तन्मयी बेहेरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘श्रद्धा वालकर’ हत्या प्रकरण ताजं असताना आणखी एका खुनाच्या बातमीने मी व्यथीत झाले. एका आईने आपल्या १९ वर्षांच्या अंथरुणात खिळलेल्या गतिमंद मुलीचा खून केला आणि आश्चर्य म्हणजे शेजाऱ्यांचं म्हणणं होतं की एवढ्या प्रेमाने तिच्यामुलीची कोणीच काळजी तिच्याशिवाय कोणीच घेऊ शकणार नाही… असं काय झालं असेल की एका प्रेमळ आईला पोटच्या गोळ्याला मारून टाकावंस वाटलं असेल? हा प्रश्न आपल्याला मतिमंद मुलांच्या संगोपनाविषयीच्या गुंतागुंतीच्या विषयापाशी घेऊन जातो.

आणखी वाचा : ‘माझी स्पर्धक मीच’ – अभिनेत्री संयमी खेर

गतिमंद बाळाचा जन्म होतो त्याच क्षणापासून त्याच्या पालकांचं आयुष्य वेगळ्या अर्थाने बदलून जातं. आपलं बाळ चारचौघांसारखं प्रतिसाद देत नाही, चालत नाही, बोलत नाही हे कळतं तेव्हा त्यांना काय वाटत असेल? मन घट्ट करून अशा बाळाचं पालनपोषण करणं त्यांना किती अवघड गेलं असेल? तरी नेटाने त्याच्या हावभावांचा, हातवाऱ्यांचा किंवा खाणाखुणांचा अर्थ लावत त्यांनी बाळाला वाढवलं असेल. कधीतरी आपल्या मुलात सुधारणा होईल, या आशेने ते प्रत्येक दिवस जगत असतील. गतिमंद पाल्यांचं मानसिक वय शारीरिक वयासोबत वाढत नसल्याने आई वडिलांची जबाबदारी कधीच संपत नाही, उलट दिवसागणिक वाढतच जाते. या मुलांना सांभाळायला कोणी मिळतही नाही मग पालकांनाच नोकरी सोडून आपल्या मुलासोबत राहाव लागतं. स्पेशल स्कूल आणि उपचारांचा खर्चाचा भार आहेच, त्यासोबतच वयपरत्वे झेपत नसतानासुद्धा अविरत कष्ट करावे लागतात. सणसमारंभ, मित्रमैत्रिणी, मौजमजा सगळं बाजूला सारून स्वतःचा पूर्ण वेळ या मुलाला द्यावा लागतो. न कंटाळता, न चिडता अशी शुश्रूषा करण्यासाठी पराकोटीचा संयम लागतो.

आणखी वाचा : विवाह समुपदेशन: अस्वस्थ करणारं नवऱ्याचं ‘क्रॉस ड्रेसिंग’

त्यात जर ती मुलगी असेल तर ती जेव्हा वयात येते तेव्हा सामान्य मुलींना आई जे सांगते ते तिला सांगू शकत असेल का? शरीरात होणारे बदल, त्यातून होणारी मानसिक गुंतागुंत कशी समजावणार? मानसिक वय वाढत नसतं पण शरीराचं काय? ठराविक वयात मासिक पाळी यायची काही थांबत नाही. वेळच्या वेळी पॅड बदलणं, शरीराची आणि ‘त्या’ अवयवांची स्वच्छता राखणं त्यांना कसं जमणार. त्यांच्या या सर्व गोष्टी आईलाच कराव्याच लागणार. अशाच एका नाजूक परिस्थितीमध्ये तिची मुलगी होती. वय वर्ष १९, शरीर तारुण्याच्या उंबरठ्यावर पण बुद्धी शारीरिक बदलांना अनभिज्ञ. ‘त्या’ मुलीचे सगळेच शरीरधर्म आईने सांभाळले. ती वयात आल्यावर त्या एकाच खोलीच घर असलेल्या ठिकाणी घरात पुरुष माणसं असताना दरमहिन्याला तिच्या पाळीची सगळी दिव्य पार पाडावी लागत. मुल लहान असताना त्यांचं विवस्त्र असणं वेगळं आणि जाणतेपणी त्यांना त्या अवस्थेत इतर कुणासमोर जायला लागणं हे वेगळं. म्हणजे जाणत्या वयातल्या मुलाला अगदी आईसमोर आणि मुलीला वडिलांसमोर… हे सारं लाजिरवाणंच असतं. पण पर्यायच नसेल घराची जागाच अतिशय लहान असेल कर काय करणार ? शिवाय आई किती काळ पुरणार अशी? या अवघड परिस्थितीमुळे तिला विनयभंगाला सामोरे जावे लागेल का, अशा एक ना अनेक प्रश्नांनी हैराण झालेल्या आईआईचा संयम सुटला असेल का? अशा मुलींच्या पालकांना भेडसावणारा आणखी एक गंभीर प्रश्न म्हणजे माझ्यानंतर माझ्या मुलीचं कोण करणार? अशा संभ्रमित करणाऱ्या अवस्थेत तिने हे टोकाचं पाऊल उचललं असेल का? नाहीतर हाल बघवत नसले तरी स्वतःच्या लेकराला ठार करावं असा अघोरी विचार कोणत्या आईच्या मनात येईल? अशा आई आणि मुलांसाठी आपला समाज केव्हा विचार करणार?

आणखी वाचा : ‘त्या’ ठिकाणचे केस काढण्यापूर्वी हे वाचा!

खाऊनपिऊन सुखी असलेल्या घरांमध्ये या अशा कुटुंबांचा आणि व्यक्तींचा विचार फारसा केला जात नाही. खरे तर हे सारे आपल्याच समाजाचा एक भाग आहेत. अभ्यासातून असे लक्षात येते की, त्यांचा सांभाळ करणाऱ्या संस्था समाजामध्ये आहेत. पण तेवढ्याने भागणार नाही तर त्यांना योग्य त्या समुपदेशनाची गरज आहे. अशा प्रकारे काम करणारी एक संस्था पुण्यात कार्यरत होती. मात्र पुरेशा निधीअभावी त्यांना गाशा गुंडाळावा लागला. या संस्थेच्या वतीने वयात येणारी मुले, त्यांचे पालक यांच्या समुपदेशनाची सत्रे आयोजित केली जात. त्यांना केवळ सल्ला नव्हे तर प्रशिक्षण, मदत यांचाही यात समावेश होता. वयात येणाऱ्या या विशेष मुलांच्या लैंगिक समस्यांची हाताळणी कशी करायला हवी, त्याचे प्रशिक्षण महत्त्वाचे असते. अन्यथा ही मुलेदेखील प्रसंगी हिंसक होतात आणि वेगळ्याच समस्यांना त्या मुलांसह पालकांनाही सामोरे जावे लागते. हे टाळण्यासाठी अशा प्रकारच्या काम करणाऱ्या संस्थांची गरज आहे. समाजस्वास्थ्य त्यावरही अवलंबून आहे.

मराठीतील सर्व चतुरा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Crime what she must have thought before killing her own daughter special child vp
Show comments