इरा आणि शुमोना या कॉलेजमधल्या मैत्रिणी खूप वर्षांनी भेटल्या. शुमोनाच्या बाबांची नंतर कोलकात्याला बदली झाल्यामुळे संपर्क कमी झाला असला तरी एकमेकींच्या करिअर अचिव्हमेंट्स आणि आयुष्यातले हायलाईट्स दोघींनाही माहीत होते. ऑफिसच्या कॉन्फरन्ससाठी शुमोना या शहरात आल्यामुळे आजची अनपेक्षित भेट झाली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

गेल्या काही वर्षांत पुलाखालून बरंच पाणी वाहून गेलं होतं. इराचं लग्न होऊन संपूनही गेलं होतं. शुमोनाची एक सिरीयस रिलेशनशिप आणि मग ब्रेकअप झाला होता. दोघींचंही करियर थोडं खालीवर होऊन आता मार्गी लागत होतं.

“तू कशी आहेस इरा? झाल्या गोष्टींचा अजूनही त्रास होतोय का गं?” हाय-हॅलो, घरच्यांची खुशाली वगैरे झाल्यावर शुमोनाने विचारलं.

“तो त्रास कधीच संपला गं, पण यापुढे काय करावं? ते कळत नाहीये, त्याचा त्रास जास्त होतोय.”

“म्हणजे?”

“आई बाबांच्या मते मी पुन्हा लग्न करावं. मला वाटतं, करिअरसाठी हेच दिवस महत्वाचे. पुन्हा लग्नाच्या भानगडीत पडून कामावरचा फोकस जायला नको. पण मध्यंतरी एका मैत्रिणीला बाळ झालं म्हणून भेटायला गेले होते, तेव्हा इतकं तीव्रपणे बाळ हवंसं झालं, की मिळेल त्याच्याशी पटकन लग्न करून घेऊ या असंही सिरीयसली वाटलं.”

हेही वाचा… सुलूला देवी भेटली तेव्हा!

“वाटू शकतं असं.” शुमोना समजून हसली.

“पण जेव्हा एकेका मैत्रिणींचे ‘संसार’ पाहते ना, तेव्हा आमच्यातल्या भांडणांची आठवण येऊन कॉन्फिडन्सच जातो. लग्न न केलेल्या एका मावशीशी गप्पा होतात, तेव्हा पुढच्या एकटेपणाची भीती वाटते. त्यामुळे मी गोंधळलेय, काहीच ठरवता येत नाहीये, याचाच त्रास होतोय. बरं, माझं राहू दे. तू कशी आहेस? पुढचा काय विचार?”

“मी मस्त आहे. काम आवडीचं आहे, बिझी आहे, खुश आहे. पुढचं काहीही ठरवलेलं नाही. आपल्याला मनापासून एखादी गोष्ट वाटली तरी ती होईलच असं नसतं, हे समजलंय मला. त्यामुळे मी आला दिवस मनापासून एंजॉय करतेय. भेटलं कुणी वाटेत, तर तेव्हा ठरवू.”

“भारी गं, असं ठरवायलाही गट्स लागतात. माझ्यासारखी घोळात अडकलेली नाहीस.”

“याचं कारण तुला कोणी काही म्हटलं की त्यावेळी ते खरं वाटतंय. सांगणारा मनापासून सांगत असेल, तरी तुझ्या दृष्टीने काय योग्य आहे, ते तूच ठरवायचं आहेस?”

“हो, पण तेच तर जमेना ना?”

हेही वाचा… बायकोचा कॉल रेकॉर्ड करताय… सावधान!

“एकदा शांतपणे डोळे मिटून बघ, दहा वर्षांनंतर तू स्वत:ला कुठे पाहतेस? घरात आहेस की ऑफिसमध्ये? कोणत्या देशात? किंवा असं शोध, की दहा वर्षांनी तुझ्याजवळ काय नाही याची रुखरुख तुला सर्वांत जास्त छळेल? करियरमध्ये आहे तिथेच राहिलीस याची? करियर सोडून लग्न केलं याची? जोडीदार नाही याची? की मूल नाही याची?”

“मी असा विचार नव्हता केला. लोकं बोलतात त्याप्रमाणे वेगवेगळया दिशेने विचार होतो.”

“लोक काय म्हणतील? यानं जर तुला फरक पडणारच असेल, तर लोकांनी दहा वर्षांनी तुझ्याबद्दल काय बोललेलं आवडेल? असा विचार कर.

‘अरे, ही पस्तीशीतच एकटी झाली खरी, पण कामात झोकून देऊन करियरच्या अशा उंचीवर पोचली, की नवरा, संसाराची आठवणही येऊ नये.’ हे बरं वाटेल? की ‘आज हिने हिंमतीने ओळख आणि आर्थिक स्वातंत्र्य कमावलंय खरं, पण शेवटी एकटीच. संसार नसेल तर एवढं कमवून उपयोग काय?’ किंवा आणखी अशाच काही कमेन्ट असतील. त्यातली कुठली कमेंट तुला आवडेल? कुठली झेलता येणार नाही? ते शोध. मग नवरा हवाच असं असेल तर मित्र-मैत्रिणीना सांग, मंडळात नाव नोंदव. फक्त मूल हवं असेल तर दत्तक घ्यायचा मार्गही आहे, करियर हवं असेल तर आणखी कोर्सेस कर, परीक्षा दे. आणि ‘मला काय हवंय? या प्रश्नाला भिडायचंच नसेल तर दहा वर्षं अशीच गोंधळलेली रहा.” शुमोनाचा टोमणा झेलत इरा हसत म्हणाली,

“खवचटपणा केलास तरी सोपं केलंस तू. ‘मला’ नक्की काय हवंय? ते शोधण्यावर फोकस करायचं की लोकांच्या मतांमध्ये अडकून बसायचं? एवढाच चॉइस करायचाय खरं तर. जमेल आता. थँक यू डियर.”

(लेखिका रिलेशनल कौन्सिलर आहेत)