‘‘हाय, ऊर्मी, तू माझा फोन का उचलत नाहीस? काही त्रास होतोय का तुला? मला तुझी काळजी वाटतेय. तुझ्याशी बोलल्याशिवाय माझा दिवस सुरू होत नाही. आता सवय लागलीय तुझी. सकाळी तुझ्याशी बोललं की मस्त वाटतं. तुझ्याकडून एक पॉझिटिव्हीटी मिळते. घडलेलं सारं तुझ्याशी शेअर केल्याशिवाय मला चैन पडत नाही. केवळ तू आणि तूच मला समजून घेऊ शकतेस, पण गेले दोन दिवस तू माझा फोन उचलत नाहीयेस. नेहमीप्रमाणे या रविवारी तू कॉफी शॉपमध्ये भेटायलाही आली नाहीस. वेड्यासारखं दोन तास मी तुझी वाट बघत होतो. तुझा फोन नाही, मेसेज नाही. मी इकडं तळमळतोय. किमान मेसेजला उत्तर तरी दे. तुला भेटल्याशिवाय मला चैन पडणार नाही. प्लीज प्लीज… काय झालंय ते मला कळव. लव्ह यु ऊर्मी.”

ऊर्मिलाने पियुषचा मेसेज वाचला, पण तिनं फोन बाजूला ठेवला. त्याला काय आणि कसं उत्तर द्यावं हे तिला सुचत नव्हतं. ती विवाहित होती. प्रणवसोबत तिचा संसार व्यवस्थित चालू होता. तिची मुलगीही १०वर्षांची होती. संसारात तिला काहीही कमी नव्हतं, फक्त तिच्या भावनिक गरजांचा कोंडमारा होत होता. तिचा नवरा प्रणव कलेच्या बाबतीत अगदीच उदासीन होता. तिच्या कोणत्याही कलागुणांत प्रणवला आजिबात रस नव्हता. चित्रांची प्रदर्शन बघायला त्यानं सोबत यावं असं तिला खूप वाटायचं, पण तो कधीही तिच्यासोबत गेला नाही. अर्थात तिनं कुठंही जाण्याबाबत त्याची कधी काही हरकतही घेतली नव्हती.

Marathi Actor Hemant Dhome has a new cow in his family
अभिनेता हेमंत ढोमेच्या कुटुंबात आली नवीन सदस्य, नाव आहे खूपच खास
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
maharashtra assembly election 2024 ravindra dhangekar vs hemant rasane kasba peth assembly constituency
धंगेकर-रासने लढतीच्या दुसऱ्या फेरीत कोणाची बाजी?
narendra modi yogi adityanath campaign in maharashtra
लालकिल्ला : मोदी-योगींच्या प्रचाराने काय साधणार?

हेही वाचा… स्वास्थ्यकारक स्वयंपाक करायचाय?… मग हे वाचा-

एका चित्र प्रदर्शनात पियुषची आणि तिची ओळख झाली. तिच्या पेंटींगचं, तिच्यातील कलेचं त्यानं भरभरून कौतुक केलं. तिला खूप छान वाटलं. त्याचे ते शब्द कितीतरी दिवस ती मनात साठवत आठवत होती. पियुषही एक कलाकार होता. तो विवाहित होता, त्यालाही एक मुलगा होता. तो एका जाहिरात कंपनीत काम करीत होता. आपल्याला आपली कला नोकरी पुरती मर्यादित ठेवावी लागली, पण ऊर्मिला तिची कला जोपासते आहे, याचं त्याला भयंकर कौतुक वाटत होतं. त्यानंतरही ते एका प्रदर्शनात भेटले आणि त्याच वेळी एकमेकांचा इमेल आयडी आणि व्हाट्सॲप नंबरची देवाणघेवाण करून चॅटींग सुरू झालं. त्याचा मेसेज आला, की ती खूष व्हायची. तिनं काढलेली चित्र ती त्याला फॉरवर्ड करायची, तो त्यात काही बदल सुचवायचा, पटलं तर ती बदल करायची. आपलं चित्र आता परिपूर्ण होतंय याचं समाधान तिला वाटायचं. अनेक गोष्टींवर दोघांच्या गप्पा, चर्चा होऊ लागल्या.

आणि या भावनिक देवाणघेवणीत ते एकमेकांच्या जवळ आले. सुरुवातीला ऊर्मिलाने पियुषबद्दल प्रणवला सांगितलं, पण तिचं ऐकण्यात त्याला कोणताही रस नव्हता. ऊर्मिला आणि पियुष यांचे एकमेकांशी संवाद वाढले. आठवड्यातून एकदा तरी दोघेजण कॉफीशॉपमध्ये भेटू लागले. दोघांना एकमेकांच्या सहवासात निरपेक्ष आणि निरागस आनंद मिळत होता. दोघांना एकमेकांविषयी शारीरिक आकर्षण नव्हतं, ना त्याबाबत कधी त्यांच्यात चर्चा झाली. दोघांमध्ये लपवण्यासारखं काहीही नसलं तरी सांगण्यासारखंही काहीही नव्हतं, म्हणून दोघंही आपल्या जोडीदाराला कळू न देता एकमेकांना भेटत होते.

हेही वाचा… विभक्त पतीनं दुसर्‍या स्त्रीबरोबर राहणं क्रूरता नाही!

सगळं व्यवस्थित चालू होतं,पण परवाच्या रविवारी तिचे बाबा घरी आले आणि त्यांनी चुकून ऊर्मिलाचा व्हाट्स ॲप उघडला आणि पियुषचे आणि तिचे चॅटींग वाचून त्यांनी उर्मिलाला प्रश्न विचारला,

‘‘पियूष-तुझा कोण आहे?”

उर्मिलाला या प्रश्नाचं उत्तर देता येत नव्हतं. काय नातं होतं तिचं आणि पियूषचं? तो तिचा प्रियकर नव्हता, पण तिचा नुसताच मित्रही नव्हता. तिचे विवाहबाह्य संबंध होते? छे… त्यांच्यामध्ये लैंगिक आकर्षण नव्हतं, पण एकमेकांचा सहवास सुखावह होता. एकमेकांना सहज लव्ह यू, स्वीट हार्ट म्हणेपर्यंत मोकळेपणा जरूर होता.

बाबांनी तिला सांगितलं, ‘‘उर्मी, तुमच्या दोघांत तसलं काही नसलं आणि तुमचं नातं अगदी विशुद्ध असलं तरीही तुमचे दोघांचेही जोडीदार हे नातं मान्य करणार नाहीत. अशा नात्यांचा वैवाहिक सहजीवनावर कळत नकळत परिणाम होतोच. स्वतःच्या जोडीदारापेक्षा या नात्यामध्ये तुम्ही एकमेकांशी अधिक शेअरिंग करता, अधिक मोकळेपणाने वागता हे समजून घेण्याएवढी प्रगल्भता तुमच्या जोडीदारामध्ये आहे का? याचा आधी विचार करा आणि मग हे प्लेटॉनिक नातं टिकवायचं की इथंच थांबवायचं हा विचार करा.”

हेही वाचा… गौराई नाही गं अंगणी…?

बाबांचे शब्द तिच्या कानात घुमत होते. दोन विरुद्धलिंगी व्यक्ती एकत्र आल्या की नातं असलंच पाहिजे असं आहे का? सगळ्याच नात्यांना नाव देण्याची खरंच गरज आहे का? केवळ सहवासाचा आनंद दोघांना घेता येऊ नये? पण खरंच समाजात ही प्रगल्भता आली तर प्लेटॉनिक लव्हमधून आयुष्यातील भावनिक कोंडमारा संपवून जगण्यातील विशुद्ध आनंद घेता येईल असं तिला वाटलं. आता तिला निर्णय घ्यायचा होता…

(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत)

smitajoshi606@gmail.com