लहान मुलांमुलींना वाढदिवस वा समारंभांच्या प्रसंगी देण्यासाठीच्या भेटवस्तूंचं आता एक मोठं मार्केट उभं राहिलं आहे. या बाजारात काय काय ‘आयटम्स’ येतील त्याचा नेम नसतो. सध्या समाजमाध्यमांवर बघायला मिळणाऱ्या लहान मुलींसाठीच्या दोन ‘भेटवस्तू’ म्हणजे ‘हेअर ब्रेडिंग टूल’ आणि ‘हेअर ज्वेलर’!

विचित्र नावांची ही उत्पादनं काय आहेत ते पाहूच, पण तत्पूर्वी समस्त लहान मुलींच्या पालकांनी हे लक्षात घ्या, की समाजमाध्यमांवर ‘इन्फ्लूएन्सर्स’नी ही उत्पादनं वापरून दाखवलेली बघून तुमच्या मुली तुमच्याकडे या वस्तूंसाठी लाडिक हट्ट धरूच शकतात! तेव्हा या वस्तूंचा उपयोग आणि किंमत याबद्दल त्यांचं प्रबोधन कसं करायचं याची तयारी मनात करायला लागा! किंवा बालिकांच्या अतिउत्साही ‘मावश्या, काकवा, माम्या’ आदि मंडळीही त्यांना ही उत्पादनं भेट देऊच शकतात. तेव्हाही या वस्तूंच्या मर्यादित वापराबद्दल लहानग्यांना कसं समजावायचं, याचा विचार तुम्हाला करावा लागेल!

Mother Always Protect Her Child
आई आहे ना…! वेगात येणारी राईड पाहून चिमुकलीने काढला पळ अन् पाहा VIDEO चा जबरदस्त शेवट
Ayurvedic Natural Remedies | Health Tips Ayurvedic Remedies
…तर औषधाची गरजच नाही! वाचा निरोगी आयुष्य जगण्यासाठी…
amazon prime comedy movie
‘चुपके चुपके’ ते ‘वेलकम’ प्राइम व्हिडीओवर उपलब्ध आहे ‘हे’ गाजलेले विनोदी सिनेमे, पाहा यादी
Viral Video Shows Father And Daughter love
‘काय ते छोटे छोटे घास, काय ते तोंड पुसणे…’ एकाच ताटात बाबांबरोबर जेवणारी लेक; पहिला घास लेकीला, तर दुसरा… VIDEO व्हायरल
Vloggers Surprise Blinkit Swiggy Delivery Riders With Gifts
एक ही दिल है, कितनी बार जीतोगे! ‘त्यांनी’ डिलिव्हरी बॉयला दिले हटके गिफ्ट; VIDEO पाहून तुम्हीही कराल कौतुक
Parents who give nylon manja to their children are also facing action by nashik police
मुलांना नायलॉन मांजा देणारे पालकही कारवाईच्या फेऱ्यात
Sushil Karad Walmik Karad
वाल्मिक कराडचा मुलगा अडचणीत? मॅनेजरच्या घरात घुसून बंदुकीच्या धाकावर लूट केल्याची तक्रार; महिलेची न्यायालयात धाव
nylon manja loksatta news,
पुणे : नायलॉन मांजा विक्री करणारी महिला ताब्यात, संक्रातीत पतंगबाजीसाठी छुप्या पद्धतीने मांजा विक्रीचा प्रकार उघड

समाजमाध्यमांवर दिसणारं यातलं पहिलं उत्पादन आहे, ‘हेअर ब्रेडिंग टूल’- म्हणजे केसांची वेणी घालायचं मशीन असं तुम्हाला वाटत असेल, तर ते तितकं सरळ-साधं नाही. चक्क केसांमध्ये दोरे ओवून त्यांच्या बारक्या बारक्या वेण्या तयार करण्याचं मशीन आहे हे! भारतात ऑनलाईन विक्री संकेतस्थळांवर ते काहीच्या काही महाग विकलं जातंय. या प्लॅस्टिकच्या टूलमध्ये दोरा गुंडाळलेली बॉबिन बसवण्याची सोय आहे. टूलच्या मधल्या गोलात थोडे केस अडकवून केसांमध्ये वरून खाली असं हे टूल फिरवलं, की केसांच्या बटेवर दोऱ्याचे आडवेतिडवे वेढे दिले जातात. असं पुन्हा पुन्हा केल्यानंतर रंगीबेरंगी दोऱ्यांनी वेढलेली केसांची एक बट तयार! संपूर्ण केसांमध्ये अशा दोरे ओवलेल्या ५-६ बटा तयार करून फॅशन केली जाते. जेव्हा हे दोरे नको असतील तेव्हा ते केसांच्या बटेतून ओढून काढले जातात.

हेही वाचा… ग्राहकराणी: एका वर्षात दामदुप्पट?

या मालिकेतलं दुसरं उत्पादन म्हणजे ‘हेअर ज्वेलर’. हेही प्लॅस्टिकचं छोटं टूल आहे. ‘हेअर ज्वेलर’ या नावाप्रमाणेच त्याबरोबर रंगीत, चकाकणारे खडे दिलेले असतात. हे खडे साधे नसतात बरं! दोन सपाट रंगीत खडे एकमेकांवर बसवलेले असतात आणि त्या दोन सपाट पृष्ठभागांच्या मध्ये स्प्रिंगसारखी रचना असते. असा एक खडा तयार केलेला असतो. हे खडे टूलमध्ये बसवले जातात आणि केसांची एक बट घेऊन त्यावर थोड्या थोड्या अंतरानं ३-४ खडे लावले जातात. अर्थातच हे करताना खड्याच्या सपाट पृष्ठभागांच्या मध्ये असलेला स्प्रिंगसारखा भाग ताणला जातो आणि त्यात केसांची बट अडकते. संपूर्ण केसांत एक किंवा दोनच बटा अशा ‘रत्नजडित’ केल्या तरी शोभून दिसतात. हे टूल वापरणं सोपं असलं, तरी या खड्यांमधून केसांच्या बटा मोकळ्या करणं अवघड आहे, त्यात केस अडकून तुटू शकतात, तसंच खडे चटकन खराब होण्यासारखे आहेत, अशा काही तक्रारी वापरकर्त्यांनी विक्री संकेतस्थळांवर केलेल्या दिसून येतात. मात्र हे टूल हेअर ब्रेडिंग टूलपेक्षा बरंच स्वस्त आहे.

हेही वाचा… अनुष्का शर्मा, हे श्रेय तुझंच…

तुम्ही आपल्या लहान मुलामुलींना अशी टूल्स घेऊन द्या किंवा देऊ नका, परंतु समाजमाध्यमांचं वाढलेलं प्रस्थ पाहता लहान मुलं अशा वस्तूंचे व्हिडीओ बघतात आणि आई-वडिलांकडे हट्ट धरतात, ही तर अगदी सार्वत्रिक अनुभवास येणारी गोष्ट आहे. त्यामुळे अशी दिवसागणिक बाजारात नवीन येणारी, काहीशी विचित्र आणि खरंतर काहीही व्यावहारिक उपयोग नसलेली टूल्स विकत न घेण्यासाठी मुलांना तयार कसं करायचं, हीच पालकांपुढची डोकेदुखी ठरते आहे!

lokwomen.online@gmail.com

Story img Loader