अपेक्षा आणि निशांतची लहानपणापासूनची मैत्री. उच्च शिक्षणासाठी निशांत परदेशी गेल्यानंतर आज बऱ्याच वर्षांनी त्यांची भेट आणि गप्पा होत होत्या. निशांत म्हणाला, “माझं काय, परदेशी भारतीयांसारखं नॉर्मल रुटीन चाललंय. चांगला पगार, स्वत:चं घर, सुखी संसार, बस. तू मात्र इथे गाजते आहेस. तुझ्या मुलाखती वाचतो, बघतो तेव्हा अभिमान वाटतो. शाळा-कॉलेजातही अशीच तडफेनं सगळीकडे चमकायचीस.”
अपेक्षा तोंडदेखलं हसली आणि म्हणाली, “मोठ्या इंटरनॅशनल कॉर्पोरेट कंपनीतली नोकरी आहे रे, माझ्या पोस्टवर कुणीही असतं तरी एवढं ग्लॅमर मिळालंच असतं. माझं काम मी कमिटमेंटनं करते त्याचं कसलं कौतुक?”
“हा तुझा विनय म्हणायचा का? पूर्वी अशी नव्हतीस. लगेच चेहरा खुशीनं फुलला असता.”

आणखी वाचा : काकू, आम्ही ऑफिसमध्ये काम करायला जातो, लग्नासाठी मुलं पाहायला नाही!

Chief Minister of Telangana, Himachal and Deputy Chief Minister of Karnataka reply to BJP on the scheme Print politics
गरिबांचे पैसे गरिबांना ही काँग्रेसची हमी; तेलंगणा, हिमाचलचे मुख्यमंत्री तर कर्नाटकच्या उपमुख्यमंत्र्यांचे भाजपला प्रत्युत्तर
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
Spain devastating floods Flow of Turia River Heavy rain in Spain
आपण कधी जागे होणार? स्पेनचा विध्वंसक पूर
pm modi said ek hai toh safe
योगींच्या ‘बटेंगे तो कटेंगे’नंतर पंतप्रधान मोदींकडून ‘एक हैं तो सेफ है’चा नारा
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Loksatta chaturanga Parent Nature Confused Psychologist
सांधा बदलताना : संसार शांतीचा झरा…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास

अपेक्षा थोडा वेळ गप्प झाली. मग म्हणाली, “तुला माहितीय निशांत, लहानपणापासून माझं स्वप्न आयएएस होण्याचं होतं. दोनदा इंटरव्ह्यूपर्यन्त जाऊनही क्रॅक करू शकले नाही. पुढे आईचं आजारपण. ती गेल्यावर तर मी खचूनच गेले. कशासाठी उभारीच उरली नव्हती. त्यातून बाहेर आल्यावर मास्टर्स आणि दोन जॉब केले. या कंपनीत येईपर्यंत बरीच सावरले होते. सिन्सिअॅरिटी, कमिटमेंट आणि थोडीफार हुशारी यामुळे यश मिळत गेलं. पण तरीही कायम वाटत राहातं, की ही माझी जागाच नाही. आज कलेक्टर असते तर कुठे असते, समाजाच्या किती उपयोगी पडले असते. अमुक परिस्थिती मी कशी हाताळली असती याचाच विचार होतो. अरे, ‘यूपीएससी’ची परीक्षा देतेय अशी स्वप्नं अजूनसुद्धा पडतात मला.”
“अगं, परिस्थिती कोणाच्या हातात असते अपेक्षा? एवढ्या खचण्यातून सावरलीस आणि कुठपर्यंत पोहोचली आहेस? अवघड परिस्थिती कल्पकतेनं हाताळताना तीच बुद्धी आणि कमिटमेंट तू कंपनीसाठी वापरत नाहीयेस का? त्यावरही किती लोकांचं आयुष्य अवलंबून आहे.”
“खरं सांगू का, कौतुक झालं, मुलाखती झाल्या, तरी वाटतं, लोक मनात म्हणत असतील, ‘इथे चमकोगिरी करतेय, पण ‘तेव्हा’ हिला यूपीएससी क्रॅक करता आली नाही’.”

आणखी वाचा : धम्माल ‘हाऊस ख्रिसमस पार्टी’ करायची आहे? या टिप्स नक्की लक्षात ठेवा

“काहीही काय? तुला कलेक्टर व्हायची इच्छा होती हे किती जणांना माहीत असेल? मी सुद्धा पार विसरून गेलो होतो.”
“तरी पण हरल्यासारखं वाटतं रे. क्षमता असूनही मिळालं नाही म्हणून नशीबाचा राग येतो.”
“समजा कलेक्टर झालीही असतीस, तरी सरकारी वातावरणात रमली असतीसच कशावरून? उलट इथे केवढी टॉपवर चमकते आहेस. लोक तुला बुद्धिमान, नशीबवान समजतात आणि तू मात्र स्वत:बद्दल अभिमान वाटण्याऐवजी तोंड पाडून स्वत:ला कोसत राहतेस. आपल्या ग्रुपपैकी कुणाशी बोललीयेस का हे?
“कॉन्टॅक्ट नाहीये फारसा कुणाशी. भेटलं तरी जनरल गप्पा जमतच नाहीत. आई गेल्यापासून बदललंच सगळं.”
“हा बदल फक्त आई गेल्यामुळे नाही अपेक्षा. जगानं नावाजलं, तरी तुझ्या मनात सतत स्वत:बद्दल नाराजीचा बेसूर वाजत असतो. तुझंच मन खाष्ट सासूसारखं तुला टोकत, आएएसचं उगाळत राहतंय. आजचं तू कमावलेलं स्थान मानतच नाही. त्यामुळे कामासंबंधीचं कम्युनिकेशन उत्तम करतेस, पण भूतकाळाबद्दल कुणी विचारू नये म्हणून लोकांत मिसळणं-बोलणं टाळतेस. कधीकाळच्या एका अधुऱ्या इच्छेत अडकून स्वत:वर रूसायचंच ठरवलंयस तू. एवढी वर्षं त्यात गेली. आता तरी ‘मै मेरी फेवरिट हूं’ म्हणत खुशीत राहायचं ठरवायला काय हरकत आहे?”
अपेक्षा गप्प झालेली पाहून निशांत गंभीर चेहऱ्याने म्हणाला,
“हां, अजूनही तुला कलेक्टर व्हायचंच असेल तर एक मार्ग आहे…”

आणखी वाचा : नातेसंबंध: ‘वीकेण्ड कपल’ असंही सहजीवन?

“कोणता?”
“पुन्हा यूपीएससीचं स्वप्न पडलं, तर त्याच स्वप्नात कलेक्टर पण होऊन टाकायचं.”
“निशांत, पीजे नको हं प्लीज..”
“अगं, खरंच, तुझ्यासारख्या हुशार मुलीला माहीतच असणार, की अजून टाइम मशीनचा शोध लागलेला नाही. म्हणजे ‘आज, इथे आहे ते आयुष्य सोडून आपण ‘तेव्हा, तिथे’ मध्ये जाऊ शकतच नाही. मग रात्री स्वप्नात कलेक्टर आणि दिवसा प्रत्यक्षातली कंपनी आणि ग्लॅमर. काय हरकत आहे? चॉइस तर तुझाच, नाही का?” निशांतनं मिष्किलपणे पुढे केलेल्या हातावर टाळी देत अपेक्षा खळखळून हसली.
(लेखिका रिलेशनशिप कौन्सिलर आहेत.)
neelima.kirane1@gmail.com