बहरलेला दिन का राजा, एक्झोराचे गर्द गेंद, सतत फुलणारी सदाफुली. पुष्परसाचे हे पेले आहेत खास पाहुण्यांसाठी, फुलपाखरांसाठी. आपण घरी पाहुणे येणार असतील तर त्यांच्या आवडीचा पदार्थ करतो असाच विचार मंदाकिनीताई करतात फुलपाखरांसाठी! मिरज येथील व्यावसायिक क्षेत्रातील अग्रणी मराठे घराण्यातील ज्येष्ठ व्यक्तिमत्त्व मंदाकिनीताई मराठे यांच्या बंगल्याच्या आवारातील अर्ध्या एकराच्या ऐसपैस बागेत खास झाडं आहेत फुलपाखरांसाठी. कधी किनरवापी, कधी चंदेरी, कधी अंजिरी, कधी शेंदरी, कधी मखमली, कधी भरजरी अशी मुग्ध दुनिया म्हणजे फुलपाखरांची दुनिया. मंदाताई म्हणजे निसर्गप्रेमी, सौंदर्यासक्त, ऋजू अन् लाघवी व्यक्तिमत्त्व.. त्यांच्या बागेने केव्हाच अर्धशतक पार केले आहे. इथे काटेकोर नियोजन नाही तर कुटुंबवत्सलता आहे. त्यामुळे झाडांची, फुलझाडांची, वेलींची विविधता तर आहेच पण निसर्गातील प्रत्येक घटकाबद्दल आत्मियता आहे. पक्षी निरीक्षणाचा छंद होताच पण बागेत विविध फुलपाखरे येतात हे जाणवल्यावर त्यांनी फुलपाखरांचा अधिक अभ्यास केला. ‘दिन का राजा या वेलीवर फुलपाखरे अक्षरश: लगडलेली असत, हळूहळू कोणाला काय आवडतं हे समजत गेलं,’ असं मंदाताईंनी सांगितलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा