दिवाळी म्हटलं की आपल्यासमोर दिवे, पणती, आकाशकंदील, ठिकठिकाणी केलेली रोषणाई या सर्व गोष्टी येतात. त्याबरोबरच फराळ हा देखील त्यातीलच एक अविभाज्य घटक. गेल्या आठवडाभरापासून आमच्या घरात फराळाची लगबग सुरु होती. एकत्र कुटुंब असल्याने तसा फारसा काही कामाचा लोड नव्हता. पण आईला आणि काकीला थोडीशी मदत करावीच लागायची. दिवाळीचं शॉपिंग करायचं म्हणून गेल्या आठवड्याच्या सुट्टीच्या दिवशी प्लानिंग केले. मी, बाबा, भाऊ, काकाची दोन मुलं असे सर्वजण अगदी सहकुटुंब शॉपिंगसाठी दादरला गेलो.

तिथे गेल्यावर अगदी मोठमोठे मॉल फिरलो. दुकानात शॉपिंग केलं. प्रत्येकाची खरेदी होईपर्यंत संध्याकाळी सात वाजले होते. आम्ही दादरमधील एका मॉलमध्ये खाण्यासाठी शिरत असतानाच तिथे एक लहान मुलगी माझ्या पुढे असलेल्या मुलीला म्हणाली, ‘दिदी देखो ना अच्छा पणती है… मैने खुद पेंट किया है…!’ ‘सिर्फ ८० रुपये का? एक ले लो ना…’ पण ती मुलगी थोडी हाय स्टँडर्ड असल्याने तिला झिडकारु लागली. त्यांच्यात थोडे खटकेही उडाले. ‘कपडे को हात नही लगाने का… तुमको अक्कल है क्या?’ असे नको नको ते ती त्या मुलीला बोलत होती. मी मागे रांगेत उभं राहून गपगुमान ऐकत होती. त्यानंतर मीही मॉलमध्ये शिरले. तिकडे जाऊन शॉपिंग करण्यापासून अगदी खाण्यापर्यंत सहज साधारण पाचहजार रुपये खर्च झाले होते.
आणखी वाचा : महिला, शॉपिंग अन् खिशाला ‘फोडणी’

video of a guy Heartwarming Answer
“बहिण का स्पेशल असते?” तरुणांनी दिले सुंदर उत्तर, प्रत्येक भावाने पाहावा हा VIDEO
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Nagpur police arranged mother daughter reunion in pune
नागपूर पोलिसांनी घडवले पुण्यात मायलेकीचे मनोमिलन, आईच्या चेहऱ्यावर हास्य आणि लेकीचा आनंद गगनात मावेना
old womans dead body found in Mutha river police investigation underway
पुणे : मुठा नदी पात्रात ज्येष्ठ महिलेचा मृतदेह, पोलिसांकडून तपास सुरू
samantha want to be mother
अभिनेत्री समांथा रूथ प्रभूला व्हायचंय आई, इच्छा व्यक्त करत म्हणाली, “वयाचा विचार…”
hemal ingle bridal to be party
Video : ‘नवरा माझा नवसाचा २’ फेम अभिनेत्री लवकरच अडकणार विवाहबंधनात, मैत्रिणींसह केली Bride To Be पार्टी
Paithani web series on Zee 5 OTT entertainment news
आई मुलीच्या नात्याची ‘पैठणी’
aai kuthe kay karte fame Radhika Deshpande expresses her point about women bindi on forehead
स्त्रीने टिकली लावण्याविषयी ‘आई कुठे काय करते’ फेम अभिनेत्रीने मांडलं परखड मत, म्हणाली, “आपण आपली संस्कृती…”

त्या मॉलमध्ये खायला बसलेली असताना वरुन तीच पणती विकणारी मुलगी मला दिसली. साधारण कळत्या नकळकत्या वयाची ती मुलगी तिची टोपली घेऊन बसली होती. सर्वांना विनंती करुन करुन थकली होती… तिच्या चेहऱ्यावरील थकवा स्पष्ट जाणवत होता. मी वरुनच तिच्या टोपलीकडे नजर फिरवली. फारच सुंदर पणत्या होत्या. त्या पणत्या पाहिल्यावर माझी नजर थांबत नव्हती. डिझाईनपासून रंगांची निवड करण्यापर्यंत सर्व काही बेस्टच वाटत होते. मी सहजच बाबांना म्हटलं, ‘तुम्ही थांबा मी जरा खाली जाऊन येते…!

ती टोपली घेऊन त्या पणत्या विकल्या जातील की नाही, अशा आशेने प्रत्येकाकडे बघत होती. मी तिच्याकडे गेली आणि सहज तिला विचारले, ‘पणत्या कितीला दिल्या?’ ती म्हणाली, ‘दीदी ८० रुपये… आपको कितना लेने का है? मै कम करके देती हूँ…?’ मी तिला म्हटलं ‘मला दोन हव्यात.’ त्यावर ती म्हणाली, ‘दीदी १५० रुपये होंगे… आपको जो चाहिए वो कलर ले लो…!!’

मी त्या टोपलीतून मला हव्या असलेल्या दोन पणत्या निवडल्या. त्या पणत्या निवडताना तिला सहज विचारले, ‘तुम स्कूल जाती हो…’ तर ती म्हणाली ‘हा…’ ‘तो फिर अभी इधर ऐसे पणती क्यू बेच रहे हो…?’ त्यावर ती म्हणाली ‘दीदी मै धारावी मे रहती हूँ. हम हर साल पणती बनाते हे, उसको हात से पेंट करके बेचते है और इससे जो भी पैसे मिलते है, उससे हम कपडे खरीदते है और घर पे मिठाई लाते है…!’ तिचे हे उत्तर ऐकल्यावर क्षणभर डोळ्यात पाणी आलं.
आणखी वाचा : महिलांच्या नटण्या-मुरडण्यात ‘पुरुषांचा’ अडथळा

‘निव्वळ एका ड्रेससाठी….’

हल्ली आपण एखाद्या ठिकाणी गेल्यावर सहज २०० ते ३०० रुपयांची उधळपट्टी करतो. आपल्याकडे अशीही लोक आहेत जी एखाद्या शर्टाचं बटण तुटलं तरी तो लगेच फेकून देतात. कुर्त्यांची शिलाई निघाली तरी आपण तो कुर्ता अगदी कचऱ्याच्या डब्ब्यात फेकून देतो. आपल्या न होणारे ड्रेस आपण सहज कचऱ्यात टाकून देतो. पण ज्यांची आर्थिक परिस्थिती नसते ते केवळ दिवाळीच्या दिवशी नवीन कपडे घालायला मिळावे यासाठी दिवसभर मेहनत करत असतात. पणत्या घडवण्यापासून, त्यावर रंगकाम करुन ते विकण्यापर्यंत कितीतरी खटाटोप त्यांना करावा लागतो ‘निव्वळ एका ड्रेससाठी….’

त्या ड्रेसची किंमत कदाचित दीडशे ते दोनशे रुपये असेल. पण ते दीडशे रुपये कमवण्यासाठी आणि नवा ड्रेस घालण्यासाठी त्या मुली रात्रंदिवस मेहनत करतात. अनेकदा तर त्यांच्या पोटाला चिमटा काढून पाणी पिऊन झोपतात. इतकं सर्व झाल्यावर दिवाळीच्या पहिल्या दिवशी त्यांना तो आवडीचा ड्रेस घालायला मिळाला, तर त्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. पण जर नाही मिळाला तर तोंड पाडून न राहता आईच्या कामावरुन एखाद्या बाईने तिच्या मुलीचा दिलेला जुना ड्रेस नवीन असल्यासारखा मिरवायचा हे त्यांना चांगलंच जमतं. इतकं सर्व होऊनही त्यांच्या चेहऱ्यावर असणारी ‘हॅप्पी दिवाली स्माईल’ मात्र जराही कमी होत नाही. स्माइल कायम तसंच राहतं.

एखाद्याची दिवाळीही गोड

यातून सांगण्याचा उद्देश इतकाच की आपल्यातील प्रत्येकाने दरवर्षी का होईना नवीन पणती, कंदील खरेदी करायला हवा. यामुळे तुम्ही एक मदतीचा हात तर पुढे करता, पण त्याबरोबर एखाद्याची दिवाळीही गोड करता!