भारतीय संरक्षण विभागाच्या तिन्ही दलात आता पुरुषांप्रमाणेच महिलांनाही संधी देण्यात येत आहे. जात, पंथ, धर्म आणि लिंग यांमधील फरक विसरुन सगळ्यांना समा न संधी देण्याचे भारतीय सशस्त्र दलाचे उद्धिष्ट आहे. याच उद्धिष्टाला अनुसरुन भारतीय नौदलाच्या युद्धनौकेवर पहिल्यांदाचा एका महिला अधिकाऱ्याची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रेरणा देवस्थळी असे त्या महिला अधिकाऱ्याचे नाव आहे. आयएनएस त्रिंकट या भारतीय युद्धनौकेच्या नेतृत्वपदी नियुक्त करण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा – पाकिस्तानच्या ९० हजार सैन्याला नमवणाऱ्या सॅम माणेकशा यांच्या तीन पाठिराख्या; जाणून घ्या कामगिरी

प्रेरणा देवस्थळी सध्या युद्धनौका INS चेन्नईवर फर्स्ट लेफ्टनंट म्हणून कार्यरत आहेत. त्यांना वेस्टर्न फ्लीटचे कमांडर रिअर अॅडमिरल प्रवीण नायर यांच्याकडून नियुक्ती पत्र प्राप्त झाले आहे. भारतीय नौदलाची युद्धनौका ‘त्रिंकट’च्या कमांडिंग ऑफिसर म्हणून त्यांची निवड झाली आहे. या नियुक्तीनंतर प्रेरणा नौदलात एका युद्धनौकेचे नेतृत्व करणाऱ्या पहिल्या महिला अधिकारी बनल्या आहेत.

कोण आहे प्रेरणा देवस्थळी?

मूळची मुंबईच्या रहिवासी आहेत. त्यांच शालेय शिक्षण कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरीमध्ये झालं आहे. प्रेरणा यांनी सेंट झेवियर्स महाविद्यालयातून मानसशास्त्रात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली आहे. २००९ मध्ये त्या भारतीय नौदलात सामील झाल्या. प्रेरणा यांना लहापणापासून देशभक्तीचे धडे देण्यात आले . प्रेरणाचे भाऊही नौदलात सेवा बाजवात आहेत.

हेही वाचा- एकीकडे पतीचा मृतदेह दुसरीकडे पोस्टमॉर्टम, २२ हजार मृतदेहांचं पोस्टमॉर्टम करणाऱ्या मंजू देवीची कहाणी

प्रेरणा यांचे पतीही नौसेने अधिकारी पदावर कार्यरत आहेत.प्रेरणा यांना तीन वर्षाची मुलगी आहे. भारतीय नौदलाच्या युद्धनौकेच्या नेतृत्व पदावर पोहचण्यासाठी प्रेरणा यांना करावा लागलेला संघर्ष इतर महिलांसाठी त्यांच्या नावाप्रमाणेच प्रेरणादायी आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Commander prerna deosthalee to be first woman to command indian naval warship dpj
Show comments