पृथ्वीवरील दक्षिण ध्रुवाचे टोक असणाऱ्या अंटार्क्टिकामध्ये भारतीय वंशाच्या अधिकारी आणि ब्रिटिश शीख सैन्यातील फिजिओथेरपिस्ट हरप्रीत चंडी यांनी कोणाच्याही पाठिंब्याशिवाय कठीण प्रवास पूर्ण करणारी पहिली महिला बनण्याचा इतिहास रचला आहे. ‘ध्रुवीय प्रीत’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या हरप्रीत यांनी सोमवारी अंटार्क्टिकामध्ये तुफानी हिमवृष्टीमधे ३३ दिवस आणि १,१३० किलोमीटरचा अत्यंत अवघड ट्रेक एकटीने पूर्ण केला. अशा प्रकारे ट्रेक करणाऱ्या त्या पहिला कृष्णवर्णीय महिला ठरल्या आहेत. हरप्रीत चंडी यांनी ट्रेकच्या सुरुवातीपासून लाइव्ह ट्रेकिंग मॅप अपलोड केला होता. वेळोवेळी त्यांनी लाइव्ह ब्लॉगमधून त्यांच्या मोहिमेबद्दलची माहिती दिली.

त्यांनी ३३ व्या दिवशी १,१३० किलोमीटर प्रवास केल्यानंतर बर्फाळ प्रदेशात सर्व किटसह स्लेज ओढून आणि उणे ३० अंश सेल्सिअसमध्ये तिच्या थेट ब्लॉगवर प्रवेश केला आणि त्यांनी हा इतिहास रचला असल्याचे स्पष्ट केले. हरप्रीत यांनी एकट्याने ट्रेक करणारी सर्वांत वेगवान महिला असल्याचा दावा केला आणि इतिहासात त्यांचे नाव कोरले आहे. केवळ ३३ दिवस, १३ तास व १९ मिनिटांत आश्चर्यकारक १,१३० किमी कव्हर करून हरप्रीत यांनी दक्षिणेकडील खंडाच्या बर्फाळ विस्तारावर त्यांच्या यशाची छाप सोडली आहे. या खास गोष्टीमुळे त्यांना बर्फाळ प्रदेशावर विजय मिळवणारी सर्वांत वेगवान महिला म्हणून संबोधले गेले आहे.

Steve Smith Smashes 34th Test Century and 11th Hundred Against India Most By any Batter IND vs AUS
IND vs AUS: स्टिव्ह स्मिथचं ऐतिहासिक कसोटी शतक, भारताविरूद्ध ‘ही’ कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
tiger sighted again in barshi fear continues among villagers
बार्शीत वाघाचे पुन्हा दर्शन; गावकऱ्यांमध्ये दहशत कायम
minister dhananjay munde meet cm devendra fadnavis over murder of sarpanch santosh deshmukh
आरोपांनंतर धनंजय मुंडे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला; देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी
bullock cart race
मुरुड समुद्रकिनारी बैलगाडा शर्यतीच्या सरावाचा थरार, पर्यटकांचा मात्र थरकाप
pune speed breakers
पुण्यातील ‘इतके’ स्पीड ब्रेकर काढणार ? कारण काय
butibori flyover collapse
बुटीबोरी पुल खचल्यावर सरकारला जाग, सुरक्षा ऑडिटबाबत फडणवीस गडकरींशी चर्चा करणार
Solapur tiger latest marathi news
Solapur Tiger News : ५० वर्षांनी सोलापुरात व्याघ्रदर्शन; शेतकऱ्यांमध्ये दहशत

हेही वाचा…वडिलांप्रमाणेच रुग्णसेवेत घेतलं वाहून, आज आहे ८२ हजार कोटी व्यवसायाच्या मालकीण; कोण आहेत सुनीता रेड्डी? घ्या जाणून

रेकॉर्ड ब्रेकिंग मोहीम :

हरप्रीत चंडी यांची मोहीम २६ नोव्हेंबर रोजी रॉन्ने आइस शेल्फवरील ( Ronne Ice Shelf) हरक्यूलिस इनलेट येथून सुरू झाली. तसेच २८ डिसेंबर रोजी वेळेनुसार पहाटे २.२४ वाजता त्या दक्षिण ध्रुवावर पोहोचल्या. त्यांच्या या आव्हानात्मक ट्रेकमध्ये लवचिकता आवश्यक होती. कारण- हरप्रीत यांनी दररोज सरासरी १२ ते १३ तास ट्रेकिंग केले आणि त्या बर्फाळ प्रदेशात ७५ किलो स्लेज खेचले. २८ डिसेंबर रोजी यूके वेळेनुसार पहाटे २.२४ वाजता दक्षिण ध्रुवावर पोहोचून, त्यांनी स्वतःचा विक्रम मोडला आहे.

हरप्रीत चंडी यांची पहिली प्रतिक्रिया :

दक्षिण ध्रुवावरून आपली मोहीम यशस्वीरीत्या पूर्ण केल्यानंतर हरप्रीत यांनी मत मांडले की, आणि लिहिले, “मी हे केलं याचा मला आनंद आहे. माझ्या आधीच्या मोहिमेपेक्षा हे पूर्णपणे वेगळे होते. मी हा टास्क पूर्ण करताना स्वतःला प्रेरित केले आणि वेग वाढवण्याचा प्रयत्न केला. सध्या लष्करी सेवेतून करिअरमध्ये ब्रेकवर असलेल्या हरप्रीत यांनी या संधीबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आणि अंटार्क्टिकाला एक अप्रतिम ठिकाण म्हटले; ज्याने त्यांना सुरक्षित मार्ग मिळवून दिला.“ हरप्रीत म्हणाल्या की, मी परिस्थितीवर नियंत्रण ठेवू शकले नाही. त्वचा पांढरी पडणे, ३० अंश सेल्सिअस तापमान, हे सगळं असताना मला माझे ध्येय पूर्ण करण्यावर नियंत्रणही ठेवायचे होते.

Story img Loader