सध्या शिक्षणाचा खर्च शाळेपासून ते महाविद्यालयापर्यंत सातत्याने वाढतोच आहे. अशा अवस्थेत गरीब घरातील व वंचित घटकातील मुलींच्या शिक्षणावर त्याचा मोठाच परिणाम होतो. अनेकदा शिक्षण मध्येच सोडण्याची वेळ त्यांच्यावर येते. शैक्षणिक शुल्क मुलींसाठी नसले तरी इतर खर्च असतातच. शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, पुस्तक खरेदी अशा सगळ्याच गोष्टींसाठी पैसे लागतात आणि त्यासाठी आर्थिक सहाय्य गरजेचे असते. टाटा शैक्षणिक ट्रस्टतर्फे मिन्स शिष्यवृत्तीअंतर्गत अशाप्रकारे मदत केली जाते.
आणखी वाचा : मुलींच्या उच्चस्तरीय शिक्षणासाठी शिष्यवृत्ती
सध्या वेगवेगळया शैक्षणिक संधी मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असल्या तरी समाजातील दुर्बळ आणि गरजू घटकातील मुला-मुलींना त्यापासून वंचित राहावे लागण्याची बरीच उदाहरणं सापडतात. याचं महत्वाचं कारण म्हणजे शिक्षणाचा वाढलेला खर्च. यामध्ये शिक्षण शुल्क, परीक्षा शुल्क, पुस्तकांची खरेदी आदी बाबींचा समावेश होतो.
आणखी वाचा : करिअर : अपंग विद्यार्थिनींसाठी शिक्षणसंधी
हा खर्च दरवर्षी टाटा शैक्षणिक ट्रस्टमार्फत स्वरुपात उचलला जातो. वंचित घटकातील मुला-मुलींसाठी या ट्रस्टमार्फत विविध उपक्रम राबवले जातात. यापैकी एक उपक्रम म्हणजे, गरजेनुसार (मिन्स) शिष्यवृत्ती. या अंतर्गत आठवी ते पदवी अभ्यासक्रमांसाठी प्रवेश घेतलेल्या मुलींना शैक्षणिक शुल्कामध्ये आंशिक सहाय्य केलं जातं. या योजनेत अभियांत्रिकी अभ्यासक्रमाचा समावेश नाही. या योजनेंतर्गत अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जानेवारी २०२३ ही आहे.
आणखी वाचा : करिअर : मुलींनो मिळवा सामाजिक विषयांच्या शिष्यवृत्ती
अर्हता आणि अटी
(१) विद्यार्थिनीने २०२२-२३ या शैक्षणिक वर्षात मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेत प्रवेश घेतलेला असावा.
(२) मुंबई आणि मुंबई उपनगरातील महाविद्यालये आणि शाळांमध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थिनींसाठीच ही योजना लागू आहे.
(३) संबंधित उमदेवाराने मागील वर्षीच्या परीक्षेत किमान उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. एटीकेटी मिळालेल्या विद्यार्थिनींचा अर्थसहाय्यासाठी विचार केला जात नाही.
(४) एका कुटुंबातील केवळ दोनच उमेदवारांना या शिष्यवृत्तीचा लाभ दिला जातो.
(५) वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळालेल्या उमेदवारांचा या शिष्यवृत्तीसाठी विचार केला जातो.
(६) या अर्टी आणि शर्तीचे पालन करणा-या विद्यार्थीनीने igpedu@tatatrusts.org या ईमेलवर अर्ज करावा.
आणखी वाचा : विवाह समुपदेशन -नात्याचंही सर्व्हिसिंग करायला हवं!
सोबत पुढील प्रमाणपत्रे सादर करावी लागतात –
(१) कुटुंबाची आणि शैक्षणिक पार्श्वभूमीची संपूर्ण माहिती देणारा अर्ज.
(२) २०२१-२२ या वर्षाची गुणपत्रिका,
(३) कुटुंबाच्या उत्पनाचा दाखला,
(४) २०२१-२२ या वर्षासाठी शैक्षणिक शुल्काची पावती.
या प्रमाणपत्रांची स्कॅन केलेली पीडीएफ प्रत पाठवणे आवश्यक आहे.
संपर्क – बॉम्बे हाऊस, २४, होमी मोदी रोड, मुंबई-४००००१,
दूरध्वनी-०२२-६६६५८२८२,
ईमेल-talktous@tatatrusts.org,
संकेतस्थळ-https://www.tatatrusts.org/