संकेत आणि ऐश्वर्याच्या लग्नाला पाच वर्षं झालेली. दोघांचं तसं चांगलं जमायचं, फक्त एक अपवाद. संकेत अबोल आणि ऐश्वर्या अत्यंत बडबडी. तिच्या धबधब्याला संकेतकडून फक्त ‘हां’,‘हूं’ असा प्रतिसाद मिळाला की ती खट्टू व्हायची. सहसा थोड्या वेळाने नाराजी विसरून जायची, मात्र तिच्यासाठी अतिशय महत्वाच्या एखाद्या गोष्टीबाबत त्याचा असा थंड रिस्पॉन्स तिला सहनच व्हायचा नाही. मग पुटपुट, बडबड, ‘तू असाच आहेस, तुला कशातच रस नसतो, माझ्याकडे लक्षच नसतं’ वगैरे सुरू व्हायचं. अति झाल्यावर संकेत वैतागायचा. “अगं ऐकतोय ना मी, तू अमुक अमुक सांगितलंस. मी ‘छान आहे’ म्हणालो ना? आणखी काय बोलणार?” मग वादविवाद, अबोला, इत्यादी. पण ऐश्वर्याला अबोलाही फार वेळ जमायचा नाही. “तू कधीच बोलायला येत नाहीस. शेवटी माझीच गरज.” करत ती बोलायला यायची.

आणखी वाचा : Happy Birthday Barbie: बार्बी म्हणते, अवघे ६३ वयोमान; अमेरिकन बार्बी होती ‘मेड इन जपान’!

uddhav thackeray fact check video
“मी गोमांस खातो, काय माझं वाकडं करायचं ते करा” उद्धव ठाकरेंनी दिली जाहीर कबुली? या खोट्या VIDEO ची खरी बाजू पाहा
Sushma Andhare mimicry
Sushma Andhare : “माझी प्रिय भावजय” म्हणत सुषमा…
Sanjay Bangar Son Aryan Becomes Anaya Shares Hormonal Transformation Journey Video on Instagram
Sanjay Bangar Son: भारताच्या माजी क्रिकेटपटूच्या मुलाची हार्माेन रिप्लेसमेंट थेरपी, आर्यनने नावही बदललं, VIDEO केला शेअर
Market Technique Stock Market
बाजाराचा तंत्र-कल : शेअर बाजाराला बाळसं की सूज?
Two girls fighting at collage over a guy shocking video viral on social media
प्रेमासाठी काय पण! एका बॉयफ्रेंडसाठी दोन तरुणींचा झिंज्या उपटत तुफान राडा; VIDEO पाहून व्हाल हैराण
Will Ramdas Athawale take care of BJP or Republican workers
रामदास आठवले भाजपला सांभाळणार की रिपब्लिकन कार्यकर्त्यांना?
Suraj Chavan KGF Bike
“ही गाडी म्हणजे माझी लक्ष्मी…”, सूरज चव्हाणकडे आहे खास KGF Bike! कोणी दिलीये भेट? म्हणाला…
congress mp abhishek manu singhvi remarks on cji chandrachud
चंद्रचूड यांच्या कार्यकाळात सत्तासंघर्षाचा निकाल लांबणीवर पडणे अतर्क्य ; सिंघवी

एकदा दोघं त्यांच्या मैत्रिणीकडे – तनयाकडे भेटायला गेले होते. तनया अभ्यासू, अनेक विषयांवर भरपूर वाचन आणि बोलकी. गप्पांमध्ये ऐश्वर्या – तनयाची बडबड आणि संकेतचं काम श्रोत्याचंच होतं. कशावर तरी संकेतची बधीर रिॲक्शन आल्यावर ऐश्वर्या भडकली. “बघ, याचं असं असतं. सदा बधीर. घडाघडा बोलणं नाहीच, मला तर कंटाळा येतो.” यावर संकेतची आधी आजिजी, गोंधळणं आणि नंतर वैतागणं पाहून तनया हसत म्हणाली, “अरे, भांडू नका. या बोलण्या न बोलण्याचा संबंध प्रत्येकाच्या शिकण्याच्या नैसर्गिक पद्धतीशी – लर्निंग स्टाइलशी असतो, हे समजून घ्या.”
“म्हणजे?”

आणखी वाचा : International Women’s day 2023: २००० वर्षांपूर्वी स्वतःच्या नावाने नाणी पाडणारी मराठी आद्य राणी ‘नागनिका’

“थोडक्यात सांगते. आपला मेंदू समजून घेण्यासाठी डोळे, कान, तोंड आणि स्पर्श ही ज्ञानेंद्रिये वापरतो, त्यातूनच व्यक्त होतो. काही लोकांना पाहून म्हणजे व्हिजुअल पद्धतीने पटकन समजतं, काहींना बोलून-ऐकून व्यक्त होणं सोपं वाटतं तर काहींचं कृती, म्हणजे हालचाल आणि स्पर्श करून शिकणं सहज होतं. तशी प्रत्येकामध्ये सर्व ज्ञानेंद्रियांनी समजून घेण्याची क्षमता असतेच, पण कोणाला कुठली पद्धत जास्त रुचते ते प्रत्येकाचं वेगळं, बरंचसं जन्मजात असतं.”

आणखी वाचा : international womens day 2023 : जगातील ‘आद्यमहिला’; ‘ती’चे वय तब्बल ३१ लाख ८० हजार वर्षे!

“म्हणजे, त्यानुसार, आपण दोघी जास्त ऑडिटरी आहोत आणि संकेत व्हिजुअल आहे. हो ना?” “बरोबर. यात चूक-बरोबर काही नसतं. जसा आपला रंग, आवाज तशीच लर्निंग स्टाइल. शब्द ही तुझी गरज आहे ऐश्वर्या, आणि पाहून समजून घेणं, व्हिज्युअली व्यक्त होणं संकेतसाठी स्वाभाविक आहे. खूप शब्द एकदम ऐकल्यावर तो बधीर होतो आणि त्याला काय बोलायचं हे सुचतच नाही.
“हे तू बरोबर सांगतेस तनया. तिनं नवा ड्रेस घातल्यावर ‘ती किती छान दिसतेय,’ असं मी म्हणालो नाही की ती चिडते. ‘तुला माझं कौतुकच नाही’ म्हणून भांडते. पण तिला पाहिल्याबरोबर माझ्या डोळ्यांत जे ‘आहा’ येतं ते तिला दिसतच नाही. एवढा कौतुकानं पहातोय तुझ्याकडे, आणखी बोलायचं काय? असं मला वाटतं. ”
“खरं आहे. हे समजून घेता आलं, तर भांडणाचं कारण मुळातूनच संपेल. बघा जमतंय का.” तनया म्हणाली.
“ऐश्वर्या, मला वाटतं आता तू अति बडबड थांबवलीच पाहिजेस. आता मला समजलं, की तुझ्या बडबडीने मी इरिटेट होतो, हे नैसर्गिक आहे. इतकी वर्षं उगीचच ऐकून घेतलं.” संकेत अनपेक्षितपणे म्हणाला.

आणखी वाचा : गच्चीवरची बाग कशी कराल?

“मीच का? आत्ताच तनयानं सांगितलं ना, की बोलणं ही माझी नैसर्गिक गरज आहे.” ऐश्वर्या पवित्रा घेत म्हणाली.
“थांबा, थांबा. मिळालेल्या माहितीचा उपयोग भांडण वाढवण्यासाठी करायचा की कमी करण्यासाठी, ते आधी ठरवा. ऐश्वर्याने स्वभाव पूर्ण बदलून एकदम शांत व्हावं किंवा तू बडबड्या व्हावंस असलं ट्रान्सफॉरमेशन अपेक्षितच नाहीये संकेत. फक्त तू थोडया शाब्दिक प्रतिसादाने तिला भाव द्यावास आणि ऐश्वर्या, तू स्वत:च्याच नादात बोलत सुटण्यापेक्षा, संकेतची देहबोलीही समजून घ्यावीस, इतकंच. दुसऱ्याची स्वाभाविक गरज समजून घेतल्यावर आपल्या अपेक्षा वास्तविक होतात, त्यामुळे वाद, नाराजीही कमी होते. आता जोडीदाराच्या इच्छेला मान देऊन स्वत:त थोडासा बदल करायचा, की ‘माझंच बरोबर’ चा खेळ वर्षानुवर्षं खेळत रहायचा हा चॉइस तुमचा आहे.” तनया म्हणाली.
(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)
neelima.kirane1@gmail.com