मनस्वी पटेल
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
मंडल अथवा मंडळ म्हणजेच सोप्या शब्दांत वर्तुळ. वर्तुळ म्हटलं की एक केंद्रबिंदू आला, एक बंद आणि परिपूर्ण गोल आला. याच गोलाला कधी-कधी फिरणारे चक्र म्हणूनसुद्धा संबोधण्यात येते. म्हणजेच मंडल एकाच वेळी परिपूर्णतेचे प्रतीक आहे आणि त्याच वेळी सतत फिरणारे, प्रवाही यंत्रसुद्धा, जे कुठल्याशा प्रवासाला निघालेय. ‘मंडल’ कलेला एक ऐतिहासिक परंपरा आहे.
आपल्याकडे रांगोळी काढण्याची पद्धत आहे. वेगवेगळ्या पानाफुलांची रांगोळी आहेच; पण पूर्वापार चालत आलेली ठिपक्यांची रांगोळी म्हणजे मंडलाचंच एक स्वरूप आहे. म्हणून सडा घालून, सारवून जेव्हा ठिपक्यांची रांगोळी सकाळच्या प्रहरी अंगणात रेखाटली जायची, तेव्हा दिवसभर श्रमणाऱ्या स्त्रियांच्या मनात प्रसन्नता आणि शक्ती आपसूकच प्रवेश करायची. आपली कला सादर करण्याचा, मनाला सक्षम करण्याचा सुंदर मार्ग आणि अनमोल ठेवा आपल्या संस्कृतीनेच आपल्याला दिलाय, हे आपण विसरता कामा नये.
हेही वाचा >>> “आम्ही लिव्ह इनमध्ये राहतो कारण…” काय मते आहेत तरुणाईची
कधी कधी अंगणात पांढरीशुभ्र रांगोळी प्रसन्नता द्यायची, तर कधी कधी यात रंग भरले जायचे. रंग भरताना या रांगोळीच्या प्रसन्नतेत अनेक भावनांचे संमिश्रण असायचे. यामुळेच सहज म्हणून रंग भरतानाही, त्या त्या रंगाच्या निवडीत त्या त्या व्यक्तीच्या रंगाचे मानसशास्त्र दिसून यायचे. मंडला कलेचा अभ्यास करताना मला याच रंगाच्या वैशिष्ट्याचा शोध लागला.
हो! रंगमानसशास्त्र अथवा रंगमनोविज्ञान. ज्यात रंगांच्या वापराने, निवडीने, अस्तित्वाने, मिळणारे मानसिक स्थैर्य, मानसोपचार आणि स्वभाव भिन्नत्व यांचा समावेश आहे. अगदीच बेसिक गोष्टीपासून सुरुवात करायची तर जवळजवळ सर्वांनाच रंगांचे प्रकार माहिती आहेत. प्राथमिक, द्वितीय, उष्ण, शीतल वगैरे; पण या रंगांचा आणि मानवी स्वभावाचा, प्रवृत्तीचा काही मेळ असू शकतो का? रंगांचा मानसिकतेवर काही परिणाम होतो का? रंग निवडण्याची प्रक्रिया त्या त्या व्यक्तीच्या मानसिकतेतून होते का? या सगळ्यांची उत्तरं म्हणजेच रंगमानसशास्त्र.
प्रत्येक व्यक्तीच्या स्वभावशैलीचा एक रंग असतो- असावा. आपण सहजच एखाद्याला आवडता रंग विचारतो. (आजकाल नोकरीच्या मुलाखतीमध्येही असे प्रश्न विचारतात. तिथे कारण विचारत नाहीत, त्यांच्याकडे तक्ता असतो.) आपण त्या व्यक्तीला रंग आवडण्याचं कारण विचारलं तर तो त्याचंही उत्तर देऊ शकतो. उदाहरणार्थ, पिवळा रंग आवडतो, असं म्हणणारा कारणादाखल सांगतो पिवळा तेजस्विता दर्शवतो. आनंद, प्रसन्नता देतो. असा व्यक्ती याच स्वभावाचा निघतो. निळा रंग आवडणारा म्हणतो, मला आकाशाची पोकळी, अथांगता भावते. अशी व्यक्ती स्वाभिमानी असते. आता विचार आला असेल काळा रंग आवडणारे पण बरेच व्यक्ती पाहिलेत, मग त्यांचं काय? मुळात काळा रंग म्हणजे नकारात्मकता नव्हे, तर खंबीर, स्पष्टवक्ते, स्वतःत रमणारे, प्रखर आणि ठाम विचारसरणीचे व्यक्ती हा रंग निवडतात. आपण चित्र काढताना, मंडल काढताना काळा रंग वापरतो. या रंगाने बाह्यरेखा (outlining) सीमा रेखाटल्या जातात आणि चित्राला एक पूर्णत्व येते. मंडलाची खोली, अंतरंग, त्यातले स्थैर्य याच रंगाने स्पष्ट होते.
हेही वाचा >>> खरंच ‘न्याय’ मिळाला का?
प्रत्येक प्रसंगानुरूप अथवा काही काळाच्या अंतराने माणसाच्या रंग निवडण्याच्या या कृतीत तात्पुरते बदलही घडून येतात. हा बदल सहसा खरेदी करताना, कामावर जाण्याचे कपडे निवडताना, घराचे पडदे बदलताना अशा काही गोष्टींमधून दिसून येतो. उदाहरणार्थ, निळा रंग आवडणारी व्यक्ती पिवळे कपडे बाजारातून घेऊन येते. हिरव्या रंगाचे पडदे लावते. नारंगी रंगाची चादर आणि अभ्रे चढवून झोपते वगैरे. असे का? यामागे, पिवळा रंग घेताना बाह्य घटनांनी आलेली प्रसन्नता, हिरवा रंग घेताना मनाची संपन्नतेची भावना, काळा रंग घेताना येणारी पूर्णत्वाची प्रचीती अशी एक ना अनेक कारणं असतात. हे बदल त्या त्या वेळी त्याच्या आयुष्यात चाललेल्या घटनांवर आधारित असतात.
हे झालं घटनांमुळे रंगनिवडीत होणारे बदल. याउलट, याचबरोबर समोर असलेले रंग आपल्या विचारांवर आणि मानसिकतेवर परिणाम घडवून आणू शकतात. जसे, अगदीच सोप्पे म्हणजे, काळोख्या रात्री मनाची घालमेल, भीती आहे, बंदिस्तपणा आहे; सकाळच्या उजेडात, सूर्यप्रकाशात नाही. सूर्यप्रकाश पहिला की आपोआप प्रसन्नता येते. रखरखत्या उन्हातून जाताना, निळ्याशार आकाशाखाली उभे असताना, हिरवीगार झाडी दिसली, सावलीचा काळोख दिसला, की अंतर्मनाला दिलासा मिळातो. सतत गडद रंगाच्या प्रतिमा पाहून झाल्यावर अचानक तेजस्वी (bright) रंगांचं चित्र पाहिलं तर? विविध पेस्टल शेड्स मनात आल्हाददायक भावना निर्माण करतात. चिडचिड होत असताना निसर्गचित्रातले मनोभावे उधळलेले रंग आणि आकार पाहून राग शांत व्हायला मदत होते.
हेही वाचा >>> डिझायनर ड्रेसचं महागडं बिल देतो तेव्हा…
एकूणच, रंग मानसिकतेवर परिणाम करतात आणि एखाद्याची मानसिकता काय आहे हेदेखील दर्शवतात. Colours Convey what Mind conceives! रंगांच्या या काही गोष्टी, गुणधर्म आणि परिणाम लक्षात आले तर आपण मनातल्या भावना ओळखून त्यावर उपाय अथवा बदल घडवून आणू शकतो. मंडल आर्ट बनवताना जेव्हा रंगांचा वापर होतो, बघताना रंगांसाठीचे निष्कर्ष निघतात तेव्हा ते आपल्या भावना प्रकट करत असतात. याच रंगांच्या संगतीत मानसिक स्वास्थ्य सुधारू लागतं. There is no Wrong and Right about any Colour. कलारूपी ‘मंडल’ काही तरी सांगतं, रंग बोलतात… आपण त्यांना ऐकायला शिकलं पाहिजे!