सोशल मीडियाच्या या विशाल जगामध्ये सोशल मीडिया मार्केटिंग विशेषज्ञ सहेली चॅटर्जी हे नाव सर्वांमध्ये उठून दिसणारे आहे. तिने या क्षेत्रात केवळ स्वतःसाठीच नव्हे, तर इतर अनेक व्यक्ती, व्यवसायांसाठी स्थान निर्माण केले आहे. त्यांना ऑनलाइन क्षेत्राची क्षमता पूर्णपणे ओळखण्यास मदतदेखील केली आहे.

सहेलीने १८ व्या वर्षी तिचा डिजिटल उद्योजक म्हणून प्रवास सुरू केला. सहेलीने तिच्या पहिल्या कामामधून केवळ ११० रुपये कमावले होते. मात्र, पुढे जाऊन तिचे वार्षिक उत्पन्न दोन लाखांपर्यंत पोहोचले होते. सहेली जेव्हा २१ वर्षांची झाली तेव्हा तिच्या व्यवसायाने तब्बल दोन कोटींची भरघोस कमाई केली होती. एवढेच नाही, तर केवळ मागच्या वर्षाचे आकडे पाहिले, तर केवळ एका वर्षामध्ये तिचा महसूल १,६४,२०,००० रुपयांनी वाढला आहे.

Decision from Wipro on Thursday on reward shares
बक्षीस समभागावर विप्रोकडून गुरुवारी निर्णय
17th October Rashi Bhavishya In Marathi
१७ ऑक्टोबर पंचांग: धनसंपत्ती की प्रचंड यश, गुरुवारी…
Ratan Tatas significant investments helped startups to stand on thier own feet
स्टार्ट-अप्ससाठी रतन टाटा नेहमीच कसे ठरले ‘देवदूत’?
issues of police Deprived of medical facilities after retirement
पोलीस व्यथा-भाग ३ : सेवानिवृत्तीनंतर वैद्यकीय सुविधांपासून वंचित
agriculture benefit for traders and sellers in rbi report
शेती शेतकऱ्यांच्या नव्हे व्यापारी, विक्रेत्यांच्या फायद्याची ? जाणून घ्या, रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या अहवालातील धक्कादायक माहिती
women employees ratio in indian companies reached 36 6 percent in current year
विश्लेषण : भारतीय महिलांचा टक्का वाढतोय ?
strike the employees of the motor vehicle department for various demands pune news
‘आरटीओ’तील संपात मध्यस्थ तेजीत! नागरिकांकडून राजरोस जादा पैशांची लूट सुरू; अधिकारी बघ्याच्या भूमिकेत
Success Story Of Ajay Tewari
Success Story : मर्चंट नेव्ही ऑफिसर ते उद्योजक; वाचा आयटी व्यवसायातील सल्ले देणाऱ्या अजय तिवारी यांची गोष्ट

हेही वाचा : ‘अब्ज डॉलर’ कंपनी चालवणारी ‘ही’ भारतीय महिला Unicorn Club मध्ये झाली सामील! कोण आहे जाणून घ्या

सहेली उद्योजक आणि डिजिटल फ्रीलान्सरसह एक कन्टेन्ट क्रिएटरदेखील आहे. विविध सोशल मीडियावर तिचे एकूण २.५ लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. विविध व्यवसायांना चांगल्या उंचीवर पोहोचवण्यात सहेली कुशल आहे.

“मला स्वतःचे फॉलोअर्स वाढविण्यात फार स्वारस्य नसले तरी मी इथे नवनवीन नेते, नेतृत्व घडवण्यासाठी आहे”, असे सहेली स्वतःबद्दल सांगताना म्हणाल्याची माहिती डीएनएच्या एका लेखावरून मिळते. सहेलीने कोलकातामधल्याच बेथून कॉलेजमधून कला शाखेची पदवी घेतली असल्याचे तिच्या लिंक्डइन अकाउंटवरून समजते.

लाँच मॅनेजमेंट, सोशल मीडिया मार्केटिंग, वैयक्तिक ब्रॅण्ड आणि इन्फ्ल्यूएन्सर्सना सल्ला देणाऱ्या पथकाचे नेतृत्व करण्यासाठी ती AmbiFem नावाची अभिनव विचारांची एजन्सीदेखील चालवते. व्यवसायाच्या ऑरगॅनिक वाढीकडे कटाक्षाने लक्ष देत आणि कुशलतेने सशुल्क धोरणात्मक जाहिरातींसाठी तिने एक सहा आकडी शुल्काचा अभ्यासक्रम तयार केला असून, तिच्या नवनवीन क्लायंटच्या ईमेलच्या याद्या वाढल्या आहेत. इतकेच नव्हे. तर या माध्यमांमधून महसूल कसा मिळवावा याबद्दल तिने असंख्य फ्रीलान्सरना मार्गदर्शन केले आहे.

हेही वाचा : ‘बायकांना काय काम असतं?’ हे वाक्य पुन्हा कुणी बोलणार नाही! पुरुषांपेक्षा ‘इतके पट’ अधिक काम करतात महिला

याव्यतिरिक्त सहेलीने फ्रीलान्स १०१ नावाची अकॅडमीदेखील स्थापन केली आहे; ज्यामध्ये ती स्पर्धात्मक डिजिटल माध्यमांमध्ये भरभराट होण्यासाठी आवश्यक ते ज्ञान आणि कौशल्य प्रदान करण्याचे काम करते.