हॅलो! मी आहे आर.जे. ढिंच्याक, रेडिओ गप्पा एफ.एम.वर. आजच्या ‘चील मार’च्या एपिसोडचा विषय तुमच्या अगदी जवळचा आहे. ‘बॉयफ्रेंडची डिमांड लिस्ट’! आता तुम्ही म्हणाल, रीलेशनशिपमध्ये गर्लफ्रेंड डिमांड करते, बॉयफ्रेंड नाही, तर तुम्ही फारच भोळ्या आहात बरं का! हे आजकालचे तरुण, एखादी जरा कुठे सलगीने वागते असं वाटलं, की नको त्या अपेक्षा करायला लागतात. ते हिंदीत म्हणतात ना, ‘उंगली दी तो हात पकडते हैं’, अगदी तस्स!

आज तुम्हाला मी आपल्या काही श्रोत्यांचे, मुलींचे अनुभव सांगणार आहे. नावं अर्थात बदलली आहेत, उगाच लोच्या नको नाही का? तर फ्रेंड्स, आजची आपली पहिली फ्रेंड आहे, आहना. “हाय आहना. आम्हाला सांग, की तू कधीपासून रीलेशनशिपमध्ये आहेस आणि त्याच्या तुझ्याकडून काय अपेक्षा आहेत?”

mazhi maitrin
माझी मैत्रीण : …आणि मैत्रीचे बंध दृढ झाले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
Boyfriend surprises his blind girlfriend with a braille proposal video
याला म्हणतात खरं प्रेम! अंध गर्लफ्रेंडला बॉयफ्रेंडनं केलं अनोखं प्रपोज; VIDEO पाहून तरुणाचं कराल कौतुक
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Loksatta balmaifal The fun of sharing kid moral story
बालमैफल : शेअरिंगची गंमत
Father daughter kanyadan emotional video goes viral father daughter bonding video
“हा क्षण का असतो मुलींच्या आयुष्यात?” लग्न ठरलेल्या प्रत्येक मुलीनं आणि तिच्या वडिलांनी पाहावा असा VIDEO
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास

“सगळ्यांना हॅलो! माझी आणि गौरवची मैत्री साधारण तीन वर्षांपासूनची आहे. आमच्या घरी त्याबद्दल बऱ्यापैकी कल्पना आहे. म्हणजे आम्ही लग्नाचा निर्णय घेतला तर घरून विरोध होईल असं वाटत नाही, पण आजकाल तो सारखं मला त्याच्या पी.जी. रूमवर बोलवतो. घरमालक इथे नाहीत, आपण दोघं मजा करू म्हणतो. मजा म्हणजे त्याला शारीरिक संबंध म्हणायचं आहे, ज्यासाठी मी अजिबात तयार नाही.” “तू तुझं मत त्याला सांगितलंच असणार ना?”

“एकदा नाही, अनेकदा सांगितलं. लग्नाआधी तसे संबंध ठेवण्यास माझी बिलकुल तयारी नाही, कारण त्यामुळे अनेक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होऊ शकतात. प्रत्येक नात्याची एक प्रतिष्ठा असते असं मला वाटतं. पती-पत्नीच्या नात्याची गरिमा सांभाळायला हवी.”

हेही वाचा… अवखळ, बिनधास्त ते परिपक्व व्यक्ती…. हा प्रवास मोलाचा!

“मग यावर त्याची प्रतिक्रिया काय?” “तो आजकाल माझ्याशी पूर्वीइतकं मोकळेपणाने बोलत नाही. संवाद कमी झालाय. म्हणजे बघ, माझ्यातील असंख्य गोष्टी त्याला आवडतात, माझा स्वभाव, माझं करिअर, माझं दिसणं, माझ्यातील कला. हे सगळं माझ्या एका नकारात कमी मोलाचं ठरलं का? त्याचं जर माझ्यावर खरंच प्रेम आहे, तर माझ्या या मताचा तू आदर केलाच पाहिजे ना? आणि लग्नानंतर शारीरिक संबंध असणारच आहेत. मी फक्त विवाहपूर्व संबंध नको म्हणाले.

इतकंच!” “आजच्या आपल्या कार्यक्रमातून तू त्याला काय संदेश देऊ इच्छितेस?” “गौरव, माझं तुझ्यावर मनापासून प्रेम आहे. तू मला आयुष्यभरासाठी जोडीदार म्हणून हवा आहेस, तुझ्या गुण-दोषांसहित. मला माहितेय, की तुझं माझ्या फक्त शरीरावर प्रेम नाही, त्यामुळे प्लीज मला समजून घे. लव यू.”

हेही वाचा… रंगाच्या भिंती तोडू पाहणाऱ्या सावनीची चूक तरी काय?

“थँक्यू आहना. तुम्ही ऐकत आहात, ‘चील मार’ कार्यक्रम, रेडिओ गप्पा एफ.एम.वर. मी आहे, आर.जे. ढिंच्याक. आपली पुढील मैत्रीण आहे, सोनाली! सोनाली, आम्हाला सांग, काय आहे तुझ्या बॉयफ्रेंडची डिमांड लिस्ट? “मी आणि माझा बॉयफ्रेंड गेल्या दोन वर्षांपासून ‘लाँग डीस्टन्स रिलेशन’मध्ये आहोत. म्हणजे मी पुण्यात आणि तो बंगळुरुला असतो. त्याला वाटतं, मी रोज व्हीडिओ कॉल करावा, त्याच्याशी निवांत बोलावं आणि तो महिन्यातून दोन दिवस इथे आला की पूर्णवेळ त्याच्यासोबत असावं.

मला शनिवारी सुट्टी नसते, फक्त रविवारीच असते. पण मी त्याच्यासाठी शनिवारी रजा टाकते. आतासा तो मला सारखं हॉटेलवर जाऊन राहू असं म्हणतो. माझ्या घरच्यांना अजून त्याच्याबद्दल माहिती नाही. आमच्या नात्याचा शेवट लग्नात होईल, असा मला विश्वास असला तरी मी लग्नाआधी सेक्ससाठी तयार नाही. गेल्या आठवड्यात त्याने व्हीडिओ कॉलवर मला कपडे काढून समोर बसण्याची मागणी केली. हे मला आवडलं नाही. आजकाल अशा क्लिप्स बनवून ब्लॅकमेल करण्याचे किती भयानक प्रकार घडतात, मग मी सावध नको राहायला?” “पण या मुद्द्यावर त्याने तुझ्याशी ब्रेकअप केला तर?”

“करू देत मग! अशा मुलाशी संबंधच नको. मी भलत्या मागण्यांना बळी पडून स्वतः कुठल्या संकटात पडणार नाही आणि कुटुंबालाही अडचणीत टाकणार नाही. त्याला माझा निरोप आहे, की त्याने सतत ही मागणी केली तर त्याच्याबरोबरचं नातं पुढे न्यायचं की नाही याचा मला विचार करावा लागेल.”

“ थँंक्स सोनाली, तुझी मतं स्पष्टपणे मांडल्याबद्दल. फ्रेंड्स, आपण आणखी काही मैत्रिणींशी बोलणार आहोत, पण आता एक कमर्शियल ब्रेक घेऊ यात! बोलत्या व्हा आमच्या कार्यक्रमात. ज्याचं नाव आहे, ‘चील मार’ !

adaparnadeshpande@gmail.com