राधिका आपटे
माझं कुटुंब, विशेषतः आई बाबा, डॉ. चारुदत्त आपटे आणि डॉ. जयश्री देसाई दोघंही डॉक्टर आहेत. बाबा न्यूरोसर्जन तर आई अॅनेस्थेसिस्ट. माझा भाऊ केतनदेखील डॉक्टर आहे. पुण्यात आमचे ‘सह्याद्री’ हॉस्पिटल आहे. माझी आजी मधुमालती आपटे (वडिलांची आई ) तिचं शिक्षण फ्रान्समध्ये झालं होतं. ती स्वतः गणितज्ज्ञ आणि फ्रान्स युनिव्हर्सिटीमधून पीएच.डी. पूर्ण केलेली विदूषी होती.
लहानपणापासून माझा अभ्यास तिनेच घेतला. गणित विषय सोपा करून शिकवण्याची तिची हातोटी विलक्षण होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आणखी वाचा : प्रिन्सेस डायनाच्या दुर्मिळ शिल्पकृतीचा होणार लिलाव, किंमत तब्बल…

राधिकाची आजी मधुमालती आपटे

माझ्याच वर्गात- शाळेत असलेल्या कित्येकांना गणित म्हणजे नावडता विषय होता जे अगदी स्वाभाविक असतं! माझ्या प्रिय आजीमुळे गणितात मला पैकीच्या पैकी मार्क्स मिळू लागले. आमच्या दोघींचा अभ्यास बहुतेकदा रात्री १० नंतर चालायचा. दिवसभर माझी शाळा, अभ्यास, गृहपाठ, क्रीडास्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रमात सहभाग, रोहिणी भाटे यांच्याकडे कथ्थक शिकणं, असं शेड्युल असायचं. गम्मत म्हणजे माझ्या आजीला रात्री झोप लागत नसे. पहाटे केव्हा तरी तिचा डोळा लागत असे. रात्री ९ नंतर ती घरातल्या कुत्र्याला घेऊन पुण्यातील सामसूम झालेल्या रस्त्यावर फिरायला जात असे. तिला कसलीही भीती ठाऊक नव्हती किंवा मला रात्री झोप येत नाही म्हणून ती कधी चिंतेत आहे, असं देखील कधी मी पाहिलं नाही. स्वतःच्या मर्जीने, पण इतरांच्या भावना न दुखावता ती मजेत जगली.

आणखी वाचा : समुपदेशन : का करावं लग्न?

तिचं आणि माझं आजी आणि नात या नात्यापलीकडे जाऊन शुद्ध मैत्रीचं नातं होतं. माझी सगळी गुपितं मी आजीकडे शेयर करत असे. आजीमुळेच मी गणित आणि अर्थशास्त्र विषय घेऊन फर्ग्युसन कॉलेजमधून पदवीधर झाले. आजीमुळेच मला मानसिक धैर्य आलं आणि मी आई-बाबांसमोर धिटाईने मला अभिनयात करियर करायचं आहे हे मांडू शकले, कारण अभिनय करण्यासाठी मेंदूचा फार वापर करावा लागत नाही असं त्यांचं तेव्हा ठाम मत होतं. माझ्या आजीमुळे मला साधी राहणी आणि उच्च विचारसरणी म्हणजे नेमकं काय हे समजलं.

आणखी वाचा : एकदा बर्थ कंट्रोल गोळी घेतल्यावर भविष्यातही बाळ होऊ शकत नाही का? वंध्यत्वाविषयी काय सांगतात तज्ज्ञ, पाहा

माझ्या पुण्यातील मैत्रिणींसोबत मी त्यांच्या शॉपिंगसाठी कधी लक्ष्मी रोड, कधी कॅम्प तर कधी तुळशी बागेत जात असे. त्यांना वस्तू आवडली नाही किंवा भावात घासाघीस झाली नाही की त्या खरेदी करत नसत. मी मात्र वस्तू आकर्षक दिसली, आवडली की मागचा पुढचा विचार न करता वस्तू घेऊन घरी पोचत असे. मग रात्री आई-बाबा-केतन दादा झोपले, की आमच्या गुजगोष्टी सुरू होत. मी मोठ्या फुशारक्या मारत माझं ‘एक्स्क्लुजिव्ह शॉपिंग’ तिला दाखवत असे. त्यावेळ ती मला साधेच प्रश्न विचारी, माझी पर्सची खरेदी दाखवल्यावर ‘तुझ्याकडे पर्स नाही का?’, ‘तुझ्याकडे या पॅटर्नचे ड्रेस आहेत ना कपाटात, मग पुन्हा नवीन ड्रेस कशासाठी?’ बाळा, तुझ्या मैत्रिणीने केली का खरेदी? तू तिला कंपनी देण्यासाठी गेलीस आणि स्वतः विनाकारण, व्यर्थ खरेदी केलीस. कदाचित हा ड्रेस तू वापरशील असंही नाहीये. तुझी मैत्रीण खरी शहाणी! सौदा पटला नाही तर तिने शॉपिंग केलं नाही. अगं, गरज नसताना विनाकारण खरेदी करणं सर्वार्थाने चुकीचेच आहे. असा पैशांचा अपव्यय करणं टाळ, तर तू जीवनात पैसे वाचवू शकशील. हेच पैसे तुला भविष्यात उपयोगी पडतील. विनाकारण केलेली खरेदी म्हणजे उधळपट्टी! सध्या तू कमावत नाहीस. पॉकेटमनीमधून अनावश्यक खरेदी टाळ.” माझ्या आजीचे हे प्रॅक्टिकल विचार मला आयुष्यभर पुरणारी शिदोरी ठरलीये.

आणखी वाचा : मेन्टॉरशिप : अनुभवांचं संचित हेच मेन्टॉर!

आयुष्याच्या पुढच्या वळणावर मी अभिनयात आले. हिंदी, मराठी, देशी विदेशी प्रोजेक्ट्स खूप केलेत. पैसे जरी चांगले मिळाले तरी मी काटकसरी झाले. स्टेटसच्या हव्यासाने ब्रॅण्डेड वस्तू, अॅक्सेसरीजपासून स्वतःला दूर ठेवलं. हा सगळा फोलपणा आहे याची खात्री पटली होती तोपर्यंत. गरज नसेल तर अनावश्यक खर्चापासून मी स्वतःला दूर ठेवलं. अशा अनेक गोष्टींतून आजीनं मला घडवलं. माझ्या जीवनातील आजी माझी मेन्टॉर की मैत्रीण हे मला माहीत नाही, पण तिच्या पश्चात तिला मी अतिशय मिस करते, खूप आठवत राहाते ती. माझा नवरा (ब्रिटिश संगीतकार बेण्डिक्ट टेलर ) याच्याशी माझं पुण्यात लग्न झालं तेव्हा माझ्या लग्नात मी आजीची पैठणी नेसले होते. तिचा मायेचा हात माझ्या डोक्यावरून फिरतोय, असा मला भास होत होता.

आणखी वाचा : तो’ Metrosexual आहे म्हणजे… अशी मुलं ज्यांना स्त्रियांचे…

माझे आईवडील बहुतेकदा पुण्यात असतात. त्यांच्या व्यवसायात ते आजही बिझी आहेत, भाऊ केतन देखील तितकाच बिझी! मी माझ्या अभिनयाच्या कमिटमेंट्ससाठी मुंबईत असते तर माझा नवरा बेण्डिक्ट लंडनला त्याच्या म्युझिकच्या कामात व्यग्र असतो. कुणीही एकमेकांच्या सहवासात नसतात. माझे भारतातील शूटिंग संपले की मी लंडनला जाते. आम्ही सगळे वेगवेगळ्या ठिकाणी असलो तरी मनाने एकमेकांच्या जवळ आहोत. विश्वास बसणार नाही तुमचा, पण मी मुंबईत किमान गेली १२ वर्षे तरी राहतेय. या काळात माझे बाबा मला कधीही मुंबईत येऊन भेटू शकले नाहीत. माझा भाऊ एकदा एका संध्याकाळी माझ्या मुंबईच्या घरी आला, तर एकदा आईचे मुंबईत काम होते म्हणून आईने तिचे काम झाल्यावर माझी भेट घेतली. दोन दिवस आई माझ्यासोबत राहिली. पण तरीही आम्ही खूप जवळ आहोत.

आणखी वाचा : “आम्ही पुरुषांमध्ये बोलत नाही”, हे जेव्हा एक महिलाच दुसरीला सांगते तेव्हा…

या माझ्या अत्यंत जवळच्या माणसांनी माझा अभिनयात असलेला कल पाहून मला अभिनयात जाण्याची परवानगी दिली नसती तर आज मी अभिनयात नसते. आपापल्या आवडीनिवडी -करियर यांना जपत, आम्ही एकमेकांना स्पेस देतो, पण फोन-व्हिडीयो कॉलच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात असतो. मनाने एकमेकांमध्ये प्रेमाने गुंतले आहोत. आईशी दररोज फोनवर बोलल्याशिवाय माझा दिवस पूर्ण होत नाही. एकमेकांना स्पेस देत आनंदी जीवन कसं जगायचं हे सांगणारे नाही तर तो वस्तुपाठ घालून देणारं माझं कुटुंब! अभिनयासारख्या ग्लॅमरस व्यवसायात आल्यानंतरचे फायदे आनंद देत असले तरी तोटे काट्यासारखे बोचतात तरी त्यांनी माझ्यावर सदैव विश्वास ठेवला. त्यांचा हाच विश्वास माझ्यासाठी प्रेरक आहे.

आणखी वाचा : पत्रास कारण की… टिकली! भिडे आजोबांना नातीने लिहिलेलं खुलं पत्र

मुंबईत माझ्या समवेत काम करणारे कलाकार, दिग्दर्शक माझे जवळचे मित्र झाले आहेत. आयुष्यात जेव्हा अडचणी, आव्हानं येतात मी या फ्रेंड सर्कलमधील दोस्तांना फोन करते, कधी भेटते, चर्चा करते, त्यांचे मार्गदर्शन घेते आणि माझा पुढचा मार्ग आखते. अभिनेत्री कल्की कोचलिन माझी अतिशय जवळची मैत्रीण आहे. दिग्दर्शक श्रीराम राघवन, अनुराग कश्यप, विक्रमादित्य मोटवानी, हर्षवर्धन कुलकर्णी, लीना यादव, विनय पाठक, तिलोत्तमा शोम ही सगळीच माझी माणसं आहेत. मैत्री असेल तिथे फक्त मैत्री, कुणी दिग्दर्शक नाही, कुणी लेखक नाही, कुणी स्टार नाही, सगळे सारखे. मैत्रीच्या समान धाग्यावर आम्ही जोडले गेलो आहोत. जीवनात आलेल्या अडचणींवर मात करण्याचं बळ मित्रमैत्रिणी देतात. कौतुक करतात आणि टीका देखील करतात. तेच तर अपेक्षित असतं त्यांच्याकडून.
आपले नातेवाईक काय किंवा आपली मित्रमंडळी काय, हीच तर आपली खरी कमाई असते.

samant.pooja@gmail.com