दीप्ती आणि तिची दहा वर्षांची रीना, मायलेकींचं अगदी गूळपीठ असायचं. रीनाच्या शाळेतल्या गमती, झोपतानाची गोष्ट, मधूनच एखादी मिठी अशा मायलेकींच्या रोजच्या लाडाच्या गोष्टी होत्या. मात्र दीप्तीचं पोटाचं ऑपरेशन झाल्यामुळे गेले दीड-दोन महिने जखम, टाके, हॉस्पिटलच्या चकरा, भेटायला येणारे पाहुणे या गडबडीत दोघींचं सवयीचं रुटीन एकदम थांबलं होतं. अशक्तपणामुळे गप्पा मनसोक्त होत नव्हत्या. ड्रेसिंग ओलं असताना दीप्ती तिला थोडं दुरुनच, भीतभीत जवळ घ्यायची. त्यात रीनाच्या धसमुसळेपणाच्या भीतीने, “आईला धक्का लागेल, जवळ जाऊ नको, आता तू लहान नाहीस” असं आजोबा-आजी, पाहुणे सांगायचे. “सगळे मलाच सांगतात आणि तूही माझ्याकडे लक्ष देत नाहीस.” रीना रुसून म्हणायची.

आणखी वाचा : ‘ती’ची यशोगाथा : डाऊन सिंड्रोम व्याधीग्रस्त महिलेने नकार पचवून उभारला स्वतंत्र यशस्वी व्यवसाय!

How to get rid of mobile addiction from kids parents did this trick viral video
मुलाने चक्क मोबाइल सोडला आणि अभ्यासाला बसला! पालकांनी केलेला ‘हा’ प्रयोग पाहून तुम्हीही व्हाल चकित, पाहा VIDEO
nana patekar reacts on allu arjun arrest
अल्लू अर्जुनच्या अटक प्रकरणावर नाना पाटेकर म्हणाले, “कोणाला…
academic degree on experience
विश्लेषण : अनुभवाच्या आधारे पदवी कशी मिळणार?
Satara Child marriage, delivery of minor girls Satara ,
सातारा : अल्पवयीन मुलींच्या प्रसूतीमुळे बालविवाह उघड, विवाहित अल्पवयीन मुलींच्या पतींवर गुन्हे दाखल
Gashmeer Mahajani
“…तरच मूल होऊ द्या”, पालकत्वाविषयी स्पष्टच बोलला गश्मीर महाजनी; म्हणाला, “तुम्ही आई-वडील म्हणून कैद…”
Bharat Gogawale, Bharat Gogawale minister desire,
भरत गोगावले यांची मंत्रिपदाची इच्छा यंदा तरी पूर्ण होणार का ?
Dharmarakshak Sambhaji movie, Karad ,
सातारा : ‘धर्मरक्षक संभाजी’ प्रदर्शित करा अन्यथा, दाक्षिणात्य चित्रपट बंद पाडू; कराडमध्ये सेवाभावी संस्थांचा इशारा
Nagpur Guardian Minister, Devendra Fadnavis,
नागपूरच्या पालकमंत्रीपदावरून तर्कवितर्क

“अगं, आपल्याला भेटायला येतात ना सगळे? आणखी थोडेच दिवस…” दीप्ती समजूत घालायची.
एके दिवशी, काहीतरी फालतू कारणावरून रीनानं बाबाशी मोठमोठ्याने वाद घालायला, भांडायला सुरुवात केली. तिचा आगाऊपणामुळे सगळेच तिला रागवायला लागले. दीप्तीलाही तिचं वागणं आवडलं नव्हतं, पण ‘ओरडू नकोस’ हे ओरडून सांगणं दीप्तीला पटायचं नाही आणि इतक्या भडकलेल्या मुलीशी शांतपणे संवाद करण्याएवढी शक्ती तिच्यात नव्हती. त्यामुळे तो सामुदायिक आरडाओरडा ती फक्त पाहत होती. अचानक तिला जाणवलं, की लहानपणापासून कधीही मुद्दे मांडून लॉजिकलीच भांडणारी रीना, आज निरर्थक आणि आकांडतांडव करत भांडतेय. दीप्तीनं नवलानं पाहिलं, तर तावातावाने भांडतानाही, रीनाच्या डोळ्यांत रागाऐवजी इतकी तीव्र वेदना दीप्तीला दिसली, की चाललेला गोंधळ पूर्णपणे विसरून तिनं पोरीला पटकन जवळ घेतलं. फक्त थोपटत राहिली. रीनाही तिला घट्ट बिलगली आणि शांत झाली. जसं काही तिला तेवढंच हवं होतं. विशेष म्हणजे, रीना बिलगल्यावर दीप्तीलाही खूप बरं वाटलं. हरवलेलं सापडल्यासारखं वाटलं होतं.

आणखी वाचा : आरोग्यासाठी घातक औद्योगिक क्षेत्रात महिला कामगार सर्वाधिक! सर्वेक्षणात लक्षात आली धक्कादायक बाब

हा अनुभव अनपेक्षित होता. त्यामुळे रीनाला थोपटताना दीप्तीचं विचारचक्र सुरु झालं. लहान मुलं चुकीची वागली, की अनेकदा घरातली मोठी माणसं मुलांचं म्हणणं ऐकून, समजून घेतच नाहीत. ‘तुझं कसं चुकतंय’ हे सगळे एकाच वेळी अधिकाराने आणि ओरडून सांगायला लागतात. या गोंधळात ते लहान मूल किती एकटं पडतं, अपमानित होतं हे तेव्हा दीप्तीला तीव्रतेनं जाणवलं. रीनाच्या भांडणामागचं कारण दुसरंच काहीतरी आहे, तिला कशाचा तरी इतका जास्त त्रास होतोय, की तो झेपत नसल्यामुळे तिला नीट वागताच येत नाहीये हे तिच्या डोळ्यांतली वेदना दिसली म्हणून आपल्या लक्षात आलं आणि चूक-बरोबर, चांगलं-वाईट, मोठ्यांसाठी आदराची अपेक्षा वगैरे सर्व जनरीत ‘तात्पुरती’ बाजूला ठेवून आपण तिला जवळ घेतलं. तो मायेचा उमाळा ‘अनकंडिशनल’- निरपेक्ष होता. आपल्याला रीनाची भावनिक गरज ‘आतून उमगली’. मनानं रीनाच्या जागी पोहोचल्यावरच आपल्याला कळलं, की तिला आईनं तिच्याकडे लक्ष द्यायला हवंय, नेहमीचा कम्फर्ट झोन हवाय, आईशी हक्काची जवळीक खूप दिवस नसल्यामुळे तिला अतिशय एकटं, असुरक्षित वाटतंय आणि या अनावर भावनांचं काय करायचं ते न कळून असहाय्य होऊन तिनं भांडण काढलंय. आपण कुशीत घेतल्याबरोबर तिचा आवेश आणि आवेग संपला. तिला फक्त एक प्रेमाचा स्पर्श हवा होता. आज योगायोगानं आपल्याला तिचं मन दिसलं. पण एरवी आपणही जेव्हा शिस्त, मोठ्यांचा आदर वगैरे जनरीतीत अडकतो, मुलांकडून आदर्श वागण्याच्या अपेक्षा करतो, तेव्हा तिच्या हट्टी वागण्यामागच्या इतक्या साध्या, छोट्या गरजा आपल्याही लक्षात येत नसणार.

आणखी वाचा : नातेसंबंध: बायको ठरतेय डोकेदुखी ?

दीप्तीला एकदम भरूनच आलं. यापुढे जाणीव जागी हवी. मुलांच्या गरजांचं भान ठेवायचं की जनरीतीत अडकून घाबरायचं हा चॉइस आपलाच असतो. मुलांच्या जागी क्षणभर जाऊन त्यांच्या मनात डोकावून पाहायचं की ‘आपलं मूल आदर्श हवं’ या अपेक्षांच्या चष्म्यातून टीका करत राहायची हा चॉइस आपलाच असतो. रीनाच्या शांतावलेल्या चेहऱ्याकडे पहात दीप्तीनं स्वत:ला बजावलं.
(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)
neelima.kirane1@gmail.com

Story img Loader