गेले अडीच वर्ष सुरु असलेल्या करोना महामारीमुळे सर्वच बेजार झाले आहेत. त्यातच या आजारामुळे इतर अनेक आजार होण्याचा धोकाही अनेक पटींनी वाढला आहे. करोना होऊन गेलेल्या अनेक रुग्णांमध्ये अजूनही विविध लक्षणे पाहायला मिळत आहेत. यासंबंधी आता आणखी एक चिंताजनक बाब समोर आली आहे. करोनामुळे अनेक पौगंडावस्थेतील मुलींच्या मासिक पाळी येण्याच्या चक्राला धक्का बसला आहे. देशात अशी अनेक प्रकरणे आता समोर येऊ लागली आहेत. यामध्ये ५ वर्षांपासून ९ वर्षांच्या मुलींचा समावेश आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इंडिया टुडेच्या रिपोर्टनुसार, पेडियाट्रिक एंडोक्रिनोलॉजिस्ट डॉ मनप्रीत सेठी यांनी सांगितले, जेव्हा मुलींची पौडांगावस्थेतून तारुण्याकडे जाण्यास सुरुवात होते तेव्हा त्यांना मासिक पाळी येणे सामान्य असते. मात्र कमी वयातच मासिक पाळी येणे हे खूप घातक आहे. याचा मुलींच्या शरीरावर तसेच मनावर नकारात्मक प्रभाव पडू शकतो. यामुळे पालकांमध्येही मानसिक तणाव वाढू शकतो. डॉ. सेठी यांनी सांगितले की आधी अशी १० प्रकरणे पाहायला मिळायची, मात्र आता त्यांची संख्या वाढून ३० पर्यंत पोहोचली आहे. अवघ्या पाच वर्षांच्या मुलीलाही पाळी आल्याचे प्रकरण समोर आले आहे. दिल्लीत मुलींमध्ये लवकर यौवन येण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ दिसून आली आहे.

१० हजार नाही तर ‘इतकी’ पावले चालल्यावर कमी होतं वजन; तज्ज्ञांनी सांगितलेला आकडा पाहून तुम्हीही थक्क व्हाल

अशा समस्येशी लढा देणारा भारत हा एकमेव देश नाही. तुर्की, इटली, अमेरिका यांच्यासह इतर अनेक देशांमधील मुलीं अशा प्रकारच्या हार्मोनल असंतुलनाला बळी पडत आहेत. इटालियन जर्नल ऑफ पेडियाट्रिक्समध्ये प्रकाशित झालेल्या अहवालात असे सांगण्यात आले आहे की कोविड महामारीच्या काळात लॉकडाऊनमध्ये अशा प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे.

अगदी लहान वयातच आलेले यौवन हे रुग्णांसाठी तसेच त्यांच्या पालकांसाठीही क्लेशकारक परिस्थिती निर्माण करू शकते. यौवनामुळे हार्मोन्सची पातळी बदलते, त्यामुळे रुग्णाच्या भावनांवर त्याचा परिणाम होतो. कमी वयातील मुलींसाठी रक्त पाहणे अत्यंत क्लेशकारक असू शकते. या मुली मासिक पाळीचा कालावधी हाताळण्यासाठी पुरेशा परिपक्व नसतात. अशावेळी त्यांना त्यांच्या बदलत्या शरीराबद्दल आणि विरुद्ध लिंग यांच्याशी संवाद साधण्याच्या परिणामाची जाणीव करून देणे गरजेचे ठरते. अशा परिस्थितीत ‘चांगला स्पर्श’ आणि ‘वाईट स्पर्श’ यातील फरक शिकवण्यापेक्षा ‘नको असलेली गर्भधारणा’ याबद्दल मुलींना समजावणे हे पालकांबरोबरच बाल मानसशास्त्रज्ञ आणि समुपदेशकांसाठीही अतिशय कठीण ठरू शकते.

मानसिक धक्क्याबरोबरच अशा समस्येला सामोरे जाणाऱ्या लहान वयातील मुलींना अनेक शारीरिक परिणामांनाही सामोरे जावे लागते. यातीलच एक समस्या म्हणजे मुलींची कमी झालेली उंची. लहान मुले, विशेषत: मुलींची वाढ यौवनाच्या प्रारंभीच होते, परंतु मासिक पाळीनंतर त्यांची वाढ थांबते. त्याचबरोबर लवकर यौवन अनुभवणाऱ्या ३० टक्के मुलींमध्ये नंतर पीसीओडीची लक्षणे दिसून येतात. तसेच या मुलींना, उच्च इस्ट्रोजेन पातळीच्या वाढीव संपर्कामुळे अनुवांशिक पूर्वस्थिती किंवा कौटुंबिक इतिहास असल्यास स्तनाचा कर्करोग होण्याची शक्यता जास्त असते.

शतपावलीचा कंटाळा करणाऱ्यांनी एकदा ‘हे’ फायदे वाचाच; अनेक गंभीर आजारांवरही करता येईल मात

गेली अडीच वर्ष आपण करोनाशी लढा देत आहोत. करोनाच्या सुरुवातीला लॉकडाउनमुळे सर्वांनाच घरामध्ये कोंडून राहावे लागले होते. मुलांचीही शाळा बंद होत्या त्यामुळे त्यांनाही बैठे जीवन जगावे लागले. यामुळे त्यांच्या चयापचय (BMI) आणि वजनावर परिणाम झाला. मेंदू आपले वय वाचू शकत नाही. सोप्या शब्दात, शरीरातील सर्व संप्रेरक पातळी व्यवस्थापित करणारी पिट्यूटरी ग्रंथी, जेव्हा शरीर एका विशिष्ट वजनाच्या उंबरठ्यावर पोहोचते तेव्हा यौवन सुरू करते.

ही समस्या उद्भवण्याची आणखी एक कारण म्हणजे या काळात मुलांच्या स्क्रिन पाहण्याच्या वेळेत लक्षणीय वाढ झाली. क्लासेस ऑफलाइनवरून ऑनलाइन झाले, कंटाळलेल्या मुलांना स्मार्टफोन आणि टॅब्लेटच्या माध्यमातून स्वतःचे मनोरंजन करावे लागले, त्याचप्रमाणे शरीरातील मेलाटोनिनची पातळीदेखील कमी झाली. मेलाटोनिनची वाढलेली पातळी पिट्यूटरी ग्रंथीला चालना देते. आपल्या शरीराला हार्मोन्सचे अत्यंत नाजूक संतुलन राखावे लागते. अशावेळी कोणतीही तफावत शरीरासाठी घातक ठरू शकते.