डाॅ. संजय जानवळे

एकीकडे आपल्या देशात लहान मुलांतील कुपोषण ही एक मोठी समस्या असताना दुसरीकडे लहान मुलांतील लठ्ठपणा हा प्रश्नही आता ऐरणीवर आहे. गरज नसताना अनेकदा खाणं, घरचं जेवण म्हटलं की नाक मुरडणं, सतत बाहेरचं खाणं, सारखा मोबाईल, तासंतास टीव्ही पाहणं, मैदानी खेळ आणि व्यायामाचा अभाव, यामुळे लहान मुलं लठ्ठ होत चालली आहेत. मुलांतील लठ्ठपणा (Childhood obesity) हा या शतकात मुलांच्या आरोग्याबाबतचा सर्वाधिक दुर्लक्ष केला गेलेला एक प्रश्न असल्याचं जागतिक आरोग्य संघटनेनं म्हटलं होतं. एका अंदाजानुसार लहान मुलांतील लठ्ठपणाचं प्रमाण १८ टक्के इतकं आहे. गेल्या दोन वर्षांत करोना महासाथीत लहान मुलांच्या लठ्ठपणाची समस्या अधिक गंभीर झाली. टाळेबंदी व निर्बंधांमुळे आधी मैदानावर खेळणाऱ्या, सायकल चालवणाऱ्या मुलांना घराबाहेर पडता येत नव्हतं. अशातच घरी राहून जास्त खाण्यामुळे अनेक मुलांचं वजन वाढलं.

Working Women
सासूने केलं म्हणून सुनांनीही करावं? नोकरदार सुनांची घुसमट समजेल का?
Sharad Pawar
Sharad Pawar : मविआचं सरकार आल्यास मंत्रिमंडळात कोण…
sant gadgebaba sevabhavi sanstha ambajogai
सर्वकार्येषु सर्वदा: गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मदतीची गरज
Itishri Expanding Horizons and Obstructing Frames
इतिश्री: विस्तारणारं क्षितिज आणि अडवणाऱ्या चौकटी
kalyan dombivli municipal corporation marathi news
कल्याण डोंबिवली पालिकेतील दोन अभियंत्यांना आयुक्तांची कारणे दाखवा नोटिस, मलवाहिन्या सफाई कामातील ठेकेदाराच्या कामात त्रुटींकडे दुर्लक्ष
loksatta analysis two kids die in gadchiroli due to superstition
विश्लेषण : गडचिरोलीतील दोन भावंडांच्या मृत्यूची चर्चा का? अंधश्रद्धेमुळे मृत्यू झाल्याचा संशय?
shani gochar 2024 saturn margi in kumbh these zodiac sign will be lucky
दिवाळीनंतर ‘या’ तीन राशीच्या लोकांना लक्ष्मी देणार धनाचा हंडा! शनी मार्गस्थ असल्याने नोकरी-व्यवसायात मिळणार यशच यश
रात्री गाडी चालवताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी? ‘या’ टिप्स करतील मदत

लठ्ठपणाच्या कारणांचा विचार केल्यास त्याचा संबंध मुख्यत: बाह्य वातावरणाशी निगडित असल्याचं दिसून येतं. त्यात आनुवंशिकतेचं प्रमाण अत्यल्प असतं. सधन कुटुंबातील मुलांमध्ये लठ्ठपणाचे प्रमाण अर्थातच अधिक आहे. मुलं आज मैदानावर नाही, तर मोबाईलवर फुटबॉल खेळताना दिसतात. त्यांना खाण्यापिण्याचा चुकीच्या सवयी लावण्याबाबत जबाबदार आपणच आहोत. अनेक शाळा, काॅलेजांतल्या कॅन्टीनमध्ये फक्त जंक फूड आणि कोल्ड्रिंक्स मिळतात. मुलं काहीच खात नाही खूपदा म्हणून आपण त्यांना झटपट तयार होणाऱ्या नूडल्स देतो. या सर्व गोष्टींमुळे मुलांचं वजन प्रमाणाबाहेर वाढतं आणि ती लठ्ठ होतात.

हेही वाचा… नातेसंबंध: परपुरुषासोबत sexting करताय? सावधान!

लठ्ठपणामुळे मुलांमध्ये कमी वयात हृदयविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, थायराॅइडचे विकार, हाडांचे आजार आणि सांधेदुखी यांसारखे अनेक आजार जडतात. मुलींमध्ये मासिक पाळीच्या समस्या, ‘पीसीओएस’सारखे त्रास होऊ शकतात. म्हणून लहान मुलांना वजन आटोक्यात राखण्यासाठी सकस, समतोल आणि नियंत्रित आहार, व्यायाम, मैदानी खेळ, पुरेशी झोप आवश्यक आहे.

सदोष आहारपध्दती, अभ्यास आणि करिअरच्या वाढत्या स्पर्धेमुळे मैदानी खेळ व व्यायामाकडे होणारं दुर्लक्ष आणि शारीरिक शिक्षणाचं कमी झालेलं महत्त्व, जंक फूड, फास्ट फूडचं अतिसेवन, पावभाजी, बर्गर ,चाॅकलेटस्, आईस्क्रीम ,कोल्डि्ंक्स, बेकरी पदार्थ, मिठाई, यांसारख्या ‘रेडी टू इट’ पदार्थांचं प्रमाणबाहेर सेवन, अतिरिक्त मेद आणि कर्बोदकं असलेले पदार्थ अथवा अति उष्मांक असलेले पदार्थ आणि कमी फायबर असलेल्या पदार्थांचं मर्यादेबाहेर सेवन, मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅझेट्सचा अतिवापर, ही मुलं लठ्ठ होण्याची काही कारणं आहेत.

आहारात काय हवं?

मुलांच्या आहारात पिवळ्या, केशरी रंगांची फळं, हिरव्या रंगांच्या पालेभाज्यांचा समावेश करावा. आजाराचा प्रतिबंधक करणारी तत्त्वं त्यात जास्त असल्यानं त्यांच्या सेवनानं आजारांपासून संरक्षण होण्यास मदत होते. मांस, मासे, अंडी यांचे पदार्थ बऱ्याचशा मुलांना आवडतात. त्यांचा आहारात समावेश केल्यानं पोषण तर होतंच, शिवाय प्रतिकारशक्ती चांगली वाढते. अर्थात हे पदार्थ अति तेलकट वा अति मसालेदार असणं टाळावं.

मुलांच्या वयानुसार अपेक्षित उष्मांकयुक्त आहार द्यावा. आहारात वेगवेगळ्या हिरव्या पालेभाज्या, फळांचा समावेश अधिक करावा. कडधान्यं व फायरबयुक्त पदार्थांचा समावेश असावा. ज्या अन्नपदार्थांत कॅल्शियमचं प्रमाण अधिक आहे, अशा अन्नपदार्थांचा आहारात समावेश असावा. उदा. चरबीरहित दूध किंवा कमी चरबीयुक्त दूध प्यावं. मासे, पालेभाज्या, यातून मिळणारं अनसॅच्युरेटेड फॅटचं सेवन हितावह ठरतं. शक्यतो बाहेरचं खाणं टाळावं. आहारात तेलाचा कमी वापर करावा.

साखरयुक्त अन्नघटकांचे सेवनही प्रमाणात करावं. आहारात मिठाचं प्रमाण अति नसावं.
मूल ब्रेकफास्ट (न्याहरी) करत नसेल तर अधिकच वाईट. लठ्ठपणा टाळण्यासाठी चांगला नाष्टा जरूर करावा.
आहारात मोठ्या प्रमाणावर प्रथिनांचा समावेश असावा.
पालेभाज्या, कोशिंबीरी यांचा समावेश असावा.
साय काढलेल्या दुधाचा वापर करावा.
व्यायाम

योग्य आहार नियोजनाबरोबरच लठ्ठपणा टाळण्यासाठी रोज किमान एक तास तरी व्यायाम आवश्यक आहे. मुलांनी फुटबाॅल, क्रिकेट, बॅडमिंटन, पोहणं, नृत्यकला, स्केटिंग, जिम्नॅस्टिक यांसारखे खेळ खेळणं हितावह ठरतं. मुलांसाठी योगासन करणंही उत्तम आहे. मुलं मैदानी खेळ खेळत असतील तर वेगळा व्यायाम करण्याची आवश्यकता भासत नाही. शाळेत जाताना शक्यतो सायकल वापरणं आवश्यक आहे. पालकांनी आठवड्यातून एकदा तरी मुलांना चालायला, फिरायला, ट्रेकिंगला न्यावं किंवा जवळपास मोकळ्या हवेत सहलीला न्यावे. योग्य आहारासह स्वत: नियमित व्यायाम करुन पालकांनींच मुलांसमोर आदर्श घालून द्यायला हवा.

झोप लठ्ठपणा टाळण्यासाठी पुरेशी झोपही गरजेची असते. प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना रोज रात्री किमान १० ते ११ तास झोप तसंच त्याहीपेक्षा लहान मुलांना किमान ११ ते १३ तास झोप महत्त्वाची आहे. अपुरी झोप असणाऱ्या मुलांत लठ्ठपणाचा धोका अधिक असतो, असं आता संशोधन अभ्यासातून स्पष्ट झालं आहे. गाढ झोप मेंदूचं कार्य नीट पार पडावं, यासाठी महत्त्वाची आहे. गाढ झोप येण्यासाठी झोपण्यापूर्वी एखादा तास काहीही खायचं नसतं, अगदी पाणीसुद्धा शक्यतो देऊ नका.

या वयातल्या मुलांत कुपोषण, रक्तक्षय, खरुज, पायोडर्मा (पुटकुळ्या), कान फुटणं, दातांचे आजार, दृष्टीक्षेप (रिफ्रॅक्टिव्ह एरर ) हे आजार दिसून येतात. हे आजार वेळीच ओळखा आणि यासाठी वैद्यकीय सल्ला घ्या. कारण दृष्टीदोष आणि कानांच्या आजारासारखे ज्ञानेंद्रियाचे आजार शिकण्यात आणि त्या-त्या वयातली विविध कामं करण्यात अडथळा आणतात.

लहान मुलांत ‘ड’ जीवनसत्वाची कमतरता मोठ्या प्रमाणावर आहे. सकाळी ११ ते १ या काळात १० ते १५ मिनिटे ऊन त्यांच्या अंगावर पडल्यानं ही कमतरता सहज भरुन काढता येते. सकाळी शाळेत जाण्याच्या गडबडीत मुलं नीट शौचास जात नाहीत. कधी कधी त्यांना बद्धकोष्ठ झालेलं असतं. त्यामुळे त्यांचं पोट सतत गच्च होतं, दुखत राहतं. कमी खाणं, खाण्यामध्ये तंतुमय पदार्थांचा अभाव असणं, शौचास वेळच्या वेळी न जाणं आणि व्यायामचा अभाव, ही त्याची काही महत्त्वाची कारणं आहेत. मुलांना चांगल्या सवयी लावून या समस्येचं निराकरण करता येतं.

मुलं निरोगी असावीत, त्यांची चांगली वाढ आणि विकास व्हावा, असं वाटत असेल तर पालकांना महत्त्वाची भूमिका बजावावी लागणार आहे. अपेक्षित घडत नसेल तर उगाच काहीतरी निष्कर्ष काढू नका. नियोजन आणि प्रयत्न करा, त्यात सातत्य ठेवा, गरज भासेल तिथे बालरोगतज्ञांचा सल्ला घ्या. चांगले परिणाम निश्चित दिसून येतील. लहान मुलांच्या ‘फिटनेस’बाबत जागरुकतेनं प्रयत्न करण्याचा दृढसंकल्प पालकांनी या वर्षी जरूर करावा आणि पाळावा.

lokwomen.online@gmail.com