असे म्हणतात ना की, एखादी गोष्ट मनापासून करण्याची जर इच्छाशक्ती असेल, तर व्यक्ती काहीही करून सर्व अडथळ्यांवर मात करीत ती गोष्ट करून दाखवते. त्यात विशेषत: स्त्रियांना कुटुंब आणि काम अशा दोन्ही गोष्टी सांभाळून आपली स्वप्ने पूर्ण करताना तारेवरची कसरत करावी लागते. पण, ‘कोरल वूमन’ उमा मणी यांनी कुटुंब चांगल्या प्रकारे सांभाळून अशी एक जबाबदारी खांद्यावर घेतली; जी अनेकांसाठी फार प्रेरणादायी आहे.

उमा मणी यांना लहानपणापासूनच चित्रकलेची आवड होती; पण त्या काळी उमा यांच्या आजी-आजोबांना चित्र काढणे म्हणजे कागद आणि रंगीत पेन्सिलचा अनावश्यक वापर करणे, असे वाटत होते. त्यामुळे त्यांनी तिला चित्रकलेची आवड जोपासण्यास विरोध केला. यावेळी त्यांना फक्त अभ्यास आणि लग्न या गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले. पण, वयाच्या ४९ व्या वर्षापर्यंत त्यांनी सर्व जबाबदाऱ्या व्यवस्थितरीत्या पार पाडल्या आणि पोहणे व डायव्हिंग शिकण्याचा संकल्प केला. यावेळी ‘तुझे हे वय आजी होण्याचे आहे’ असे नातेवाइकांचे अनेक टोमणे त्यांना सहन करावे लागले.

Sadanand literary conference
सांगली: जात घट्ट कराल तसा माणूस पातळ होईल; लवटे
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Maha Kumbh Mela World largest gathering begins in India
दीड कोटी भाविकांचे पवित्र स्नान; भक्तिमय वातावरणात महाकुंभाला सुरुवात
Mahakumbh mela 2025 (2)
Maha Kumbh Mela 2025: स्मशानवासीन ‘अघोरी’ साधूंचा इतिहास काय सांगतो?
sonam wangchuck marathi news,
जगप्रसिद्ध पर्यावरणवादी सोनम वांगचुक यांचे नागपुरात “हेरिटेज ट्री वॉक”
buldhana couple murder loksatta news
बुलढाणा : नातेवाईकांच्या भेटी घेतल्या, पण निरोप घेतला तो कायमचा; वृद्ध दाम्पत्याचा…
Devendra Fadnavis and Divija Fadnavis
Devendra Fadnavis : देवेंद्र फडणवीसांकडून लेक दिविजाचं तोंडभरून कौतुक; हुशारीचं वर्णन करताना म्हणाले, “तिच्यातील प्रगल्भता…”
lokmanas
लोकमानस: जन पळभर म्हणतील हाय हाय…

पण, खचून न जाता उमा यांनी पुढे जाण्याचा निर्णय घेतला होता. त्या त्यांच्या ध्येयाकडे वाटचाल करीत राहिल्या. वयाच्या ५९ व्या वर्षी उमा मणी यांना भारताची ‘कोरल वूमन’ म्हणून गौरविण्यात आले. त्यांना पु्न्हा एकदा त्यांच्या कलेविषयी आवड निर्माण झाली. त्या आज चित्रकलेसह महासागर संवर्धनाबद्दल जागरूकता निर्माण करण्याचे काम करीत आहेत.

समुद्र वाचविण्याचे मिशन

आजही त्या नेहमी उत्साहीपणे आपली आवड जोपासताना दिसतात. आज आपल्या आवडीविषयी बोलताना त्या सांगतात की, माझा पुनर्जन्म वयाच्या ४५ व्या वर्षी झाला आहे. आजही मला लहान होऊन मोठं काम करायचंय. एक मोठं मिशन पूर्ण करण्याची जिद्द त्यांच्या मनात आहे. प्रवाळ खडकांची स्थिती, सागरी जीवन आणि हवामानातील बदल यांबद्दल त्यांना एक वेगळीच चिंता सतावतेय. त्या सांगतात की, समुद्र हा खरे तर एक महासागर आहे. विविध धोक्यांपासून समुद्राला वाचविण्यासाठी आपल्याला अनेक हातांची गरज आहे.

सुखी कौटुंबिक जीवन आणि चित्रकला

वयाच्या ४५ व्या वर्षी चित्रकलेची आवड पुन्हा जोपासण्याआधी उमा मणी या एक सर्वसाधारण सुखी, समाधानी गृहिणी होत्या. त्यांनी इतर स्त्रियांप्रमाणेच घरात आवडीने स्वयंपाक करणे, बाजारातून भाजी खरेदी करणे, कपडे-भांडी धुणे आणि साफसफाईची कामं केली. काही काळ त्यांनी योग किंवा इंग्रजी शिकविण्याचे क्लालेस घेतले. पण, आता वयाच्या ४५ व्या वर्षानंतर त्यांनी पुन्हा चित्रकलेची आवड जोपसण्यास सुरू केली आणि त्यांचे आयुष्य बदलले.

लहानपणी उमा मणी, बागबगीचे, झाडे आणि फुलांची चित्रे रेखाटायच्या. पण ३९ वर्षांच्या असताना त्या पतीच्या नोकरीमुळे भारतातील चेन्नईच्या हिरव्यागार परिसरातून मालदीवमध्ये स्थायिक झाल्या. मालदीवमधील निळ्याशार समुद्राविषयी त्यांना आकर्षण वाटू लागले; परंतु त्यांना कसे पोहायचे हे माहीत नव्हते. त्या काळातही त्यांनी फुले, बागबगीचांची चित्रे काढणे चालूच ठेवले.

यादरम्यान एके दिवशी त्यांना समुद्रातील प्रवाळ खडकांवरील माहितीपट पाहण्याची संधी मिळाली. मग त्यांनी प्रवाळ खडकांवर आधारित चित्रे काढण्यास सुरुवात केली. त्या म्हणाल्या, “चार वर्षांपासून मी समुद्रातील प्रवाळ खडकांचं खरं रूप न पाहता, त्यावर चित्रं काढू लागले.” २०१४ मध्ये एका प्रदर्शनादरम्यान कोणीतरी त्यांना सांगितले, “तुम्ही पाण्याखालील प्रवाळ खडक पाहा आणि नंतर चित्र काढा.” त्यावेळी त्यांना वाटले की, माझ्यासाठी पोहणं आणि डायव्हिंग शिकण्याची हीच योग्य वेळ आहे.

हाच त्यांच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट ठरला. वाढते वय आणि लिंगभेदाबाबत नातेवाइकांकडून मारल्या जाणाऱ्या टोमण्यांकडे दुर्लक्ष करीत उमा मणी यांनी आपले काम सुरूच ठेवले.

डायव्हिंग करण्यापूर्वी शिकावे लागले पोहणे

उमा मणी मालदीवमध्ये डायव्हिंग कोर्ससाठी साइन अप करण्यासाठी गेल्या होत्या. तेथे प्रथम त्यांना पाण्याखालील कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सहजतेने नेव्हिगेट करण्यासाठी पोहणे शिकण्यास सांगितले गेले. त्यासाठी त्यांना चेन्नईला जावे लागले. तिथे त्या पोहण्यास शिकल्या. त्या काळी लोकांना त्या वेड्या वाटायच्या. ज्या वयात लोक आजी व्हायचे स्वप्न पाहतात, त्या वयात हात-पाय तोडून घेऊ नका, असे टोमणे त्यांना मारले जायचे. चेन्नईतल्या वृद्ध महिला त्यांना विचारायच्या, “तुला हे का करायचं आहे?” ज्यावर त्या सांगायच्या, “बस्स मला आयुष्यात एवढंच करायचं आहे.” अर्थात, त्यांना अनेक प्रश्न विचारले जायचे; पण उमा यांनी त्यांच्या एकाही प्रश्नाला उत्तर दिले नाही.

जवळजवळ एक दशकानंतर जेव्हा त्यांच्या डायव्हिंग प्रशिक्षकाने त्यांना पाण्यात उडी मारण्यास सांगितले तेव्हा त्या पहिल्यांदाच मोकळेपणाने हसल्या. त्या बोटीच्या टोकावर उभ्या राहिल्या. स्वतःची खात्री पटल्याशिवाय त्या उडी मारू शकत नव्हत्या. त्या स्वतःच्या मनाशी बोलल्या , “मी इथपर्यंत आलेय… मला उडी मारायची आहे.”

त्या पहिल्या डाइव्हने त्यांच्यात एक वेगळा आत्मविश्वास आला. प्रवाळ खडकांची हालचाल, रंग आणि भव्यता पाहून मंत्रमुग्ध होऊन त्या स्वतःलाच विचारू लागल्या, “मी स्वतःला या सुंदर अनुभवापासून इतकी वर्षं दूर का ठेवलं?” आज ३२ वर्षांच्या मुलाची आई असलेल्या उमा मणी आपल्या दृढनिश्चयाबद्दल आणि तिच्या पती व मुलाच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञ आहेत. त्या सांगतात, “मी हे करू शकते याची मला आता जाणीव झाली. मी रिस्क घेतली.” त्या आता आवर्जून सांगतात, “चालण्यापेक्षा डायव्हिंग सोपं आहे.”

कोरल वूमन ते ‘अर्थ चॅम्पियन’ बनण्यापर्यंतचा प्रवास

तेव्हापासून त्यांनी किमान २५ वेळा समुद्रात डुबकी मारली आणि त्यातील नैसर्गिक सौंदर्य पाहिले. प्रत्येक वेळी त्यांना त्याच्या कलेद्वारे समुद्री जीवांच्या संवर्धनाबद्दल अधिक जागरूकता निर्माण करण्याची प्रेरणा मिळते. उमा डायव्हिंग लॉग ठेवतात; ज्यामध्ये त्या प्रत्येक डायव्हिंगचे ठिकाण, वेळ व अनुभव याबद्दल तपशीलवार लिहितात.

२०१८ मध्ये त्यांच्या जीवनकथेवर ‘कोरल वूमन’ नावाची डॉक्युमेंट्री बनविण्यात आली होती. चित्रपट निर्मात्या प्रिया थुवसेरी यांना समुद्री जीवांच्या प्रेमात पडलेल्या गृहिणी उमा मणी यांची प्रेरणादायी कथा सापडली. पुढे उमा यांनी आपल्या कलेच्या माध्यमातून सागरी जीवन आणि किनारी समुदायावर हवामानबदलाच्या विनाशकारी परिणामांकडे लोकांचे लक्ष वेधण्यास सुरुवात केली. उमा मणी यांच्या सततच्या प्रयत्नांमुळे सोनी बीबीसी अर्थने त्यांना ‘अर्थ चॅम्पियन’ म्हणून मान्यता दिली आहे.

मागे वळून पाहताना त्या सांगतात, “हा प्रवास एका वेगळ्याच प्रवाहाच्या दिशेने सुरू झाला. त्यांनी चित्रकला आणि डायव्हिंगपासून सुरुवात केली. पण, जेव्हा त्यांना पाण्याखालील समुद्री जीव आणि समुद्रातील प्रदूषणाची समस्या कळली – तेव्हाच त्यांनी वेगळा विचार करायला सुरुवात केली. आनंदी समुद्री जीवांपासून ते दुःखी समुद्री जीवांपर्यंतची दृश्यं पाहून मला त्रास होऊ लागला.”

आता त्या प्रदर्शनांदरम्यान, महाविद्यालये आणि संस्थांमध्ये लोकांना समुद्राच्या संरक्षणाविषयी जागरूक करतात. समुद्रात कचरा आणि प्लास्टिकच्या रूपात कार्बन फूटप्रिंट सोडत आहोत. त्यांचा त्रास सागरी पर्यावरण आणि जीवजंतूंना होत आहे. हवामान बदलामध्ये ही गोष्ट अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावत आहे. समुद्राच्या सुरक्षेबाबत प्रत्येक व्यक्तीनं आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवली पाहिजे, असेही त्या सांगतात.

वयाच्या ६० व्या वर्षीही उमा मणी डायव्हिंगसाठी स्वतःला शारीरिकदृष्ट्या सक्रिय ठेवतात. फिटनेसबद्दल त्या सांगतात, “ॲक्टिव्ह राहणे हा त्यांचा फिटनेस मंत्र आहे. खरं सांगायचं, तर त्या फक्त तेच करतायत; जे बहुतेक स्त्रिया भूतकाळात करीत असत, भरपूर घरकाम. मी कामासाठी कोणत्याही मदतनीस किंवा वैयक्तिक वाहनावर अवलंबून नाही. सार्वजनिक वाहनानं प्रवास करते, दररोज मंदिरात जाते आणि माझ्या चार लाडक्या श्वानांसह फेरफटका मारते.”

त्यांनी शेवटी फिटनेसविषयी स्पष्ट केले की, जर डायव्हिंगला जायचं असेल, तर पाठीवर २० किलो वजन उचलणं शक्य नाही. त्यामुळे दररोज शरीरावर काम करावं लागतं. त्यासाठी त्या व्यायाम करतात. योगा करतात, खूप चालतात व सकारात्मक राहतात. तसेच त्या खाण्या-पिण्याच्या सवयींबाबतही सावध असतात. रोज रात्री ९ वाजता झोपतात. आपलं जीवन चांगलं कसं जगायचं हे तुमच्या हातात असते. म्हणून त्या एक योग्य दिनचर्या फॉलो करतात.

Story img Loader