केतकी जोशी
कोविडमुळे सगळ्यांच्याच आरोग्यावर खूप परिणाम झाला आहे. कित्येकांनी आपल्या जीवलगांना गमावलं तर अनेकजण मृत्युच्या दाढेतून परत आलेत. महिलांच्या आरोग्यावर तर याचे जास्त परिणाम दिसून येत आहेत. घर सांभाळणे, मुलांची जबाबदारी याबरोबरच नोकरी जाण्याची भीती या सगळ्या परिस्थितीमुळे महिलांच्या मानसिक ताणात वाढ झाल्याचं दिसून आलं आहे. या सगळ्या अतिरिक्त ताणामुळेच अनेक महिलांच्या मासिक पाळीच्या चक्रात बदल झाल्याचे एका नव्या अभ्यासातून पुढे आलं आहे. ‘वॉशिंग्टन पोस्ट’ मध्ये या अभ्यासाबद्दल सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

आणखी वाचा : आहारवेद : मासिक पाळीतील अतिरक्तस्रावावर उपयुक्त आवळा

Deputation in MPSC by circumventing the rules
नियम डावलून ‘एमपीएससी’मध्ये प्रतिनियुक्ती? माहिती अधिकार अर्जाला काय दिले उत्तर?
IND vs NZ AB de Villiers on Rishabh Pant Controversial Dismissal
IND vs NZ : ऋषभ पंतच्या वादग्रस्त विकेटवर…
woman in prison
स्त्री ‘वि’श्व : गजाआडच्या स्त्रियांचं जग
Maternity Benefit Act 1961, maternity benefits, working women,
गर्भधारणा लाभ कायदा हा नोकरीतील कंत्राटापेक्षा वरचढच!
woman dies after falling from local train Incident between ambernath badlapur station
लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू ; अंबरनाथ बदलापूर स्थानकादरम्यानची घटना
bombay high court allow muslim men to register multiple marriages
अधिक विवाहांची नोंदणी करण्याची मुस्लिम पुरुषांना मुभा; उच्च न्यायालयाचा निर्वाळा
ias shailbala martin question loudspeakers in temples
“मंदिरांवरील लाऊडस्पीकरमुळे ध्वनी प्रदुषण होतं, मग…” महिला IAS अधिकाऱ्याची पोस्ट चर्चेत!
Delhi Bus Viral Video Woman Threatened To Fire The Conductor From His Job Due To A Verbal Fight With Her shocking video
“ऐ तुझी नोकरी खाऊन टाकेन” कंडक्टरबरोबर भांडताना महिलेनं ओलांडली मर्यादा; VIDEO पाहून सांगा नेमकी चूक कोणाची?

युनिव्हर्सिटी ऑफ पिट्सबर्ग स्कूल ऑफ मेडिसिन इथल्या प्रा. मार्टिना अँटो- ओक्राह यांच्या नेतृत्वाखाली हा अभ्यास करण्यात आला. अतिरिक्त ताणामुळे काही महिलांची पाळी तारखेच्या आधीच येऊ लागली किंवा नेहमीच्या तारखेच्या खूप उशिरा आणि अनियमित येऊ लागल्याचं प्रस्तुत शोधनिबंधामध्ये म्हटलं आहे. काही स्त्रियांना आधीपेक्षा जास्त रक्तस्त्राव सुरु झाला तर काही महिलांचे पाळीचे दिवस कमी झाले. १८ ते ४५ वर्ष वयोगटांतील एकूण ३५४ स्त्रियांकडून यासाठी माहिती गोळा करण्यात आली. २०२१ च्या मे महिन्यात हे प्रश्न या महिलांना विचारण्यात आले. महासाथीच्या काळात त्यांना कितपत आणि कसा ताण जाणवत होता आणि मार्च २०२० ते मे २०२१ या काळात त्यांच्या मासिक पाळीच्या चक्रात काही बदल झाले का असे प्रश्न त्यांना विचारण्यात आले. त्यांनी दिलेल्या उत्तरांच्या आधारे ही माहिती गोळा करण्यात आली. प्रश्न विचारण्यात आलेल्या स्त्रियांपैकी निम्म्यापेक्षा जास्त तरुणी आणि महिलांनी मासिक पाळीचा कालावधी, पाळीचा काळ, पाळीदरम्यान होणारा रक्तस्त्राव किंवा स्पॉटिंग झाल्याचे सांगितले. तर पाळीशी संबंधित या चारही गोष्टींमध्ये बदल झाल्याचे १२ टक्के स्त्रियांनी सांगितले. कोविड महासाथीशी संबंधित प्रचंड ताण आणि मासिक पाळीच्या चक्रात झालेले बदल यांच्यात अगदी जवळचा संबध असल्याचे तज्ञांना आढळून आले.

आणखी वाचा : चॉइस तर आपलाच : मन चिंता करू लागलं तर?

या अभ्यासात वेगवेगळ्या भौगोलिक प्रदेशातील आणि विविध वंशांच्या स्त्रियांना प्रश्न विचारण्यात आले होते. महामारीच्या आधी या स्त्रियांनी कोणत्याही प्रकारच्या गर्भननिरोधक गोळ्या घेतल्या नव्हत्या किंवा त्यांचा मेनॉपॉजही सुरु नव्हता. कोरोनाच्या महासाथीमुळे महिलांच्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर परिणाम झाल्याचेच यावरुन स्पष्ट होते. ताणामुळे महिलांच्या पाळीच्या चक्रावर अनेक प्रकारे परिणाम होतो. स्ट्रेस हार्मोन कॉर्टिसोलचा महिलांच्या शरीरात असलेल्या इस्ट्रोजेन आणि प्रोजेस्टेरॉन या हार्मोन्सवर परिणाम होतो, असे मार्टिना अँटो- ओक्राह यांनी स्पष्ट केले. हे दोन्ही हार्मोन्स प्रजनन क्रियेशी संबंधित आहेत आणि ते मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम करतात. अत्यंत कमी पोषण, वजन वाढणे, वजन कमी होणे आणि कमी झोप या ताणाशी संबधित घटकांचाही महिलांच्या मासिक पाळीच्या चक्रावर परिणाम होतो.

आणखी वाचा : हम काले है तो क्या हुआ!

नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीमधील मेडिकल रिसर्च असिस्टंट प्रोफेसर निकोल सी. वोईटविच यांनाही सर्वेक्षणामधून अशाच गोष्टी आढळल्या आहेत. निकोल यांनी २०२० मध्ये महासाथीच्या काळातील ताण आणि मासिक पाळीतील बदल याबाबत ऑनलाईन सर्व्हे केला. सुमारे २१० स्त्रियांना त्यांनी ऑनलाईन प्रश्न विचारले. हा फक्त प्रातिनिधिक स्वरुपाचा होता, त्यात आढळून आलेल्या मुद्यांवरून कोणतेही निष्कर्ष काढता येत नाहीत. असं असलं तरीही कोविडमुळे महिलांच्या मासिक पाळीवर परिणाम झाला आहे हेच एक वर्षाच्या अंतराने करण्यात आलेल्या या दोन्ही अभ्यासांवरून स्पष्ट होतं असं निकोल यांचं म्हणणं आहे. या काळात कित्येक स्त्रियांनी घरून काम केलं. त्यांना नोकरीबरोबरच घर, मुलं सांभाळणं,ऑफिसचं काम करणं अशी प्रचंड कसरत करावी लागली. आजूबाजूला प्रचंड नकारात्मकता, भीती, नैराश्य असताना आपलं आणि आपल्या घरच्यांचं मनोबल टिकवणं, त्यांच्याबरोबरच स्वत:ची काळजी घेणं हे खूप ताणाचं होतं. या सगळ्याचा परिणाम म्हणजेच पाळीवर झालेला परिणाम. कोविडनंतर पाळीच्या बाबतीतल्या तक्रारी घेऊन येणाऱ्या महिलांची संख्या वाढल्याचं अनेक स्त्री रोग तज्ञांचंही निरीक्षण आहे. ताणाशिवाय थायरॉईड, हार्मोनल बदल, कॅन्सर, गर्भारपण किंवा एखादा आजार, कोविड संसर्ग या गोष्टींमुळेही पाळीच्या चक्रात बदल झाल्याचे स्पष्ट झाले. पण त्याकडे गांभीर्यानं वेळीच लक्ष देण्याची गरज आहे.

आणखी वाचा : Open Letter: अहो गृहमंत्री, लक्ष कुठे देणार? दीपिकाच्या कपड्यांकडे की हुंडाबळींच्या मोठ्या संख्येकडे?

कोविडच्या महासाथीमुळे आर्थिक परिस्थितीतही प्रचंड फरक पडला. अनेक स्त्रियांना नोकरी गमवावी लागली,आधी करत असलेलं काम सोडून जे मिळेल ते काम करावं लागलं. नवऱ्याची किंवा घरात कमावणाऱ्या एकुलत्या एका सदस्याची नोकरी गेली तर घरी राहणाऱ्या स्त्रियांना फार मोठा आर्थिक आणि मानसिक ताण सहन करावा लागला. वेळेआधीच मेनॉपॉज सुरु झाल्याचा अनुभवही काहीजणींना आला. स्वत:साठी अजिबात वेळ न मिळणे, सततची काळजी, चिंता यामुळे अनेकींचा ताण टोकाला पोहोचला होता. कोविड-१९ च्या संदर्भात केल्या गेलेल्या अनेक मोठमोठ्या अभ्यासांमध्ये पाळीच्या समस्येचा समावेशच करण्यात आला नव्हता असं इंटरनॅशनल जर्नल ऑफ एपिडेमॉलॉजीमधील नुकत्याच एका रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. कोविडमुळे निर्माण झालेल्या पाळीबद्दलच्या काही समस्या या अल्पकालीन आहेत तर काही मात्र अगदी खूप काळ परिणाम करणाऱ्या आहेत. पण वेळीच दखल घेतली नाही तर मात्र त्याचा स्त्रियांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम करणाऱ्या आहेत हे नक्की!