“शुभदा, अगं घरात आहेस की नाही?” सीमाने शुभदाच्या घरात डोकावत तिला आवाज दिला. घराचं दार उघडं दिसत होतं, पण लाईट लावलेला नव्हता. सीमा तिच्या घरात गेली आणि दिव्याचं बटन ऑन केलं. शुभदा घरातच होती, पण सोफ्यावर हताश बसून होती. रडून रडून तिचे डोळे सुजलेले होते.

“शुभी, अगं काय झालं तुला? तब्येत बरी नाही का तुझी? अशी अंधारात का बसून राहिलीस?”

chaturang article
‘भय’भूती : भयातून अभयाकडे
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
attention deficit hyperactivity disorder
उनाड मुलेच नव्हे, तर प्रौढांमध्येही जगभर वाढतेय अतिचंचलता? काय आहे ADHD? लक्षणे कोणती? आव्हाने कोणती?
Victims of bulldozer action in UP welcome SC verdict
‘बुलडोझर’ निकालाचे उत्तर प्रदेशातील पीडितांकडून स्वागत; नुकसानभरपाईच्या मागणीसाठी न्यायालयात जाण्याचे संकेत
Congress, votes, Nayab Singh Saini, Nayab Singh Saini pune,
खोटी आश्वासने देऊन मतविभागणीचा काँग्रेसचा उद्योग, हरियाणाचे मुख्यमंत्री नायबसिंग सैनी यांचा आरोप
hya goshtila navach nahi 3
नितांतसुंदर दृश्यानुभूती
inconvenient to carry dead bodies due to no road at Alibagh Khawsa Wadi
रस्ता नसल्याने मृतदेह झोळी करून वाडीवर नेण्याची वेळ…
Fear Avoidant Personality Disorder Personality relationship Personality Loksatta Chaturang
स्वभाव, विभाव: भीती आणि न्यूनगंडाचा फास

“माझ्या आयुष्यातच अंधार झाला आहे सगळा, हा दिवा लावून तरी काय करू?”

सीमाने तिला जवळ घेतलं तेव्हा तर ती हमसाहमशी रडू लागली, तिचा आवेग थोडा ओसरल्यावर सीमाने तिला पाणी प्यायला दिलं, तिच्या पाठीवरून हात फिरवला आणि विचारलं, “सांगशील का मला, काय झालंय ते?”

“ सिमी, अगं माझी आयव्हीएफ पुन्हा फेल गेली. एवढी ट्रीटमेंट घेतली, इतका त्रास सहन केला, इतके पैसे खर्च केले, पण काहीही उपयोग झाला नाही, ही तिसरी वेळ होती, आतातरी काही आनंदाची बातमी हाती येईल, असं वाटलं होतं, पण ते सुख माझ्या नशिबी नाही असं दिसतंय. माझ्याच बाबतीत असं का घडतंय? आई होण्याचं सुख मला मिळणारच नाही का? माझ्या अपराधाची ही शिक्षा आहे का गं? मी तेव्हा तसं करायला नको होतं. सासूबाई, आई दोघीही मला कळवळून सांगत होत्या, पण मी त्यांचं ऐकलं नाही आणि आता त्याच क्षणाची मी आतुरतेनं वाट पाहत आहे. पण… अविनाशला ही बातमी समजल्यानंतर त्यालाही केवढं दुःख होणार आहे, मला कल्पना आहे. त्याला आणि घरच्या कुणालाच मी हे सुख देऊ शकत नाही” असं म्हणून शुभदा पुन्हा रडायला लागली.

हेही वाचा… आयुर्वेदाच्या स्मृतीतून: वात आणणारा वात

शुभदा आणि अविनाशचं लग्न झाल्यानंतर अगदी एक महिन्यातच तिची प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. अविनाशला तर खूप आनंद झाला. त्याची आई हे ऐकताच सुखावून गेली आणि नातवाची स्वप्नं बघायला लागली, पण शुभदाला लगेच मूल नको होतं. अविनाशनं, त्याच्या आईनं, शुभदाच्या आईनंही तिला समजावून सांगण्याचा खूप प्रयत्न केला, पण शुभदाची तेव्हा मानसिक तयारीच नव्हती. लग्न झाल्यावर लगेच वर्षांच्या आत मुलं ही संकल्पनाच तिच्या पचनी पडत नव्हती. शेवटी अविनाशने तिच्या मतांचा आणि निर्णयाचा आदर केला आणि आत्ता मूल नको असं ठरवलं. लग्नाला पाच वर्ष झाल्यानंतर आणि सर्व मित्र मैत्रिणींना मुलं झाल्यानंतर आपण आता आई व्हावं, असं तिला वाटायला लागलं, पण दोन वर्षं प्रयत्न करूनही कनसिव्ह होत नाही म्हटल्यावर दोघांनी पुढील उपचार सुरू केले. शुभदाने या सर्व ट्रेटमेंटसाठी आपली नोकरी सोडली आणि फ्रीलांसिंग सुरू केलं, पण यश येत नव्हतं, त्यामुळे ती खूपच निराश झाली होती. तिच्या मनातील अपराधाची भावना तिला अधिक त्रास देत होती. यावेळेस तिला आधाराची गरज आहे हे ओळखून सीमा तिच्याजवळच थांबली. तिच्यासाठी चहा करून आणला.

“ शुभदा घे, मी मस्त आल्याचा चहा आणि तुझ्या आवडीच्या कुकीज आणल्या आहेत, आपण दोघीही चहा घेऊ. तुलाही थोडी तरतरी येईल.”

शुभदा नाही म्हणत असतानाही सीमाने आग्रह करून तिला चहा घ्यायला सांगितला आणि हळूहळू तिचं मन मोकळं करून तिला काही गोष्टी समजून सांगायला सुरुवात केली.

हेही वाचा… ‘गेमिंग’च्या ‘पुरूषप्रधान’ क्षेत्रात आता स्त्रियाही पुढे! भारतातील तरूण गेमर्समध्ये ४० टक्के स्त्रिया

“शुभी, लग्न झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात तुझ्या प्रायोरिटीज वेगळ्या होत्या. तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात होती आणि त्यावेळी बाळाची जबाबदारी घेण्याची तुझी मानसिकता नव्हती आणि म्हणूनच तेव्हा बाळ नको असा निर्णय घेऊन तू अबॉर्शन केलंस. तेव्हा तसं घडलं म्हणून आताच्या उपचाराला यश येत नाही, हा विचार तुझ्या मनात येणं साहजिक असलं तरी आता ते अपराधाचं शल्य किती दिवस मनात बाळगणाऱ आहेस? त्या परिस्थितीत घेतलेला तो निर्णय होता आणि ज्या गोष्टी होऊन गेल्या, त्या आपण बदलूच शकत नाही, मग ते पुन्हा पुन्हा आठवून मनाला त्रास का करून घ्यायचा? तुझ्या त्या निर्णयामुळे आता बाळ होण्यात समस्या येत आहेत. त्यामुळे अविनाश आणि त्याच्या कुटुंबाला तू दुखी करते आहेस असं तुला वाटतंय. पण त्यात सर्वस्वी तुझा कोणताही दोष नाही आणि ते आपल्या हातात नाही हे सर्वांना माहिती आहे. मग हे सगळं तू स्वतःवर का ओढवून घेतेस?

तुझ्या पुढील वैद्यकीय उपचारासाठी डॉक्टर प्रयत्न करतीलच, पण तुझी मानसिक अवस्था चांगली ठेवणं हे तुझ्या हातात आहे, कोणताही प्रसंग आला तरी त्याला सामोरं जाण्याची आपली मानसिक क्षमता आपणच वाढवायची असते. मूल होणं म्हणजेच आयुष्याचं सार्थक आहे, तरच आपण जगण्याला लायक आहोत, असं तुला वाटतं, पण असे कितीतरी लोक आहेत, की प्रयत्न करूनही त्यांना मूल झालेलं नाही, पण ते त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात यशस्वी आहेत. तुला मूल झालंच नाही, तर तुला कोणीही दोष देणार नाही. हे तुलाही माहिती आहे. मग या गोष्टीचा स्वतःला का त्रास करून घेतेस? ‘आई’ होण्यासाठी स्वतःचच मुलं जन्माला घालायला हवं, अशीही आता परिस्थिती नाही, त्यासाठी वेगळे मार्गही आहेत. फक्त येणाऱ्या परिस्थितीला खंबीरपणे सामोरे जा, मग बघ प्रत्येक गोष्टीतील आनंद तुला घेता येईल.”

शुभदा शांतपणे ऐकत होती आणि मनातल्या मनात सर्व गोष्टींचा विचारही करत होती. कोणत्याही प्रसंगाला सामोरं जाण्यासाठी आपली मानसिक क्षमता वाढवायला हवी आणि स्वतःच्या मनाला छळणारं अपराधाचं शल्य मनातून काढून टाकण्यासाठी प्रयत्न करायला हवा, असं तिनं ठरवलं.

(लेखिका कुटुंब न्यायालयात समुपदेशक आहेत.)

(smitajoshi606@gmail.com)