भारतात श्रीमंत पुरुष, श्रीमंत उद्योजक यांच्या याद्या जाहीर होतात. तसेच भारतातील श्रीमंत महिलांची यादी जाहीर झाली. या यादीमध्ये दक्षिण भारतातील एका महिलेने उच्च स्थान पटकावले आहे. ही महिला एका प्रथितयश शास्त्रज्ञाची मुलगी आहे. तिची संपत्ती २८,१८० कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे. तिच्या कंपनीची उलाढाल १ लाख कोटी रुपयांहून अधिक आहे. जाणून घ्या कोण आहे ही महिला आणि तिचा प्रवास…

राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर जशी सर्वात श्रीमंत पुरुषांची यादी प्रकाशित होते, तशी श्रीमंत महिलांचीही यादी प्रकाशित होते. यामध्ये फाल्गुनी नायर, इशा अंबानी यांचाही समावेश आहे. यामध्ये या वर्षी दक्षिण भारतातील एका महिलेने क्रमांक पटकावला आहे. नीलिमा प्रसाद दीवी असं तिचं नाव आहे. रसायनशास्त्रातील जगदविख्यात शास्त्रज्ञ मुरलीकृष्ण प्रसाद दीवी यांची ती कन्या आहे. मार्च २०२३ पर्यंत तिची संपत्ती २८,१८० कोटी रुपयांपेक्षा अधिक होती. आर्थिक गुंतवणूक क्षेत्रांमध्ये नीलिमा दीवी कार्यरत आहेत.

Deepti Sharma : दीप्ती शर्माने झुलन-नीतू सारख्या दिग्गजांना मागे टाकत घडवला इतिहास, ‘हा’ पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय
Pune city Shiv Sena uddhav thackeray eknath shinde
शिवसेनेला पुणेकरांचा ‘जय महाराष्ट्र’?
Aditi Tatkare, Ladki Bahin Yojana, Ladki Bahin Yojana Fund, Fund Issue, Aditi Tatkare Pune,
लाडक्या बहीण योजनेसाठी इतर कोणत्याही विभागाचा निधी वळविण्यात आलेला नाही – मंत्री आदिती तटकरे
Govinda father in law refused to attend his wedding with Sunita Ahuja
“माझे आजोबा श्रीमंत, तर वडील…”, गोविंदाच्या लेकीचं वक्तव्य; म्हणाली, “माझी आई शॉर्ट्स घालायची…”
Manmohan Singh launched the Technology Mission on Citrus for orange growers in Vidarbha
डॉ.मनमोहन सिंग, नागपूरची संत्री आणि ‘मिशन सिट्रस’
77 lakh fraud by cyber thieves, lure of investment ,
पुणे : गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांकडून ७७ लाखांची फसवणूक
Changes in gold prices What are today gold rates
सोन्याच्या दरात मोठे बदल… हे आहेत आजचे दर…
Statement of Shailesh Lodha of Taarak Mehta Ka Ooltah Chashma fame about life Pune print news
तारक मेहता का उल्टा चष्मा फेम शैलेश लोढा म्हणाले, आयुष्य म्हणजे…

हेही वाचा : गणपतीला बाप्पा का म्हणतात ? काय आहे ‘बाप्पा’ शब्दामागील कथा…

कोण आहेत नीलिमा दीवी ?

नीलिमा दीवी मूळ भारतीय आहेत. त्यांचा जन्म हैदराबाद येथे झाला. त्यांचे वडील हे रसायनशास्त्रातील शास्त्रज्ञ आहेत. नीलिमा यांनी गीतम इन्स्टिट्यूट ऑफ फॉरेन ट्रेड महाविद्यालयात शिक्षण घेतले, तसेच अमेरिकेमधील ग्लासगो विद्यापीठातून आंतरराष्ट्रीय वित्त विषयात पदव्युत्तर पदवी प्राप्त केली.गुंतवणूक, कॉर्पोरेट फायनान्स आणि मटेरियल सोर्सिंग असे विविध आर्थिक बाबीत्या सांभाळतात. कोविड काळात अर्थव्यवस्था खालावली असताना २०२१ मध्ये नीलिमा यांच्या संपत्तीत ५१ टक्क्यांची वाढ झाली, असा दावा फायनान्शियल एक्सप्रेसने केला आहे. २०२० मध्ये कोटक वेल्थने जाहीर केलेल्या अहवालानुसार, नीलिमा या १०० श्रीमंत महिलांमधील चौथ्या क्रमांकावर होत्या.

मुरलीकृष्ण प्रसाद दीवी यांच्या तीन फार्मास्युटिकल कंपनी असून दीवी’स लॅब्स ही एक कंपनी आहे. या लॅब्जचे बाजार भांडवल सुमारे एक हजार अब्ज आहे. या प्रयोगशाळांमधून काही बिलियन डॉलर्सची निर्यात करण्यात येते. या लॅबमध्ये नीलिमा यांचा २०.३४ टक्के हिस्सा आहे. त्यांची एकूण संपत्ती ६.४ अब्ज डॉलर्स आहे. मुरलीकृष्ण हे एका सामान्य कुटुंबामधून येऊन त्यांनी विविध उद्योग व्यवसाय निर्माण केले. फोर्ब्ज इंडियाच्या मतानुसार, १० हजार मासिक कमाईतून मुरलीकृष्ण यांनी शिक्षण पूर्ण केले. १९७६ मध्ये ते अमेरिकेमध्ये जाऊन फार्मासिस्ट म्हणून काम करू लागले. प्रयत्न आणि जिद्दीच्या जोरावर त्यांनी लॅब्ज उभारून आर्थिक परिस्थिती सुधारली.
नीलिमा यांनी आर्थिक क्षेत्रातील गुंतवणूक, गुंतवणूकदारांचे संबंध, कॉर्पोरेट क्षेत्राशी निगडित आर्थिक व्यवहार यामध्ये त्यांनी आपले कार्य केले. आज त्या विविध कंपन्या सांभाळत असून त्यांची आर्थिक उलाढाल साधारण १ लाख कोटी आहे.

Story img Loader