तिक आयुष्य

टॅली सोल्यूशन्सचे व्यवस्थापकीय संचालक तेजस गोयंका यांच्याशी २०१६ मध्ये भक्ती ( Bhakti Modi ) यांचा विवाह झाला. मुकेश अंबानींच्या प्रतिष्ठित अँटिलिया निवासस्थानी या दोघांचा लग्नसोहळा पार पडला होता. सध्या ‘तिरा’च्या सीईओ आणि रिलायन्स इंडस्ट्रीमधील रायझिंग स्टार म्हणून भक्ती मोदी यांना ओळखलं जातं.