तन्मयी तुळशीदास बेहेरे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

“न्हाय म्हंजे तुमचं आडनाव येगळं यांचं येगळं, लगीन झालय न्हवं ?” हॉटेलच्या रिसेप्शनवरचा बाप्या ‘इन्स्पेक्टर दया’ च्या अविर्भावात सईला बारीक नजरेने न्याहाळत म्हणाला. तेव्हा सईच्या लक्षात आलं.अरे देवा, प्रवासात रिस्क कशाला म्हणून मंगळसूत्र पण नाही घातलं आपण. तरीच हा… “लग्न झालंय आमचं पण मी आडनाव बदललं नाही.” तिने शक्य तेवढ्या शांतपणे त्याला सांगितलं पण ‘दया’ “कुछ तो गडबड है दया” च्या अविर्भावात नजरीया बदलायला तयार नव्हता ना त्यांना चेक-इन द्यायला. सईला पटकन काहीतरी क्लिक झालं, “अरे बापरे, आपण ह्याला ‘तशा’ वाटलो की काय?” ती गडबडली, “अहो तसं काही नाहीये.” “किती वरसं झाली लगीन होऊन? आडनाव बदलायला येळ मिळाला नाय होय?” दयाचे बीएसएनएल चौके- छक्के सुरूच.

आणखी वाचा : मुलींना स्पर्श करण्यात कसलं सुख? तुमच्यासारख्या राक्षसांना तर…

तेवढयात व्हरांड्यात फोनवर चिकटलेल्या साकेतचं लक्ष गेलं. त्याने ‘अँग्री यंग मॅन’ टाईप एन्ट्री मारली आणि दयाचीच केस कोर्टात लावली. चान्स मिळाला तसं सईलासुद्धा फैलावर घेतलं, “ याला का एक्सप्लेनेशन देतेस तू?” काउंटरवर एवढा आरडा ओरडा का ते पाहायला मॅनेजर धावत आला. त्याने ‘मॅटर दी एन्ड’ करायचा प्रयत्न केला पण ना दया हटत, ना अँग्री यंग मॅन. अखेर हुकमाचा एक्का काढावा तसं मॅनेजरला मॅरेज सर्टिफिकेट दाखवून विजयी मुद्रेने सई- साकेतने, दयाच्या नाकावर टिच्चून चेक- इन केलं. सईला वाटलं “फायू-जीच्या कलियुगात रामाची सीता कोण हा प्रश्न आता आऊटडेटेड झाला आणि सीतेचे आडनाव काय? हा प्रश्न टॉप ट्रेण्ड करतोय.”

आणखी वाचा : विजया वसावे… नंदूरबारमधील ओळखपत्रधारक पहिली तृतीयपंथीय!

कट टू-सीन २

सावंतांचं घर, घरात गडबड, घाई, धावपळ सुरु आहे. श्रेयाला आज बघायला येणार आहेत. “स्टार बक्स मधेच कॉफीला भेटू. कशाला फॉर्मल प्रोग्राम?” असं सोहमच म्हणणं होतं पण मध्यस्थांनी आधीच चतुराईने सावंतांच्या घरीच दोन्ही कुटुंबाना कांदेपोहे प्रोग्रॅमसाठी तयार केलं. सगळं कसं रितीनुसार आणि साग्रसंगीत झालं पाहिजे असा त्यांचा हेका. उगाच डोक्याला शॉट नको म्हणून श्रेया सोहमही ओके म्हणाले. तोच वर्षानुवर्षांचा घिसापीटा कांदेपोह्यांचा सीन परत एकदा सुरु झाला. इसने उसको देखा, उसने इसको देखा और बात बन गयी. श्रेयाने लाजल्याचा अभिनय केला आणि सोहमने अवघडल्याचा. सगळं कसं रिअॅलिटी शोच्या स्क्रिप्ट सारखं. इथपर्यंत सगळं ठीक चाललं होतं. तेवढयात स्क्रिप्टमध्ये न लिहिलेला कहानीमे ट्विस्ट,“मला सोहम पसंत आहे फक्त एक अट आहे. लग्नानंतर मी माझं आडनाव बदलणार नाही” श्रेया म्हणाली. श्रेयाचे आई वडील “हे काय आता नवीन?” असे एकमेकांकडे चोरटे कटाक्ष टाकत आहेत. बाकी सगळ्यांच्या माना श्रेयाकडे. सस्पेन्स म्युझिक… तनाव का माहोल… श्रद्धांजलीसाठी मौन बाळगतात तशी घनघोर शांतता. आता सोहमकडे सगळ्यांच्या माना वळतात. आपले मध्यस्थ! जणू काही लग्नव्यवस्थेच्या यशस्वी होण्याची जबाबदारी आपल्यावरच असल्यासारखे त्यांनी दोन्ही कुटुंबाना बसवले आणि पतिव्रतेने कसा त्याग करायचा असतो, तेव्हाच लग्न कसं यशस्वी होतं इत्यादी इत्यादी लेक्चर झाडले पण “मला श्रेया तिच्या आडनावासकट पसंत आहे.” असं सोहमने म्हटल्यावर, रामाने जसा धनुष्य बाण उचलून त्याची प्रत्यंचा जोडून धनुष्याचा टणात्कार करत वरमाला सीतेच्या गळ्यात घातली तसेच सगळ्या अटी पार करून सोहमने वरमाला आपल्या गळ्यात पाडून घेतली आणि स्वयंवर ठरले श्रेयाचे.

आणखी वाचा : फॅशनमधले अचाट तोडगे – ‘डीटॅचेबल’ बाह्या!

कट टू सीन ३

लग्नानंतर सायलीने ऑफिस जॉईन केल्यावर कंपनीचे एच आर. डिपार्टमेंटचे कदम समोर आले आणि अतिउत्साहात म्हणाले “या या. अभिनंदन! कशा आहात? तुमचा ऑफिसमध्ये नाव बदलायचा फॉर्म मी आधीच आमंत्रण पत्रिकेनुसार भरून ठेवलाय हा घ्या. नवीन नाव बदललं का यजमानांनी? ते लिहा इथे… बदलेलं आडनाव मी लिहून ठेवलंच आहे आणि द्या सही ठोकून… बस्स.एच आर सेवेस तत्पर” “त्याची काही गरज नाही. मी आडनाव बदलणार नाहीये” सायली.“आपल्या कंपनीत सगळ्या लग्न झालेल्या मुली बदलतात.” तिच्या विरुद्ध एचओडी चे कान भरणारी मंथरा कोण हे एव्हाना तिला समजलं होतं.सायली म्हणाली, “का?आडनाव बदलल्यावर आपल्याकडे प्रमोशन देतात का?”

आणखी वाचा : आलियाला लग्नाआधीच गरोदर म्हणणाऱ्या ट्रोलर्सना चपराक

कट टू सीन ४

“ए बाई आडनाव बदलायच्या फंदात पडू नकोस ऐक माझं! आपल्याला लग्नानंतर महिन्याभरात यूएसला जायचं आहे. केवढी मोठी प्रोसिजर आहे नाव बदलायची माहीत आहे का तुला? आधी अॅफिडेव्हिट करा मग पेपर मध्ये दवंडी पिटा मग गॅझेटमध्ये पब्लिश करायला अप्लाय करा त्यानंतर आधार, पॅन, बँक, पासपोर्ट. किती महिने लागतील कोण जाणे?” आलापचं सगळं उलटंच! इथे भारतात आडनाव बदल म्हणून मागे पडतात तर हा नको बदलू म्हणून मागे लागलाय.अक्षयाने सुटकेचा निश्वास सोडला.“हो! अरे माझ्या ताईला आडनाव नव्हतं बदलायचं पण तिच्या सासरच्यांनी फुल फॅमिली ड्रामा केला. हिचं आडनाव न बदलल्यामुळे घराने की इज्जत वगैरे कशी जाईल असं रडगाणं त्यांनी गायलं. बरं माहेरचं नि सासरचं दोन्ही लावते असं ताई म्हणाली तर ऐश्वर्याने रॉय बच्चन अशी दोन आडनावं लावली म्हणून हे फॅड सुरु झालं असंही त्यांनी डिवचलं. फुल टू बॉलीवूड फॅमिली! तात्पर्य काय तू नवऱ्याचच आडनाव लाव. मात्र आता नवऱ्यासोबत भांडण झालं की आम्ही ‘देशपांडे’, शूर वीरांचे वंशज. आमचं ऐतिहासिक भारदस्त आडनाव असताना तुझं ‘नर’ असं मेंगळट अन् न शोभणारं आडनाव लावलं त्याची थोडी तरी कदर कर असा एक टोमणा ताई जीजूला वरचेवर मारतेच.” इथे आलापला आडनाव बदलासाठी लागणाऱ्या वेळाचा जुलमाचा वनवास सहन करण्याची काहीही इच्छा नव्हती आणि अक्षयालाही लुफ्तान्साच्या पुष्पकात बसायची घाई झालेली होती.

आणखी वाचा : ‘मेटा’च्या ‘इंडिया हेड’ संध्या देवनाथन आहेत तरी कोण? जाणून घ्या त्यांचा प्रवास…

कट टू सीन ५

“नाव?”
“सारा”
“वडीलांचं नाव?”
“ मंदार धुरी”
“आईच नावं ?”
“शलाका चव्हाण”
नामांकित प्ले ग्रुपच्या अॅडमिशन क्लार्कने फायलींतून मुंडक वर काढलं. पांढरा कावळा पाहिल्यासारखे भाव त्याने चेहेऱ्यावर आणले आणि म्हणाला,“ छे छे असं होऊच शकत नाही. एकच आडनाव पाहिजे. तुम्हाला हे कोणी सांगितलं नाही का? अहो मुलीच्या मानसिक आरोग्याचं काय? तिला काय सांगणार तुम्ही की आपण एक कुटुंब आहोत वेगवेगळ्या आडनावांचं. काय हा गोंधळ? तुम्ही असं करा आईच आडनाव बदला आणि मगच या अॅडमिशनला मगच आम्ही विचार करू.” शलाकाला त्या क्लार्कला खाऊ का गिळू असं झालं. “अहो साहेब, आम्ही पालक आहोत. आमचं बघून घेऊ.तुम्ही अॅडमिशन द्या.” शलाकाचं उत्तर ऐकून क्लार्कने तिची फाईल तिच्याकडे जवळजवळ भिरकावली. आता मात्र शलाकाने आतापर्यंत आवरलेला रागाचा बांध सोडला आणि मोबाईलचं सोशल मीडियाच थेट व्हिडीओ लाईव्ह सुरु केलं आणि प्रश्न विचारला “आडनावं वेगवेगळी आहेत म्हणून अॅडमिशन देत नाही असं लिहून द्या. मग केसच टाकते शाळेवर.” असा डाव टाकल्यावर मात्र क्लार्कला लंका दहन करणारा हनुमानच आठवला असेल.

आणखी वाचा : नातेसंबंध : स्पर्शाचा हेतू

या सगळ्यांचा उहापोह का? हा प्रश्नच विचारण्याची गरज आहे का? आपण जन्माला येताना जितकं श्वास घेणं नैसर्गिक आहे तेवढंच आपलं आडनाव. ती आपली ओळख आहे. आपल्या आडनांवासोबत येतो आपल्या कुटुंबाच्या विचारांचा वारसा, इतिहास आणि तो पुढे घेऊन जाण्याची आपली जबाबदारी. केवळ स्त्री म्हणून जन्माला आलो म्हणून हे अस्तित्व पुसून दुसरं निर्माण करण्याची जबरदस्ती का? आमचं आम्हाला ठरवू द्या की. केवळ आधीच्या पिढ्यानी केलं म्हणून आपण करायचं तेही इतरांचं ऐकून? त्यापेक्षा जे घेऊन आलोय ते जपावं आणि समर्थपणे पुढे न्यावं. आपल्या घराण्याचं नाव रोशन वगैरे करावं… आडनावाचं इतकं रामायण करण्याची गरजच नाही.
tanmayibehere@gmail.com 