हवामान शास्त्रज्ञ असणाऱ्या क्लॉडिया शेनबॉम [Claudia Sheinbaum], या डाव्या विचारसरणीच्या सत्ताधारी मोरेना पक्षातून ऐतिहासिक विजय मिळवून त्यांनी देशाच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष होऊन इतिहास घडवला आहे. क्लॉडिया यांनी पुराणमतवादी पॅन पक्षाच्या सोचीयो गॅल्व्हस [Xochitl Gálvez] यांचा मेक्सिकोच्या निवडणूक प्राधिकरणाने केलेल्या जलद नमुना मोजणीनुसार ५८.३ ते ६०.७ टक्के मतांदरम्यान पराभव केला आहे. या मतांची आकडेवारी ही देशाच्या लोकशाही इतिहासातील सर्वाधिक टक्केवारी ठरली आहे.

ही मेक्सिकोच्या इतिहासातील सर्वात हिंसक आणि अतिशय रक्तरंजित अशी मोठी निवडणूक ठरली आहे. सत्तेत असणाऱ्यांवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्या अनेक राजकीय उमेदवार आणि अर्जदारांची गुन्हेगारी संघटनांकडून हत्या करण्यात आली होती. या सर्व हिंसाचारानंतर तब्ब्ल ३८ उमेदवार ठार झाले, ज्यामुळे लोकशाहीला परस्परविरोधी ड्रग कार्टेलच्या धोक्याची चिंता निर्माण झाली असल्याची माहिती रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिली असल्याचे इंडिया टुडेच्या एका लेखावरून समजते.

क्लॉडिया शेनबॉम यांनी विरोधी पक्षांच्या युतीचे प्रतिनिधित्व करणाऱ्या पुराणमतवादी पॅन पक्षाच्या सोचीयो गॅल्व्हस [Xochitl Gálvez] यांचा पराभव केलेला आहे. या निवडणुकांमध्ये तिसरा उमेदवार हे जॉर्ज अल्वारेझ मायनेझ [Jorge Alvarez Maynez] होते. या निवडणुकीमधील हा सर्वात तरुण उमेदवार असून त्यांनी मध्य-डाव्या नागरिकांच्या चळवळीचे प्रतिनिधित्व केले होते.

हेही वाचा : पॉडकास्टर, गोल्फर अन् भारतातील OpenAI मध्ये निवड झालेली पहिली व्यक्ती! जाणून घ्या कोण आहेत प्रज्ञा मिश्रा?

मेक्सिकोच्या निवडणुकीतील महत्त्वाच्या घडामोडी पाहू :

बहुतेक ठिकाणचे, खास करून मिचोआकन आणि चियापासमधील मिळून तब्ब्ल १७० मतदान केंद्रांसाठीच्या योजना या सुरक्षा कारणांमुळे रद्द कराव्या लागल्या असल्याची माहिती नॅशनल इलेक्टोरल इन्स्टिट्यूटने सांगितल्याचे समजते. त्याचबरोबर पुएब्लामध्ये चार सशस्त्र हल्लेखोरांनी मतपत्रिका चोरण्यासाठी मतदान केंद्र असणाऱ्या शाळांमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला होता; तर १ जून रोजी मतदानाच्या काही तास आधी एका स्थानिक उमेदवाराची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. त्यामुळे यंदाची राष्ट्रपतिपदाची स्पर्धा ही अतिशय हिंसक आणि रक्तरंजित ठरली आहे.

रविवारी झालेल्या निवडणुकीत जवळपास १०० मिलियन मेक्सिकन नागरिक हे मतदान करण्यास पात्र होते. त्याचबरोबर, १.४ मिलियन नागरिक हे परदेशातून मतदान करण्यासाठीदेखील पात्र होते, अशी माहिती सीएनएनच्या अहवालानुसार समजते.

क्लॉडिया शेनबॉम यांनी त्यांच्या मुख विरोधी सोचीयो गॅल्व्हस [Xochitl Gálvez] यांवर जनमत चाचणीने नेतृत्व केले आहे. क्लॉडिया शेनबॉम यांच्याकडे संघटित गुन्हेगारी हिंसाचाराचा सामना करण्याचे काम सोपवले जाईल.

“२०० वर्षांमध्ये प्रथमच या प्रजासत्ताक देशामध्ये मी पहिली महिला राष्ट्राध्यक्ष होणार आहे”, असे शेनबॉम यांनी म्हटले असून, त्यांनी त्यांच्या समर्थकांना ‘प्रेसिडंट, प्रेसिडंट’ अशा घोषणा देण्यास सांगितले.

हेही वाचा : आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली भारतीय साडी! काय आहे, ‘थारी बाय श्रुतिका’चे स्वप्न, पाहा

‘माचो’ [Macho] संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या, जगातील दुसऱ्या क्रमांकाची रोमन कॅथलिक लोकसंख्या असणाऱ्या आणि महिलांसाठी विशिष्ट पारंपरिक चौकट असणाऱ्या मेक्सिकोसाठी, शेनबॉमचा विजय हा अतिशय मोठा आणि अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे.

शेनबॉम ही मेक्सिको किंवा कॅनडामधून युनायटेड स्टेट्स जनरल निवडणुकांमध्ये विजयी झालेली पहिली महिला ठरली आहे.

“मला कधीही वाटलं नव्हतं की मी एका महिलेला मत देईन”, असे मेक्सिकोच्या सर्वात लहान राज्य टलाक्सकालातील ८७ वर्षांच्या एडेलमिरा मॉन्टिएल यांनी म्हटले आहे. एडेलमिरा मॉन्टिएल या शेनबॉमच्या समर्थक आहेत, अशी माहिती रॉयटर्सच्या अहवालानुसार समजते.

“पूर्वी आम्ही मतदान करू शकत नव्हतो, मात्र जेव्हा मत देता येऊ लागलं तेव्हादेखील पती ज्या व्यक्तीला मत देण्यास सांगायचे त्याच व्यक्तीला मत द्यावे लागत असे. मात्र, आता देवाच्या कृपेने ही परिस्थिती बदलली आहे आणि ते सुदैवाने आम्हाला पाहता येत आहे”, असेही एडेलमिरा मॉन्टिएल यांनी म्हटले.

शेनबॉमचा पुढील मार्ग हा अधिक खडतर असणार आहे. त्यामुळे शेनबॉम यांनी अर्थसंकल्पीय कमतरता असताना मात्र, कल्याणकारी धोरणे वाढवण्याच्या आश्वासनामध्ये समतोल साधला पाहिजे, अशी माहिती रॉयटर्सच्या अहवालानुसार समजते.