राष्ट्रकुल स्पर्धेसाठी होणाऱ्या निवड चाचणी स्पर्धेत ऑलिम्पिक विजेत्या बॉक्सर मेरी कोमला मात देतच नितू घंघासने राष्ट्रकुल स्पर्धेतील जागा निश्चित केली. नीतू घंघासचा जन्म १९ ऑक्टोबर २०००मध्ये हरियाणातल्या भिवनी जिल्ह्यातील धनाना या गावी झाला. घरची परिस्थिती अगदीच बेताची होती. आई मुकेश देवी, वडील जय भगवान घंघास आणि एक भाऊ असं तिचं कुटुंब. त्याची संपूर्ण जबाबदारी एकट्या वडिलांच्या खांद्यावर. २००८ साली भिवनीचे बॉक्सर विजेंद्र सिंग यांनी ऑलिम्पिकमध्ये सुवर्णपदक पटकावलं; तेव्हापासून नीतूला या खेळानं मोहिनी घातली होती. कुटुंबानंही तिला प्रोत्साहन दिलं. त्यामुळे तिच्यासाठी हा प्रवास सोपा झाला. २०१२ मध्ये प्रथमच नीतूनं बॉक्सिंगचे डावपेच शिकण्यासाठी जगदीश सिंह यांच्या हाताखाली प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली.

बॉक्सिंगचे प्रशिक्षण घेण्यासाठी तिला गावापासून बसने रोज २० किमी.चा प्रवास करून जावं लागत असे. पण ती कधीच कंटाळली नाही. तिचे वडील कायम तिच्यासोबत असत. बॉक्सिंग या खेळासाठी सर्वात महत्वाची लागणारी गोष्ट म्हणजे तंदुरूस्त शरीर. नीतूला योग्य तो आहार मिळावा, दूध, तूप, लोणी अशा पौष्टिक गोष्टी तिला भरपूर आणि चांगल्या प्रतीच्या मिळाव्यात म्हणून तिच्या वडिलांनी कर्ज काढून तब्बल अडीच लाखाची म्हैस विकत घेतली.

Liquor and fish stocks seized in Bhayander news
मतदारांना आमिषे दाखविण्यास सुरवात; भाईंदरमध्ये मद्य आणि मासळाची साठा जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
Loksatta padsad lokrang readers reaction on article
पडसाद : त्यांच्याविषयी कुतूहल
prohibited tobacco products seized, Mhatrenagar in Dombivli, Dombivli, tobacco,
डोंबिवलीत म्हात्रेनगरमध्ये प्रतिबंधित तंबाखुजन्य पदार्थांचा साठा जप्त
Numerology
‘या’ तारखेला जन्मलेले लोक कमी वयात होतात श्रीमंत, कमावतात आयुष्यात भरपूर धन-संपत्ती
prarthana behere complete 7 year of marriage recalls her first meeting
पाच तास गप्पा, पॅनकेक अन् २ किलो बटर…; अरेंज मॅरेज पद्धतीने जमलेलं प्रार्थना बेहेरेचं लग्न; पहिल्या भेटीत नेमकं काय घडलेलं?
Rakul Preet Singh opens up about her diet
हळदीच्या पाण्याचे सेवन अन् दुपारच्या जेवणात…; रकुल प्रीत सिंगने सांगितला तिचा डाएट प्लॅन; म्हणाली, “रात्रीचे जेवण…”
Marathi Actor Siddharth Chandekar Special Post share for amey wagh on his birthday
“जीभेवर व्हेज, मनात नॉनव्हेज…”, सिद्धार्थ चांदेकरने अमेय वाघला वाढदिवसाच्या दिल्या हटके शुभेच्छा; म्हणाला…

आपल्या मुलीला योग्य प्रशिक्षण मिळावं यासाठी नीतूचे वडील कायमच जीव ओतून प्रयत्न करत असत. मुलीला गरज पडेल तेव्हा आपण तिच्या सोबत उपलब्ध असावे यासाठी त्यांनी तब्बल ३ वर्ष आपल्या कामाच्या ठिकाणी बिनपगारी रजा घेतली. या त्यागाचे फळ नीतूने लवकरच दिले. २०१६ मध्ये तिनं करिअरमध्ये पहिलं मोठं यश मिळवलं. ग्वाल्हेर येथे झालेल्या शालेय खेळांमध्ये तिने सुवर्णपदक जिंकलं. या कामगिरीमुळे ती त्याच वर्षी गुवाहाटी येथे जागतिक युवा चॅम्पियन ठरली. तसंच तिनं आशियाई युवा स्पर्धेतही सुवर्णपदक पटकावलं. त्यानंतर सलग दोन वर्षं २०१७च्या एआयबीए युवा महिला जागतिक बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये आणि २०१८च्या आशियाई युवा बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्णपदक मिळवलं.

खेळ म्हटलं की दुखापत ही आलीच, २०१९ मध्ये नीतूलाही खांद्याच्या दुखापतीला सामोरं जावं लागलं त्यामुळे जवळपास दोन वर्ष तिला खेळापासून दूर राहावं लागलं. हा काळ तिच्यासाठी फार कठीण होता. त्यातच करोनानं संपूर्ण जगाला घेरलं होतं. त्याचा परिणाम तिच्या प्रशिक्षणावरही झाला. मात्र जिद्दी असलेल्या नीतूने हिंमत कायम राखली. दुखापतीतून सावरल्यावर चक्क शेतात सरावाला सुरूवात केली.

२०२१मध्ये पुन्हा एकदा बॉक्सिंगच्या रिंगणात पाऊल टाकत श्रीगणेशा केला. त्याच वर्षी तिने वर्षी स्ट्रांझा मेमोरियलमध्ये पदक प्राप्त केलं. नुकत्याच पार पडलेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत महिलांच्या बॉक्सिंगमध्ये ४५ ते ४८ या वयोगटात जबरदस्त कामगिरी करत नीतू घंघासनं भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं.