New Rules of Surrogacy : सरोगसीद्वारे आई-वडील होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या जोडप्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. बुधवारी केंद्र सरकारने काढलेल्या अधिसूचनेनुसार, सरोगसीद्वारे बाळासाठी प्रयत्न करणाऱ्यांना डोनर गेमेट वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, या तरतुदीचा लाभ दोघांपैकी एकाला काही वैद्यकीय अडचण असेल तरच घेता येणार आहे.

अधिसूचनेमध्ये असे म्हटलंय की, “पती किंवा पत्नी दोघांपैकी एकाला डोनर गेमेट वापरणे आवश्यक आहे, असं प्रमाणपत्र वैद्यकीय मंडळाने दिलं तरच डोनर गेमेट वापरून सरोगसीला परवानगी देण्यात येणार आहे.”

Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
ageing population increasing in india
वृध्दांच्या लोकसंख्येचा दर वाढता, काय आहेत आव्हानं?
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
Increase in cotton soybean prices print politics news
कापूस, सोयाबीनच्या दराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; निवडणूक काळात शेतकऱ्यांमध्ये रोष
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास
स्त्री आरोग्य : मासिकपाळीचा त्रास
only rs 100 crore balance left in vault of thane municipal corporation
ठाणे पालिकेच्या तिजोरीत खडखडाट; दिवाळीनंतर पालिकेचे निघाले दिवाळ

नेमकं प्रकरण काय?

एका महिलेला मेयर-रोकितान्स्की-कुस्टर-हॉसर (MRKH) सिंड्रोम हा एक दुर्मिळ आजार झाला होता. या आजारामुळे संबंधित महिलेच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम झाला होता. परिणामी संबंधित महिलेला वंध्यत्व आले होते. त्यामुळे या महिलेने गेल्यावर्षी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. सरोगसी नियमांतर्गत महिलेला स्वतःचं अंड वापरून दात्याचे शुक्राणू वापरता येत होते. परंतु, या प्रकरणात महिलेच्या प्रजनन क्षमतेवर परिणाम झाल्याने तिच्या अंड्यांची गुणवत्ता कमी झाली होती. त्यामुळे डोनर गेमेट (दात्याचे अंड) वापरण्याची परवानगी देण्याची मागणी तिने याचिकेतून केली. परंतु, नियमानुसार, अशी परवानगी देणे बेकायदा असल्याचे प्रथमदर्शनी निदर्शनास आले होते. परंतु, महिलेला दात्याची अंडी वापरल्याशिवाय गर्भधारणा होणे शक्य नव्हते. त्यामुळे या कायद्यात सुधारणा होणे आवश्यक असल्याचे नोंदवत सर्वोच्च न्यायालयाने संबंधित महिलेला डोनर गेमेट वापरण्याची परवानगी दिली होती. तसंच, नियमातील सुधारणेसाठी मुद्दा विचारार्थ ठेवला होता. अखेर केंद्र सरकारने या नियमात सुधारणा केली आहे. सरोगसी प्रकरणात फक्त दात्याकडून शुक्राणू घेण्याची तरतूद होती. परंतु, वरील प्रकरणानंतर दात्याकडून अंडी आणि शुक्राणू (डोनर गेमेट) घेण्याची तरतूद करण्यात आली.

आरोग्य तज्ज्ञांनी या निर्णयाचे स्वागत केले. कारण सरोगसी करणाऱ्या अनेक स्त्रिया वृद्ध असू शकतात. वयानुसार अंड्याची संख्या आणि गुणवत्ता कमी होते. “सरोगसी फार कमीजण करतात. परंतु, ज्यांना गर्भाशय नाही, गर्भाशय खराब झाले आहे किंवा गर्भाशयाचे अस्तर पातळ आहे अशा महिला सरोगसीसाठी प्रयत्न करतात. अशावेळ काही महिला वृद्धही असू शकतात. सरोगसीचा विचार करण्यापूर्वी या महिलांनी गर्भवती होण्याचे इतर पद्धतींचाही विचार केलेला असू शकतो.त्यामुळे काही प्रकरणात डोनर गेमेटची आवश्यकता भासू शकते. हा एक अतिशय सकारात्मक निर्णय आहे”, असं मुंबईच्या आयव्हीएफ तज्ज्ञ डॉ अंजली मालपाणी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, “आजकाल शुक्राणू दानाची फारशी गरज भासत नाही, अशा तंत्रांसह जिथे शुक्राणू थेट अंडकोषातून काढून थेट अंड्यामध्ये टोचले जाऊ शकतात.”

एकल महिलांना नियम लागू नाही

सरोगसीतील ही सुधारणा एकल (अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा) महिलांना लागू नाही. सरोगसीचा विचार करत असलेल्या एकल महिलेला स्वतःची अंडी वापरावी लागणार आहेत. ते दात्याचे शुक्राणू घेऊ शकतात.

एकल महिलांसाठीही व्हावी सुधारणा

सरोगसी करू इच्छिणाऱ्या ४४ वर्षीय एकल महिलेने सरोगसी रेग्युलेशन कायद्याच्या तरतुदींनाच आव्हान दिले होते. एकल महिलांनाही दात्याची अंडी वापरण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी करण्यात आली होती. या प्रकरणात वकिलाने असा युक्तीवाद केला की, संबंधित महिलेला लग्न करता आले नाही. परंतु, आता तिला सरोगसीद्वारे मूल जन्माला घालायचे आहे. परंतु, तिच्या काही वैद्यकीय परिस्थितीमुळे ती गरोदर राहू शकत नाही. त्यामुळे तिला दात्याची अंडी वापरण्याची परवानगी द्यावी.