राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस कोणत्या ना कोणत्या कारणाने सोशल मीडियावर चर्चेत असतातच. त्यातही त्या सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत. त्या सोशल मीडियावर फोटो, व्हिडीओ शेअर करत असतात. त्यांनी कोणतेही फोटो पोस्ट केले की, त्यावर कमेंट्सचा पाऊस पडतो. त्या कमेंट्स नीट पाहिल्या की नकारात्मक कमेंटसचं प्रमाण जरा जास्तच असतं.

गेल्या आठवड्यात त्यांनी जागतिक कन्या दिनानिमित्त एक पोस्ट केली. त्यात त्यांनी लेक दिविजाबरोबरचे काही फोटो पोस्ट केले. या फोटोत त्यांनी व त्यांच्या लेकीने ट्विनिंग करणारा शॉर्ट वनपीस ड्रेस घातला होता. त्यांनी शेअर केलेले हे फोटो व्हायरल झाले आणि त्यांच्या या फोटोंवर कमेंट्सचा जणू पाऊसच पडला. पण त्यातल्या बहुतांशी कमेंट्स या प्रचंड नकारात्मक, टीका करणाऱ्या आणि ट्रोल करणाऱ्या होत्या. त्या कमेंट्स पाहून फारच वाईट वाटलं आणि कमेंट्स करणाऱ्यांच्या बुद्धीची कीव आली.

maharashtra winter updates
स्वेटर, शॉल शोधलीत का…? कारण, उद्यापासून हुडहुडी…
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
amar upadhayay mihir virani
पांढऱ्या साड्या नेसून आलेल्या महिलांनी घराबाहेर घातला होता गोंधळ; अभिनेता खुलासा करीत म्हणाला, “माझ्या आईला…”
Lucknow NGO helps underprivileged children make Sabyasachi-inspired clothes; the designer reacts
झोपडपट्टीतील मुला-मुलींनी तयार केला सब्यसाची-प्रेरित ब्रायडल कलेक्शन! स्वत:च मॉडेलिंग करत केले हटके फोटोशूट, पाहा Video Viral
woman voters chatura article
तू मात्र या फुकट योजनांच्या अमिषाला बळी पडू नकोस…
Sarpanch husband caught cheating on his wife with girlfriend wife beats girlfriend video viral mp
आधी ड्रेस खेचला मग बुक्क्यांनी मारलं! सरपंच पतीला गर्लफ्रेंडबरोबर पाहून पत्नीने घातला राडा, VIDEO मध्ये पाहा नेमकं काय घडलं
A fan asked Aishwarya Narkar for dinner, the actress gave funny answer
एका चाहत्याने ऐश्वर्या नारकरांना विचारलं डिनरसाठी, अभिनेत्रीने दिलं जबरदस्त उत्तर; म्हणाल्या…

अमृतांच्या या फोटोंवरील कमेंट्समध्ये ट्रोलर्सनी त्यांच्यावर तर टीका केलीच पण उपमुख्यमंत्र्यांनाही बरंच काही सुनावलं. पण कमेंट्स करणाऱ्यांनो अमृता फडणवीसांनी कोणते कपडे घालावेत, हे ठरवणारे तुम्ही कोण आहात? त्या उपमुख्यमंत्र्यांच्या पत्नी आहेत, त्यामुळे त्यांनी वनपीस, जीन्स किंवा पाश्चात्य कपडे घालू नयेत, त्यांनी फक्त साडीच नेसावी किंवा पंजाबी ड्रेसच घालावा असा नियम कुठे आहे? काहींनी कमेंट्स करून मिसेस उपमुख्यमंत्र्यांना संस्कृती आणि सनातन व हिंदू धर्माची आठवण करून दिली, पण बाईने कोणते कपडे घालावेत, असं सनातन वा हिंदू धर्मात कुठे लिहिलंय. ज्या धर्म आणि संस्कृतीचे तुम्ही दाखले देत तुमच्या अकलेचं कमेंट बॉक्समध्ये प्रदर्शन करताय, त्या धर्मात, संस्कृतीत बाईचा अपमान करावा, सार्वजनिकरित्या तुम्हाला वाट्टेल ते तिला बोलावं, असं लिहिलंय का? तुमची संस्कृती आणि धर्म तुम्हाला हेच शिकवतो का? कमेंट करताना तुम्हाला संस्कृती आणि धर्माचा विसर पडतो का?

amruta fadnavis one-piece dress
अमृता फडणवीसांच्या पोस्टवरील कमेंट्स
amruta fadnavis 1
अमृता फडणवीसांच्या पोस्टवरील कमेंट्स
amruta fadnavis 2
अमृता फडणवीसांच्या पोस्टवरील कमेंट्स

अमृता फडणवीसांनी कोणत्या प्रकारचे कपडे घालावे, हे ठरवण्याचा अधिकार त्यांचे पती देवेंद्र फडणवीस यांनाही नाही, मग तुम्ही कोण आहात कमेंट्समध्ये फुकटचे सल्ले देणारे? बरं तुमचा सल्ला वाचला जातोय का? याचा तरी किमान विचार करा. काही दिवसांपूर्वी एका कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस आले होते, तेव्हा त्यांनी अमृतांच्या बेधडक वागण्याबद्दल त्यांचं मत मांडलं होतं. “तिची अनेक मतं मला पटत नाहीत. तिच्या अनेक कृतीदेखील मला पटत नाहीत. पण तो तिचा अधिकार आहे. जर तिला इतकं बेधडक वागायचं असेल तर हा त्रास सहन करावा लागेल. कारण आपल्याकडे अजूनही आपण कितीही पुढारलेलं असं म्हटलं तरी महिलांनी इतकी मोकळी मतं मांडणं हे पटत नाही. मी निश्चितपणे सांगतो की तिची मतं मला पटत नाहीत. पण ती मतं मांडण्याचा तिला अधिकार आहे. तो मी कधीही हिरावून घेणार नाही”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

हातात स्मार्टफोन आहे, त्यात इंटरनेट आहे आणि बराच फावला वेळ आहे, त्यामुळे उठसूट दुसऱ्यांना ट्रोल करणाऱ्यांनो स्वतः काय करताय, हेही एकदा पाहा. म्हणजे तुमची मानसिकता किती संकुचित आणि घाणेरडी आहे हे तुम्हाला कळेल. दुसऱ्यांना कमेंट बॉक्समध्ये संस्कार शिकवणाऱ्यांनो, तुम्हाला जर तुमच्या पालकांनी थोडे संस्कार दिले असते ना तर तुम्ही मनाची नाही पण निदान जनाची लाज बाळगून तरी अशा घाणेरड्या कमेंट्स केल्या नसत्या. तुमच्याही घरात आई, बहिणी, वहिनी, आत्या, मावशी अशा कोणत्या तरी नात्यातल्या स्त्रिया असतीलच, त्यांच्या फोटोंवर कुणीतरी अशा कमेंट्स केल्यावर तुम्हाला कितपत रुचलं असतं हाही विचार करा. स्वतःच्या अकलेचं सार्वजनिकरित्या प्रदर्शन करण्यापूर्वी जे करताय ते कितपत योग्य आहे याचा एकदा तरी विचार नक्कीच करा. शेवटी इतकंच सांगेन ‘नजरिया बदलो, सोच बदलेगी’!