बुंद्यापाशी कृष्णकमळीच्या वेलीचा एक तुकडा आणून लावला. बघता बघता वेल आंब्याला धरून वर चढत गेली. तिला चेंडूसारखी पिवळी धमक आणि लाली लाली लावल्या सारखी लालसर दिसणारी फळं लागली. या फळांचं मग रोज सरबत होऊ लागलं. शिजवलेला कैरीचा गर वापरून किंवा मग पडवीतल्या चुलीत कच्च्या कैर्या भाजून त्याचं वेगळ्या चवीचं पन्हं किंवा मग कोकमसालांच एवढीच सरबतं पिण्याची सवय असलेले आम्ही हे वेगळं सरबत पिताना पहिल्यांदा भरपूर नाकं मुरडली होती. पण मग ती एक वेगळीशी चव आवडून गेली.

बाग तयार करताना झाडं, झुडपं, भाज्या, सावलीत वाढणारी फर्न्स, फुलांनी सजलेली ऑर्किड्स असं सगळं सगळं आपण आवडीने लावतो, खूप काळजीसुद्धा घेतो, पण बरेच वेळा एका फारच उपयुक्त गोष्टींकडे आपलं दुर्लक्ष होतं ती गोष्ट म्हणजे वेल. वेली बागेला सुंदर बनवतात. बागेला एक भरगच्चपणा देतात.

आपल्या लहानपणात जरा डोकावून बघाल तिथे कुठेतरी एखादी वेल एखाद्या आठवणींच्या आधारे अजूनही बहरताना दिसेल. नकळतच ती तुम्हाला टाईम ट्रॅव्हल केल्यासारखी त्या दिवसांत घेऊन जाईल आणि मग विचारांची साखळी जोडत जोडत आपली ही स्मरणरंजनाची वेल गगनावेरी जाईल.

कृष्णकमळीची वेल पाहिली की मला असंच भूतकाळात हरवून जायला होतं. चिपळूणला आमच्या घरापुढच्या अंगणात एक हापूसच झाडं होतं. आंब्याच्या दिवसात त्याला फार उशिराने आंबे लागत. त्याचं ते भलंमोठं खोड, त्याच्या फांद्या, पानांचा पसारा याने त्याला एक वेगळंच व्यक्तिमत्त्व मिळालं होतं.

का कोण जाणे तो फार धीरगंभीर वाटायचा. एरवीच्या अंब्यांपेक्षा खूप वेगळा. एकदा मामाने त्यांच्या बुंद्यापाशी कृष्णकमळीच्या वेलीचा एक तुकडा आणून लावला. बघता बघता वेल आंब्याला धरून वर चढत गेली. तिला चेंडूसारखी पिवळी धमक आणि लाली लाली लावल्या सारखी लालसर दिसणारी फळं लागली. या फळांचं मग रोज सरबत होऊ लागलं. शिजवलेला कैरीचा गर वापरून किंवा मग पडवीतल्या चुलीत कच्च्या कैर्या भाजून त्याचं वेगळ्या चवीचं पन्हं किंवा मग कोकमसालांच एवढीच सरबतं पिण्याची सवय असलेले आम्ही हे वेगळं सरबत पिताना पहिल्यांदा भरपूर नाकं मुरडली होती. पण मग ती एक वेगळीशी चव आवडून गेली.

उन्हाळ्यात एक नवाच उद्योग मिळाला. वेलीवरची फळं आणायची त्याची ती पातळ सालं सोलून आतल्या बिया पिळून गर जमा करायचा, थोडी साखर, पाणी घालायचं की झकास सरबत तयार. कोकमसरबता सारखं जिरं नको घालायला की पन्ह्यामधे घालतात तशी वेलची. ना गूळ ना मधं ना लिंबू सरबतासारखी महामूर साखर हवी. मामला अगदी झट की पट होत असे.

मला ती वेल या एका कारणाने फारच आवडून गेली होती.

पुढे गच्चीवर बाग तयार करताना मी आवर्जून तो वेल लावण्याचा प्रयत्न केला, पण ते काही जमलं नाही. एकदा दापोलीतून एक रोप आणलं होतं, त्याला फळं काही धरली नाहीत. निळ्या, किरमिजी आणि पांढऱ्या कृष्णकमळीच्या फुलांवरच समाधान मानावं लागलं. फळं जरी मिळाली नाहीत तरी फुलांनी बहरलेली बाग आनंद देऊन गेली.

अशीच भूतकाळात रमवणारी दुसरी वेल म्हणजे मधुमालतीची. गोरेगावला माझे मोठे काका रहात. त्यांच्याकडे सुटीत राहायला गेलं की दोन गोष्टी फार म्हणजे फार आवडायच्या. एक म्हणजे त्यांच्या जयेश सोसायटीतला तो मोठासा टी.व्ही-जिथे सगळे सोसायटीतले लोक एकत्र येऊन कार्यक्रम बघत. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सातव्या मजल्यापर्यंत चढत गेलेली मधुमालती. उंच चढत गेलेली, फुलांनी बहरलेली मधुमालती पाहणं हे खरचं एक सुख होतं. सोसायटीच्या गेटमधून शिरल्या शिरल्या मधुमालतीचा मंद दरवळ जाणवायचा. अजूनही तो गंध मला त्या दिवसांत घेऊन जातो.

मधुमालती म्हणजे रंगून क्रीपर. रंगूनशी तिचा काय संबंध असावा ते ठाऊक नाही, पण मला तरी ती शांत , स्निग्ध वाटते आणि म्हणूनच खूप आवडते. नियमित पाणी द्या, अगदी जोमाने वाढेल. कुठालाही इवलासा आधार जरी मिळाला तरी फोफावेलं. पाणी द्यायला विसरलात तर पार सुकून जाईल. मग हळहळ वाढेल आणि परत पाणी द्याल तर परत दोन-चार दिवसांत हिरवी पानं दिसायला लागतील. प्रतिकूल परिस्थितीतही आपलं अस्तित्व टिकून ठेवणारी मधुमालती अशी नकळतच बरंच काही सांगून जाते.

या उलट संक्रांत वेल. हीची प्रवृत्ती अगदीच वेगळी. मधुमालती अबोल, स्निग्ध तर ही आक्रमक. मधुमालतीची फुलं नाजूक साजूक तर संक्रांत वेल झुपक्यांनी उमलणारी, भरगच्च, गडद केशरी रंगाची. वर्षातून दोनवेळा बहरणारी… एरवी हिरव्या पानांचा भरपूर पसारा मिरवणारी. आक्रमक असला तरी मधुमालती सोबतच संक्रांतवेल हीसुद्धा बागेत हवीच.

कृष्णकमळीची वेल फुलपाखरांचा लाडका तर मधुमालती मधमाशांंची, संक्रांतवेलीवरील किटक तर त्याहून वेगळे. वेली बागेत वाढायला लागल्या की हे छोटे छोटे फरक सहज लक्षात येऊ लागतात, या वेली आणि त्यांचे प्रत्येक प्रकार आपल्या समोर एक नवीन जग खुलं करतात.

mythreye.kjkelkar@gmail.com

Story img Loader