‘‘एक सिरदर्द की गोली देदियो… और एक काँडोमका डब्बा…’’
विचारणारी भाटियांची तमन्ना आहे म्हणल्यावर मी थबकले, लक्ष देऊन बघू लागले.
“कौनसा वाला दूँ?”
“आपणे जो बढिया लागे!”
“मेरा ब्याह ना हुआ अबतक…”
“मेरा कौणसा हुआ हैं!”

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

या मजेदार संवादानं माझं लक्ष वेधून घेतलं आणि संपूर्ण ट्रेलर बघितला. तमन्नाचा ‘बबली बाउन्सर’ नामक चित्रपट येऊ घातलाय. या चित्रपटाची प्रसिद्धी करणं हा इथे मुळीच हेतू नाही. तो कसा असेल हेही मी सांगू शकणार नाही. फक्त सेक्सविषयी खुल्लमखुल्ला बोलणारी, मुलांना हाणामारी करून फोडून काढणारी ‘मुलासारखी मुलगी’ म्हणजेच ‘बोल्ड’, ‘मॉडर्न’- या दुसऱ्या प्रकारच्या ‘स्टिरिओटाईप’ची पुनरावृत्ती करणारा हा चित्रपट नसेलच हेही सांगता येणार नाही. मला यात वेगळी वाटलेली गोष्ट हीच, की मी आजवर तमन्नाला अशा भूमिकेत अजिबात पाहिलेलं नव्हतं!

काही लोक इथे ‘बाहूबली’चा रेफरन्स देतील. पण खरं सांगा, ‘बाहूबली’त वल्कलसदृश कपडे चढवून लढाई करणारी तमन्ना लोकप्रिय झाली, की बाहूबलीनं तिला तिच्या ‘स्त्री’त्वाची (?) जाणीव करून दिल्यानंतर शुभ्र (आणि तोकड्या) कपड्यांतली, परी होऊन त्याला (आणि पब्लिकला) भुलवणारी लोकप्रिय झाली?… माझं जे काही मेनस्ट्रीम चित्रपटांचं ज्ञान आहे, त्यात मी या मुलीला गोरी गोरी, सुंदर आणि पुष्कळ चित्रपटांत प्रचलित व्याख्येनुसार ‘हॉट’ दिसणारी अशा प्रतिमेत पाहिलं आहे. ही ‘ऑन स्क्रीन’ अशा प्रकारची मारामारी करू शकेल, ‘नो बकवास’ संवाद बोलू शकेल, लस्सी प्यायल्यावर ढेकर देऊ शकेल, अशी मी कल्पनाही केली नव्हती… आणि अचानक असं वाटून गेलं, की आपल्या प्रतिमेनुसार आपण जे मुळीच करणार नाही असं काही तरी करून पाहाण्याची संधी मुळातच अभिनेत्रींना कमी मिळते, नाही का?…

गेल्या काही वर्षांत स्त्रीप्रधान चित्रपटसुद्धा मोठ्या प्रमाणावर आले आणि त्यांचं स्वागतच आहे. पण इथे आपण ‘मेनस्ट्रीम’, ‘मास’, ‘कमर्शियल’ चित्रपटांविषयी आणि त्यातल्या प्रस्थापित नट्यांविषयी बोलतोय. पुरूषांना ‘ग्रेट’ दाखवण्यात मेनस्ट्रीम स्त्री अभिनेत्रींना विशिष्ट प्रतिमेत अडकून राहाणं भाग पडतं, तरच त्यांना लोक स्वीकारतात, ही गोष्ट इथे अधोरेखित होते, बदलाच्या लहानशा आशेसह!

तमन्नानंतर अर्थातच मला आठवली समांथा! वर्षभरापूर्वी ‘फॅमिली मॅन’मध्ये ‘राजी’ या श्रीलंकन तमिळ मुलीच्या कणखर भूमिकेत समांथा झळकली आणि तिला आजवर प्रामुख्यानं ‘लूस पोण्णं’च्या भूमिकेत पाहिलेल्या तमाम लोकांना धक्का बसला. ‘अरेच्चा, हिला अभिनयसुद्धा येतो?’ एवढ्यावरच हा धक्का धांबला नाही, तर तिनं इतकी मजबूत, प्रचंड शारीरिक कष्टांची गरज असलेली भूमिका लीलया पेलली, याबद्दल तिचं प्रचंड कौतुक झालं… आणि काहीच महिन्यात समांथा पुन्हा दिसली ‘पुष्पा’मध्ये ‘ओ अंटावा मावा’ म्हणत! यशस्वी मेनस्ट्रीम अभिनेत्री म्हणून टिकून राहायला आपल्याकडे ‘राजी’ पुरत नाही!

वर मी ‘लूस पोण्णं’ हा प्रचलित तमिळ शब्द वापरलाय, त्याची व्यृत्पत्तीही सांगून टाकते. तमिळ (किंवा तेलुगूही) मेनस्ट्रीम चित्रपटांमध्ये अभिनेत्रीची रूढ भूमिका काय असते, तर ती असते ‘लूस पोण्णं’ची. म्हणजे शब्दश: छान दिसणारी, गरजेनुसार ‘हॉट’ दिसू शकणारी, स्वच्छंद ‘पगली’ (पगली हा फारच गुडी गुडी शब्द झाला. ‘लूस’चा थेट अर्थ जिच्या मेंदूचा स्क्रू ‘लूज’ आहे अशी!).

चित्रपटात हीरोच्या चांगुलपणावर आणि त्याच्या ‘मर्द’पणावर या बयेची सगळी भिस्त असते. अशा कित्येक तेच तेच करून कंटाळलेल्या ‘लूस पोण्णं’ (फक्त दाक्षिणात्य चित्रपटांतच नव्हे, तर एकूणच कमर्शियल चित्रपटांत) एखादी तरी वेगळी स्क्रिप्ट हातात यावी अशा अपेक्षेत आहेत. ‘वेगळी’ म्हणजे वरच्या उदाहरणाप्रमाणे फक्त मारधाड करण्याची संधी देणारी एवढाच अर्थ नाही. पण कदाचित हा रस्ता ‘स्टिरिओटिपिकल’ बदलापासून सुरू होऊन कधी तरी खऱ्या बदलापर्यंत पोहोचू शकेल…

शेवटी आणखी एक उदाहरण, पुन्हा दाक्षिणात्य चित्रपटांतलंच. (याबद्दल मला माफ करा, परंतु हिंदी व्यावसायिक चित्रपटाच्या रूपात ‘सीन टू सीन’ रीमेक पाहाण्यापेक्षा मूळचा दाक्षिणात्यच बरा, असं म्हणत हल्ली तेच चित्रपट जास्त पाहिले जातात!) मणीरत्नम् या प्रतिभावंत दिग्दर्शकाचा अतिभव्य- ‘मॅग्नम ओपस’ चित्रपट म्हणून या सप्टेंबरच्या शेवटी ‘पोन्नियिन सेल्व्हन-१’ प्रदर्शित होतोय (पाच भाषांत, भारतभर वगैरे).

मराठी वाचकांना ‘मृत्युंजय’ कशी प्रिय आहे, त्याहून कितीतरी अधिक प्रमाणात कल्की लिखित ‘पोन्नियिन सेल्व्हन’ हा प्रत्येक तमिळ व्यक्तीच्या अस्मितेचा प्रश्न असतो. चोल साम्राज्याच्या या गौरवगाथेत ऐश्वर्या राय एका अतिशय भक्कम आणि अनेकविध छटांच्या ‘निगेटिव्ह’ भमिकेत दिसणार आहे.

‘मेनस्ट्रीम’मध्ये भविष्यात बदलाचं वारं शिरेल म्हणावं का?…