मंगला जोगळेकर

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मेंदूचे स्मरणविषयक कार्य आयुष्याच्या उत्तरार्धातसुद्धा उत्तम चालावे यासाठी कोणते घटक उपयुक्त ठरतात, याबद्दल जगभर अनेक संशोधने झाली आहेत. त्यातून काही गोष्टी समजल्या आहेत, त्या अशा- ज्यांना शिक्षणाची आवड आहे, जे पदवीधर आहेत, जे बुद्धीला खाद्य देणार्‍या गोष्टींमध्ये रस घेतात, वाचन, लेखन, आवडीच्या विषयांवर चर्चा, माहितीपूर्ण कार्यक्रम बघणे, नवीन भाषा शिकणे आदी तर्‍हतर्‍हेच्या प्रकारांनी जे ‘मेंदूचा जागर’ घडवून आणतात, त्यांच्यामध्ये ‘डिमेन्शिया’ (अर्थात विस्मरणाचा आजार व त्यासंबंधित लक्षणे) होण्याची शक्यता थोडीफार कमी असते.

आणखी वाचा : विस्मरणाचा आजार कसा ओळखावा?

न्यूयॉर्कमध्ये ७५ वर्षांपेक्षा वयाने अधिक असलेल्या लोकांच्या अभ्यासातून असे दिसले, की जी मंडळी बुद्धिबळ, सोंगट्यांसारखे खेळ नियमितपणे म्हणजे आठवड्यातून चार वेळा तरी खेळतात, विविध प्रकारांनी मेंदूला जागृत ठेवतात, त्यांच्यात डिमेन्शिया होण्याची शक्यता कमी असते. चीनमधल्या अभ्यासातून असे दिसून आले, की जी मंडळी मोठ्या वयातही आव्हानात्मक गोष्टी करणे चालू ठेवतात, त्यांच्या बुद्धीची झीज कमी प्रमाणात होते. रोजच्या रोज नवीन आव्हाने आपल्या मेंदूला ताजेतवाने ठेवतात. नित्यनवीन शिकल्यामुळे मेंदू घडत राहातो. औत्स्युक्य टिकवल्यामुळे वयानुसार होणारी झीज घडत असतानादेखील आपली ताकद राखून ठेवण्याचा मेंदू प्रयत्न करतो.

आणखी वाचा : विवाहपूर्व मार्गदर्शन : मैत्रीच्या पुढची पायरी कोणती ?

परंतु असेही दिसते, की मेंदूला अनाठायी आराम दिल्यामुळे, निवृत्तीनंतर येणार्‍या सुस्तीमुळे, जीवनात रस घेणे थांबवल्यामुळेही मेंदू विसावतो. आपला स्वभावधर्म सोडून स्मरण ठेवण्याचे आपल्याला नेमून दिलेले काम करण्यात तो कुचराई करायला लागतो. त्याचाच परिणाम म्हणून आपले विस्मरण वाढते. विस्मरणाऐवजी स्मरणाची गाडी द्रुतगतीच्या मार्गाने वळवण्यासाठी ‘आराम हराम हैं’ हा मंत्र लक्षात ठेवा. मेंदूला वापरायला शिका. ‘मला काम द्या, मी कामाचा भुकेला आहे,’ असे सांगणारे मेंदूशिवाय दुसरे कुणीही या जगात भेटणार नाही! या वृत्तीमुळे मेंदूच्या कक्षा आपण कितीही रुंदावू शकतो.

आणखी वाचा : काय आहे स्मृती मानधनाचा डाएट प्लान?

न्यूरोबिक्स
आपण ज्या गोष्टी एरवी करतो, त्या करण्याऐवजी त्यामध्ये वेगळेपण ठेवा, या संकल्पनेला ‘न्यूरोबिक्स’ असे म्हणतात. न्यूरोबिक्सच्या वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीत पाचही ज्ञानेंद्रिये आणि त्याबरोबर आपले मन, भावना अनोख्या मार्गाने वापरल्या जातात. अशा रीतीने ज्ञानेंद्रियांना एक प्रफुल्लित अनुभव देणे म्हणजे न्यूरोबिक्स.
हे व्यायाम प्रवास करताना, जेवणाच्या सुट्टीमध्ये, स्वयंपाक करताना, इतर काही बारीकसारीक काम करतानासुद्धा करता येऊ शकतात.

आणखी वाचा : मराठी अभिनेत्रींनी बोल्ड सीन दिले म्हणून त्यांचे कुटुंबीय दोषी कसे?

मेंदूसाठीचे व्यायाम
• आज रात्री उजव्या हाताने दात घासण्याऐवजी ते डाव्या हाताने घासून बघा. त्यानंतर तुम्हाला असे जाणवेल, की मेंदूला या क्रियेकडे लक्ष द्यावे लागले, कारण हे काहीतरी रोजच्यापेक्षा वेगळे होते, नवीन होते.
• हाताने जेवण्याऐवजी काट्याने किंवा चॉपस्टिक्स वापरुन जेवा.
• जेवणाच्या मेन्यूमध्ये कधीही न चाखलेले पदार्थ निवडा.
• रोजच्या रस्त्यावर चालायला न जाता वेगळ्या मार्गाने चालायला जा.

आणखी वाचा : ती पुन्हा भेटली… पण या खेपेस वेगळ्या रूपात!

• कुणाच्या घरी किंवा इतर कुठे जाऊन आल्यावर त्या ठिकाणी जाण्याचा नकाशा तयार करा.
• मनातल्या मनात गुणाकार, भागाकार करा. शक्यतो कॅल्क्युलेटर न वापरता हिशेब करा.
• टी.व्ही.वर बघत असलेल्या मालिकेची गोष्ट आपल्या शब्दांत लिहा. गोष्टीचा पुढील भाग आपल्या शब्दांत आधीच पकडा.

आणखी वाचा : Ind vs Pak: प्रिय अनुष्का, थँक ‘यू’!

या सर्व क्रियांमधून मेंदू जागृत होऊन त्या क्रियेकडे लक्ष दिले जाईल आणि त्यामुळे लक्षात राहाणेही आपोआप होईल.
एकाच प्रकारचे व्यायाम सदोदित करणार्‍यांच्या मेंदूला पुरेसा व्यायाम मिळेलच असे नाही. उदा, जे शब्दकोडे तुम्ही दहा-पंधरा मिनिटांत सहज सोडवू शकाल, जे सोडवणे तुमच्या हातचा मळ असेल. त्यातून तुम्हाला झालाच तर अत्यल्प फायदा होईल. त्यामुळे एकाच वर्तमानपत्रातील शब्दकोडे पुरेसे आव्हानात्मक नसेल, तर दुसर्‍या वर्तमानपत्रातील कोडे सोडवा.

आणखी वाचा : Caesarean Delivery: सिझेरियन डिलिव्हरीनंतर किती दिवसांनी शारीरिक संबंध ठेवता येतील? तज्ज्ञांनी दिलेली ही माहिती नक्की वाचा

कोडी मास्टरांना कोडी सोडवण्याऐवजी स्वतःची कोडी तयार करुन एक वेगळेच आव्हान मिळेल. एकाच प्रकारची कोडी सतत सोडवण्याऐवजी वेगवेगळ्या प्रकारची कोडी सोडवणे केव्हाही चांगले. त्यामुळे मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना वेगवेगळी आव्हाने मिळतील. ‘सुडोकू’तून मिळणारे आव्हान शब्दकोड्याहून वेगळे असेल. तर बुद्धिबळातून, ब्रिज खेळण्यातून मिळणारे आव्हान या दोन्हीपेक्षा वेगळे असेल.

आणखी वाचा : फोर मोअर शॉट्स – तिसऱ्या पर्वात महिलांची लैंगिकता, सेक्स आणि बरंच काही…

मेमरी क्लब्स
ब्रेन एरोबिक्स, ब्रेन जिम, स्मरणशक्तीवर्धन करणारी ‘वेब पोर्ट्ल्स’ अशा विविध कार्यक्रमांमधून स्मरणशक्तीच्या विषयाबाबत अमेरिकेत बऱ्याच वर्षांपासून जागृती केली जात आहे. आपल्याकडे हा विषय नवीन असताना पुणे येथे २०१४ मध्ये ‘मेमरी क्लब’ सुरू करण्यात आला. आज पुण्यात आणि नाशिकमध्येही असे मेमरी क्लब चालू झाले आहेत.

आणखी वाचा : नातेसंबंध : मैत्री… लग्नापूर्वी आणि नंतरची

मेमरी क्लब्समध्ये आठवड्यातून एकदा एकत्र जमून मेंदूसाठी आनंददायी व्यायाम (एक्सरसाईज) घेतले जातात.
मेंदूला कायम फॉर्मात ठेवण्यासाठी त्याला नियमित खाद्य देणे अतिशय महत्त्वाचे आहे. वर्षभरात महिनाभर व्यायाम केला तर जसा शरीराला व्यायामाचा फायदा होणार नाही, तसेच वर्षभरातून चार आठवडे मेंदूला व्यायाम देऊनही तो पुरेसा होणार नाही. चार-आठ दिवसात मेंदूला सुपर पॉवरफुल करणारी पुस्तके, गोळ्या आणि इतर कार्यक्रमांचा फोलपणा यावरुन लक्षात यावा. मेंदूचे कुतुहल वाढवून, त्याला जागृत ठेवणे हा नित्यक्रमाचाच भाग व्हायला हवा.

आणखी वाचा : मासिक पाळीदरम्यान सेक्स? तर… हे नक्की वाचा

मेंदूचे हे व्यायाम करून पाहा

  • ‘च’ आणि ‘क’ दोन्हीही अक्षरे असलेले शब्द लिहा- उदा. ‘चूक’
  • आकाश, आभाळ या शब्दांशी नाते सांगणारे किती शब्द तुम्ही सांगू शकाल?
  • ‘प्यार’ शब्द असलेल्या किती सिनेमांची नावे तुम्हाला आठवतात?
  • तुमचा आवडता एक खेळ, गोष्ट, वस्तू यांपैकी कशाचीही तुमच्या परदेशातील नातीला तुम्ही कशी ओळख करुन द्याल?
  • आता ज्येष्ठ नागरिक असलेल्यांच्या लहानपणी सर्वजण सामान आणायला जुन्या कापडातून घरीच शिवलेल्या पिशव्या वापरत. आता मात्र ‘पिशवी’ हा शब्द हद्द्पार होऊन ‘डिझायनर बॅग’ आल्या आहेत. पिशवीचा हा प्रवास तुमच्या शब्दात टिपा. किंवा चित्रे काढून पिशवीचे हे स्थित्यंतर चित्रांमध्ये पकडा.