डॉ. स्वाती हजारे
स्तनदुधाच्या अवस्था म्हणजे काय, तर प्रसूती झाल्यापासूनच्या दिवसांनुसार त्यात होणारे बदल. जसे दुधाचे प्रमाण वाढणे, त्याच्या घट्टपणामध्ये बदल होणे, तसेच त्यातील घटकांचे प्रमाण कमी-जास्त होत जाणे. जितके आठवडे गर्भधारणेनंतर प्रसूती झाली, त्यानुसारही आईच्या दुधाच्या गुणधर्मात फरक असतो. ज्यांची प्रसूती पूर्ण दिवस (४० आठवड्यांची) भरल्यानंतर झाली आहे, अशा आईच्या दुधाच्या तुलनेत गर्भधारणेनंतर कमी आठवड्यांत प्रसूती झाली असेल तर (म्हणजे Preterm- ३७ आठवड्यांपेक्षा कमी) अशा आईच्या दुधामधील काही घटक (प्रथिने, स्निग्ध पदार्थ आणि इतर) हे अधिक असतात.
आणखी वाचा : माधुरी दीक्षित म्हणते… घर, करिअर आणि मातृत्त्व… संतुलन सांभाळणं शक्य!
गर्भधारणेच्या १६ व्या आठवड्यांपासून दूध तयार होण्यास सुरूवात होते. हे दूध स्तनामध्ये असलेल्या छोट्या छोट्या अशा अनेक पिशव्यांमध्ये साठवले जाते. या दुधाला ‘कोलोस्ट्रम’ (Colostrum) असे संबोधले जाते. प्रसूती झाल्यावर वार (Placenta) बाहेर पडल्यानंतर हे कोलोस्ट्रम स्तनांमधून स्त्रवण्यास सुरुवात होते. तसेच हळूहळू जसे जसे बाळ स्तनांवर ओढण्यास सुरुवात करते, तसे तसे त्याचे प्रमाण वाढू लागते. हे दूध घट्ट आणि चिकट असते. त्याचे प्रमाणही कमी असते, परंतु ते बाळाच्या आवश्यकतेनुसार असते. यामध्ये अत्यंत महत्त्वाचे घटक एकवटलेले असल्याने त्याचा प्रत्येक थेंब बाळासाठी महत्त्वाचा असतो. जो बाळाच्या वाढीबरोबर त्याचे संरक्षणही करत असतो.
आणखी वाचा : तान्ह्या बाळाच्या शारीरिक वाढीसाठी किती दूध आवश्यक असते? कसे ओळखावे?
दूधाचे प्रमाण- पहिल्या दिवशी- २ ते १० मि.लि.
दुसऱ्या दिवशी- ५ ते १५ मि.लि.
तिसऱ्या दिवशी- १५ ते ३० मि.लि.
चौथ्या दिवशी- ३० ते ६० मि.लि.
असे वाढत जाते. नंतर ते साधारणत: आठ दिवसानंतर ७५० ते १००० मिली प्रतिदिन, असे सहा महिने राहाते.
‘कोलोस्ट्रम’ हे पहिले ४ ते ५ दिवस येते. यामध्ये मुबलक प्रमाणात प्रथिने, स्नेह (स्निग्धांश), पांढऱ्या पेशी (White Blood Cells), प्रतिजीविके (Immunoglobulines), मिनरल्स- सोडियम क्लोराईड, झिंक, लोह, इ. असतात.
आणखी वाचा : वजन कमी करण्यात स्त्रियांना पुरुषांपेक्षा अधिक अडचणी का?
विशेष करून प्रतिजीविकांमध्ये- SIgA हा प्रकार फक्त आईच्या दुधातच सापडतो. हे SIgA अत्यंत महत्त्वाची भूमिका पार पाडतात. ते बाळाच्या आतड्यांना आतून आवरण तयार करतात, ज्यामुळे विषाणू किंवा जीवाणू आत प्रवेश करण्यास अटकाव केला जातो.
४-५ दिवसानंतर मातेचे दूध पातळ होऊ लागते. त्याला Transitional Milk असे म्हटले जाते. ही संमिश्रित अवस्था आहे, ती पुढे ४-५ दिवस राहाते. त्यात दुधाच्या पातळपणाबरोबर त्याचे प्रमाणही वाढते. प्रसूतीनंतर आठवड्याभरात दुधाची परिपक्व अवस्था- म्हणजे Mature Milk सुरू होते. ही दुधाची अवस्था पुढे जितकी वर्षे (अंदाजे अडीच वर्षे) मूल अंगावर पीत आहे, तोवर चालते. आता शेवटची, म्हणजे जेव्हा मूल दूध पिण्याचे बऱ्यापैकी बंद करू लागते ती अवस्था. त्यातही आईच्या दुधात पुन्हा बदल होण्यास सुरुवात होते.
आणखी वाचा : स्तनपानाचे फायदे आई आणि बाळालाही!
हे सर्व बदल बाळाच्या अवस्थेनुसार म्हणजे बाळाच्या वयानुसार निसर्गाने ठरवले असून ते त्या त्या अवस्थेतील बाळाच्या वाढीच्या दृष्टीने अत्यंत पूरक असतात. कारण बाळाच्या पहिल्या महिन्यानंतर पुढील (२ ते ६ महिने) हा काळ, पुढील १ वर्ष आणि त्यानंतरचा काळ (२ वर्षे वय) शारीरिक वृद्धीसाठी आवश्यक घटक वेगवेगळे असतात. वयाचे ६ महिने पूर्ण झाल्यावर बाळाला वरचा आहारही सुरू केला जातो. परंतु हा आहार नंतर बाळाच्या सर्व गरजा भागवतो असे नाही. तर आईचे दूध आणि त्याबरोबर हा आहार हे दोन्ही मिळून बाळाचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यास मदत करते.
drswatihajare@gmail.com