शतावरीचासुद्धा भाजी म्हणून उपयोग होतो . शतावरीचे अनेक प्रकार आहेत. शतावरीच्या गच्च हिरव्या रंगामुळे आणि तिच्या पानांच्या विविध आकार- प्रकारामुळे ही शोभेसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात लावली जाते. नेमकी खाण्यायोग्य शतावरी ओळखून जर हिचा भाजी म्हणून उपयोग केला तर तिच्यातील सगळे औषधी गुणधर्म मिळवता येतात. बांबू प्रमाणेच पावसाळ्यात शतावरीच्या जमिनीतून वर आलेल्या कोंबांचा वापर केला जातो. हे कोंब फार नाजूक असतात. या कोवळ्या कोंबांचे सूप फार छान होते.

अनवट चवीच्या अगदी सहज उपलब्ध न होणाऱ्या, पण पौष्टिक अशा आणखी काही भाज्यांची ओळख आजच्या लेखात करून घेऊ या. यातील पहिली भाजी आहे ती बांबूच्या कोवळ्या कोंबांची. बांबू हे खरं तर एक गवत. या बांबूच्या किंवा कळकीच्या बेटात पाऊस काळात जर चक्कर मारली तर बांबूच्या तळाकडे सुरेख कोवळे कोंब उगवलेले दिसतात. हे कोंब सोलून घेऊन यांच्या आतल्या मऊ गराचे बारीक काप करून त्याची भाजी करतात. अतिशय पौष्टिक अशी ही भाजी पावसाळ्यात जरूर खावी. जरा शोध घेतला तर भाजी बाजारात हे कोंब मिळतात.

Use wet socks to reduce fever in children
लहान मुलांचा ताप कमी करण्यासाठी ओले सॉक्स वापरावे? जाणून घ्या तज्ज्ञांचा सल्ला..
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Advanced Artificial Intelligence Techniques for Flood Forecasting
कुतूहल : पुराच्या अंदाजासाठी कृत्रिम बुद्धिमत्ता
Driving a scooty in the wrong way
चुकीच्या पद्धतीने स्कुटी चालवल्याने उद्भवतील अनेक समस्या; ‘या’ टिप्स करतील मदत
drinking hot lemon water in a copper pot
तांब्याच्या भांड्यात गरम लिंबू पाणी प्यायल्याने विषबाधा होऊ शकते? तज्ज्ञांनी मांडले मत..
Rishi panchami rushichi bhaaji ganeshotsav 2024 ganpati special recipes in marathi
Rishi Panchami: ‘ऋषीची भाजी’ कशी बनवायची? जाणून घ्या बनवण्याची योग्य पद्धत
increasing weight, health special, health,
health special : वाढत्या वजनाने मानसिकतेवर कसा परिणाम होतो?
These simple tips will help you keep your bike
पावसाळ्याच्या दिवसात बाईक स्वच्छ ठेवण्यासाठी ‘या’ सोप्या टिप्स करतील मदत

पूर्वी ठाण्याच्या शिवाप्रसाद हॉटेलमध्ये अस्परागस बांबू शूट सूप मिळत असे. अस्परागस म्हणजे शतावरी त्यात बांबूचे कोवळे तुकडे घालून केलेलं हे सूप चवीला उत्तम असे. आता मात्र ते त्यांच्या मेनूकार्ड वरून गायब झालंय. शतावरी मुळात औषधी, तिच्यासोबत कोवळा बांबू. एक वेगळीच चव होती त्या सूपची.

हेही वाचा : Sexual Violence : “जोडीदाराकडूनच महिलांवर सर्वाधिक लैंगिक हिंसाचार”, जागतिक स्तरावरील गंभीर स्थिती उजेडात!

बांबूची भाजी जरी चविष्ट असली तरी तिचे सोपस्कार बरेच आहेत. कोवळा बांबू सोलून, चिरून तो आठ- दहा तास पाण्यात भिजवून त्याचा उग्रपणा कमी करावा लागतो. त्यामुळे ही भाजी करताना आधी नियोजन महत्त्वाचे. बांबूचे कोंब बारीक चकत्या करून मिठाच्या पाण्यात घालून वर्षभरासाठी साठवूनही ठेवता येतात. ज्याचा वापर मग कधीही सूप किंवा लोणचे करण्यासाठी करता येतो. शतावरीचासुद्धा भाजी म्हणून उपयोग होतो .शतावरीचे अनेक प्रकार आहेत. शतावरीच्या गच्च हिरव्या रंगामुळे आणि तिच्या पानांच्या विविध आकार- प्रकारामुळे ही शोभेसाठीसुद्धा मोठ्या प्रमाणात लावली जाते. नेमकी खाण्यायोग्य शतावरी ओळखून जर हिचा भाजी म्हणून उपयोग केला तर तिच्यातील सगळे औषधी गुणधर्म मिळवता येतात. बांबू प्रमाणेच पावसाळ्यात शतावरीच्या जमिनीतून वर आलेल्या कोंबांचा वापर केला जातो. हे कोंब फार नाजूक असतात. या कोवळ्या कोंबांचे सूप फार छान होते.

राजगिऱ्याचे लाडू आपण उपवासाला हमखास खातो, पण राजगिऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी फार उत्तम होते. हिरवट, लालसर पानांचा राजगिरा या दिवसांत बाजारातही सहज उपलब्ध होतो. नेहमीच्या पालेभाजी सारखीच याची भाजी करतात. याची चव खरंच छान असते. नळीची भाजी म्हणून मिळणारी भाजी देखील आवर्जून खावी अशी. घोळासारखीच, पाणथळ किंवा ओलसर जमिनीवर पसरून वाढणारी अशी ही भाजी महाराष्ट्र आणि गुजरातमध्ये भरपूर मिळते. खरं तर हिचा वेल आपण बघितलेला असतो. अगदी रेल्वे रुळांलगतच्या भिंतीवर किंवा रस्त्याकडेला दुर्लक्षित जागी, रानात झाडांवर चढलेले असे हिचे वेल पसरलेले असतात. हिला सुंदर नरसाळ्याच्या आकाराची जांभळट रंगाची फुले येतात. सर्वत्र तण म्हणून वाढणारी अशी ही वनस्पती आहे, म्हणून हिला हिंदीमध्ये चक्क बेशरम असंच नाव आहे.

हेही वाचा : Women Six Pack Abs : महिलांनाही सिक्स पॅक्स ॲब्सची क्रेझ, पण आरोग्याच्या दृष्टीने अशी शरीरयष्टी घातक की फायदेशीर? तज्ज्ञ म्हणाले…

आयपोमिया असं इंग्रजी नाव मिरवणारी, वर्षभर तजेलदार असणारी ही वेल पावसाळ्यात छान बहरते. हिचे कोवळे कोंब निवडून त्याची भाजी करतात. ही इतकी परिचित वनस्पती आहे की हिचा भाजी म्हणून उपयोग होतो हेच फारसं माहीत नसतं. सेंद्रिय पद्धतीने शेती करताना पाच प्रकारच्या पानांचा रस वापरला जातो त्यात या आयपोमियाचा ही समावेश असतो. इंग्रजीत मॉर्निंग ग्लोरी या नावाने ती ओळखली जाते. मॉर्निंग ग्लोरीच्या अनेक व्हरायटी शोभेसाठी वापरल्या जातात. दुबईतील मिरॅकल गार्डन तर पूर्णपणे या मॉर्निंग ग्लोरीनेच सजलेली असते. हिचे लतामंडप, त्यावरील कोवळे कोंब, नाजूक फुले यांचं सौंदर्य वर्णनातीत आहे. पण भाजी म्हणून हिचा उपयोग करताना मात्र थोडं पारखून घेणं आवश्यक आहे. या सगळ्या भाज्यांची मी माहिती देतेय खरी, पण तुम्हाला नक्की प्रश्न पडेल की आम्हाला या भाज्या मिळायच्या कशा?

कोकणात, गावात रहाणाऱ्यांना या सहज मिळू शकतील, पण शहरी वस्तीमध्ये रहाणाऱ्यांनासुद्धा थोडा शोध घेतला तर खास पावसाळ्यात रानभाज्या विकणाऱ्याकडे या मिळू शकतील. आजकाल ॲग्रो टुरिझम विकसित होत आहे. अशा ठिकाणी जाऊन यांसारख्याच अनेक भाज्यांची चव आपण चाखू शकतो. थोडी अधिक माहिती घेऊ शकतो. महत्त्वाचं म्हणजे यांना ओळखायचं कसं ते शिकू शकतो.

हेही वाचा : समुपदेशन : सतत भांडणं होतात?

वनस्पती शास्त्राचा अभ्यास करताना दर रविवारी न चुकता आम्ही आमच्या प्राध्यापकांबरोबर फिल्ड ट्रीपला जात असू. तिथे आम्हाला इतक्या विविध वनस्पतींची ओळख व्हायची की हे निसर्ग वैभव बघून अचंबित व्हायला होई. वर्गात बसून वनस्पतींची कुळं, फ्लोरल फॉर्मुले, अवघड नावं पाठ करत बसण्यापेक्षा अशी एखादी पावसाळी सहल आमचं काम सहज सोपं करत असे. प्रत्यक्ष बघून, अनुभवून मिळालेलं ज्ञान हे दिर्घकाळ लक्षात राहणारं असतं म्हणूनच असेल कदाचित आजही ते सर्व जसंच्या तसं मनात कोरलेलं आहे. चवीचं वैविध्य चाखून बघण्यासाठी तुम्ही ही आवर्जून अशा भाज्या ओळखायला शिका त्यांचा वापर करून बघा. खूप आनंद आहे या सगळ्यात.

mythreye.kjkelkar@gmail.com